बांधकाम कामगार

  1. बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा नोंदणी अपडेट
  2. अटल बांधकाम कामगार आवास योजना
  3. कामगारांनी ऑनलाईन नोंदणीद्वारे विविध योजनांचा लाभ घ्यावा
  4. बांधकाम कामगार योजना 2023: फायदे, अर्ज, लाभ, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती
  5. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना
  6. बांधकाम कामगार संघटनेची शिरवडे येथे सहविचार बैठक


Download: बांधकाम कामगार
Size: 77.6 MB

बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पहा आणि लाभार्थी यादी मध्ये नाव नसेल तर नोंदणीची स्थिती जाणून घेऊन अशी करा नोंदणी अपडेट

राज्यात केाविड विषाणूच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नोंदित बांधकाम कामगारांना दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य त्यांच्या बँक खात्यामध्ये थेट (डीबीटी) जमा करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार राज्यातील १३ लाखांपैकी ९ लाख १७ हजार नोंदित बांधकाम कामगारांना अर्थसहाय्य करण्यात आले आहे. अवघ्या ४ दिवसात १३७ कोटी ६१ लाखांचा निधी थेट बांधकाम मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आल्याने कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मागील लेखामध्ये आपण बांधकाम कामगार कल्याणकारी योजना, कामाच्या मान्यताप्राप्त प्रकारांची यादी (बांधकाम कामगार यादी) आणि बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्याची प्रोसेस: बांधकाम कामगार लाभार्थी यादी ऑनलाईन पाहण्यासाठी प्रथम खालील लिंक ओपन करा. बांधकाम कामगार नोंदणीची वेबसाईट ओपन झाल्यावर वरती मराठी भाषा निवडा आणि वरील मुख्य मेनू मध्ये “ लाभ वितरित” या पर्यायामध्ये बांधकाम कामगारांना विविध लाभ वितरित केल्याच्या याद्या आपण पाहू शकतो. लाभ वितरित आता इथे विविध बांधकाम कामगार योजनांच्या लाभार्थी यादी आपण इथे पाहू शकतो, तुम्हाला ज्या योजनेच्या लाभार्थी यादी पाहायची असेल त्या योजनेवर क्लिक करा. आपण इथे “ कोविड-१९ मदत निधी हस्तांतरण (२ रा हप्ता)” पर्यायावर वर क्लिक करून कोविड-१९ मदत निधीच्या दुसऱ्या हप्त्याचे लाभार्थी यादी आपण पाहूया. “कोविड-१९ मदत निधी हस्तांतरण (२ रा हप्ता)” या पर्यायावर वर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोविड-१९ मदत निधी हस्तांतरण २ ऱ्या हफ्त्...

अटल बांधकाम कामगार आवास योजना

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या जागेवर नवीन घर बांधण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी मंडळामार्फत योजना राबविण्याबाबत आणि सदर योजनेत घरकुल बांधण्यासाठी बांधकाम कामगाराला अर्थसहाय्य देण्याचा ठराव पारित करण्यात आला. त्यास अनुलक्षून ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार (ग्रामीण) आवास योजना राबविण्यात येते. अटल बांधकाम कामगार आवास योजना – ग्रामीण: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांपैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारांच्या घराच्या अटल बांधकाम कामगार आवास योजनेस ( ग्रामीण ) मंजुरी आणि अर्थसहाय्य देण्यास शासन मान्यता देण्यात येणार आहे. तसेच ग्राम विकास विभागाच्या अधिपत्याखालील संचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृह निर्माण कार्यालय, बेलापूर, नवी मुंबई या यंत्रणेमार्फत राबविण्यास शासनाने मांजरी दिली आहे. योजनेचे स्वरूप :- महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदीत (सक्रिय) बांधकाम कामगारापैकी ग्रामीण भागातील नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारांसाठी मंजूर अटल बांधकाम कामगार आवास योजनेचे (ग्रामीण) स्वरुप खालील प्रमाणे आहे. अ) मंडळाकडील नोंदीत (सक्रिय ) बांधकाम कामगारांना ग्रामीण भागात स्वत:च्या /पती /पत्नीच्या नावावरील जागेवर नवीन घर बांधण्यासाठी अथवा अस्तित्वात असलेल्या कच्च्या घराचे पक्क्या घरात रूपांतर करण्यासाठी रू. 1.50 लक्ष अनुदान महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून उपलब्ध करुन देण्...

कामगारांनी ऑनलाईन नोंदणीद्वारे विविध योजनांचा लाभ घ्यावा

- पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित नंदुरबार : ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेतंर्गत राज्य शासनामार्फत कामगार विभागाच्या वतीने विविध योजनांचा लाभ देण्यात येत असून याचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन, राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी (दि. १० जून) केले आहे. ‘शासन आपल्या दारी’ मोहिमेत महाराष्ट्र राज्य इमारत बांधकाम व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या कामगारांना मध्यान्ह भोजन योजनेचा लाभ वितरण जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. गावित यांच्या हस्ते आज नंदुरबार तालुक्यातील कोळदा, समशेरपूर, कोरीट, शिंदे गावांत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लोकनियुक्त सरपंच श्रीमती मोहिनी वळवी (कोळदा ), उपसरपंच आनंद उत्तम गावित, श्रीमती मंदा चौधरी (समशेरपूर ) उपसरपंच रेवता भिल, ग्राम विकास अधिकारी संजय देