आजचे हवामान पावसाचे

  1. कसोटी 'चॅम्‍पियनशिप'वर दाटले पावसाचे ढग, जाणून घ्‍या आजचे हवामान
  2. बदलापूरः जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन कमजोरच नऊ वर्षांनंतर १३ जूनचा उशिराचा मुहुर्त साधला; सरासरी ३० मिलमीटर नोंद
  3. Weather Update Today : तापलेला विदर्भ होणार का गार? चेक करा पुण्यासह 6 शहरांचं तापमान
  4. चिंता वाढली! Cyclone Biparjoy नं महाराष्ट्रातला पाऊसही सोबत नेला? पुढील 4 आठवडे कमी पर्जन्यमान


Download: आजचे हवामान पावसाचे
Size: 20.66 MB

कसोटी 'चॅम्‍पियनशिप'वर दाटले पावसाचे ढग, जाणून घ्‍या आजचे हवामान

मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता © पुढारी द्वारे प्रदान केलेले WTC Final पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. आज सामन्‍याचा चौथा दिवस आहे. पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारल्यामुळे ऑस्ट्रेलियाची मजबुत पकड निर्माण, झाली आहे. सामनाच्‍या चौथ्या दिवशी ओव्‍हल मैदानावर पावसाचे ढग दाटले आहेत. जाणून घेवूया आजच्‍या हवामानाविषयी… आजचे हवामान कसे असेल? ओव्हल मैदानावर सुरु असलेल्‍या सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी पावसाची शक्यता आहे. दोन्ही दिवशी दुपारी पावसासह जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. इंग्लंडच्या हवामान विभागाने म्‍हटलं आहे की, शनिवारी ( दि.१०) सकाळी ढग हळूहळू दूर होत आहेत, त्यानंतर भरपूर सूर्यप्रकाश आहे. मात्र वाढत्या प्रमाणात उष्ण आणि दमटपणा यामुळे दुपारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.लंडनमध्ये सकाळी ७ ते दुपारी १ वाजेपर्यंत पावसाची ५ टक्के शक्यता आहे; परंतु दुपारी 3 वाजेपर्यंत पावसाची शक्यता 10 टक्के आहे. अशा स्थितीत पावसामुळे तिसऱ्या सत्राच्या खेळावर परिणाम होऊ शकतो. अंतिम सामन्यात तीन दिवसांच्या खेळानंतर ऑस्ट्रेलियाकडे २९६ धावांची आघाडी आहे आणि दुसऱ्या डावात सहा विकेट्स शिल्लक आहेत. आता ऑस्ट्रेलिया आपली आघाडी ४०० धावांपेक्षा अधिक करण्‍याचा प्रयत्‍न करेल. ऑस्ट्रेलियालाचे उर्वरीत ६ गडी लवकरात लवकर तंबूत धाडण्‍याचा भारताचा प्रयत्‍न असेल. दरम्‍यान, कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत पाऊस पडला तरी सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता अधिक आहे. हेही वाचा : • • • The post

बदलापूरः जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन कमजोरच नऊ वर्षांनंतर १३ जूनचा उशिराचा मुहुर्त साधला; सरासरी ३० मिलमीटर नोंद

बदलापूरः यापूर्वीच्या अंदाजाप्रमाणे राज्यासह ठाणे जिल्ह्यात मोसमी पावसाचे आगमन मंगळवारी झाले. २०१४ वर्षानंतर पहिल्यांदाच पाऊस इतका उशिराने आला. त्यातही अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपोरजॉय वादळामुळे मोसमी पाऊस कमजोर असल्याचे दिसून आले आहे. मंगळवारपासून २४ तासात ठाणे जिल्ह्यात सरासरी ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात जोरदार पावसासाठी आणखी दहा दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता खासगी हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. Adipurush First Review: कसा आहे प्रभासचा ‘आदिपुरुष’ चित्रपट? पहिला शो बघितल्यानंतर ट्विटर युजर्स म्हणाले… यंदाच्या वर्षात एल निनो प्रभावामुळे राज्यातील मोसमी पावसावर परिणाम होण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार पहिल्या मोसमी पावसासाठी १३ जूनची वाट पाहावी लागली. राज्यासह हेही वाचा… बदलापूर येथे आपल्या खासगी वेधशाळेच्या माध्यमातून गेल्या १० वर्षांपासून हवामानाचा अभ्यास करणारे अभिजीत मोडक यांनी केलेल्या नोंदीनुसार यंदाचा पाऊस कमजोर पडला आहे. जिल्ह्यात यापूर्वी पहिला पाऊस म्हटलं की जोरदार असतो. मात्र यंदा जिल्ह्यात सरासरी ३० मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे मोडक यांनी सांगितले आहे. यंदाच्या पावसावर एल निनोसह अरबी समुद्रात तयार झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळाचाही परिणाम झाला आहे. या चक्रीवादळामुळे मोसमी वारे ओढले गेले. त्यात पाऊस कमजोर झाला. त्यामुळे पावसाला उशिरही झाला. गेल्या दहा वर्षात दुसऱ्यांदा पावसाचे आगमन उशिराने झाले आहे. यापूर्वी २०१४ वर्षात १३ जूनला पाऊस आला होता. त्यावेळी अरबी समुद्रात नानौक वादळ तयार झाले होते. यंदाही समुद्रातील वादळामुळे पावसाचे उशिराने आगमन झाले आहे. २४ तासातील पाऊस • मुंब्रा- ५४ • दिघा- ३९ • ऐरोली- ३८ • घनसोली- ३...

Weather Update Today : तापलेला विदर्भ होणार का गार? चेक करा पुण्यासह 6 शहरांचं तापमान

नागपुरातील उष्णतेचा पारा काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. नागपुरात काल 13 जून रोजी कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 26.4 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. नागपुरात काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी कोसळला तर नरखेड येथे 4.6 मिमी पावसाची नोंद झाली आहे. नागपुरात आज 14 जून रोजी नागपुरात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना 30-40 प्रती तास वेगाने सोसाट्याच्या वारा आणि तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील असा इशारा नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. तर कुठलीही धोक्याची सूचना नाही अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे. कोल्हापुरात काल दिवसभर तापमानात घट झालेली पाहायला मिळाली. दुपारनंतर थोडेफार ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कोल्हापुरातील नागरिकांना दिलासा मिळाला. तर आज 14 जून रोजी देखील आकाश ढगाळ राहून उष्णतेत घट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.दरम्यान कोल्हापुरात काल 13 जून रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले आहे. तर आज 14 जून रोजी देखील कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 24 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. पुण्यामध्ये काल 13 जून रोजी कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस होते तर किमान तापमान 25 अंश सेल्सिअस असल्याची नोंद झाली आहे. आज 14 जून रोजी शहरातील कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस असेल तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून अति हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

चिंता वाढली! Cyclone Biparjoy नं महाराष्ट्रातला पाऊसही सोबत नेला? पुढील 4 आठवडे कमी पर्जन्यमान

Cyclone Biparjoy : अरबी समुद्रात सुरु झालेलं बिपरजॉय हे चक्रिवादळ आता महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासू मैलोंच्या अंतरानं दूर असलं तरीही या वादळाचे परिणाम मात्र राज्यातील हवामानावर आणि पर्यायी राज्यातील मान्सूनवर स्पष्टपणे दिसून येत आहेत. सध्याच्या घडीला हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार हे वादळ गुजरातच्या किनारपट्टी भागातून पुढे कराचीच्या दिशेनं वळत असल्याचं पाहायला मिळत आहे. 15 जून रोजी सायंकाळच्या सुमारास हे वादळ अधिक तीव्र रुपात येणार असून, याचा फटका गुजरात ते कराचीदरम्यानच्या किनाऱ्यांना बसणार आहे. ज्या धर्तीवर सध्या बचाव पथकं आणि सर्वच यंत्रणा तैनाक ठेवल्या असून प्रशासनही या वादळावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, वादळ महाराष्ट्रापासून दूर गेलं असलं तरीही त्याचे परिणाम मात्र राज्यात कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस म्हणजेच 48 तासांमध्ये मुंबईसह ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा सुटणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. इतकंच नव्हे, तर काही भागांमध्ये पावसाची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. असं असलं तरीही हा पाऊस क्षणिकच असेल हेसुद्धा तितकंच खरं. Cyclone 'Biparjoy' is expected to cross near Gujarat's Jakhau Port by the evening of 15th June — ANI (@ANI) पुढील 4 आठवडे कमी पावसाचे... Skymet या खासही हवामान संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार पुढील 4 आठवड्यात कमी प्रमाणात पाऊस पडेल. ज्यामुळं शेतीच्या कामांसाठी पावसाकडे आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांची काळजी वाढणार आहे. पुढील 4 आठवड्यांसाठी म्हणजेच थेट 6 जुलैपर्यंत कमी पाऊस पडणार आहे. सहसा शेतीच्या कामांना जून महिन्यातच सुरुवात होते. पण, आता मात्र हीच कामं जुलै महिन्यावर जाणार असल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत...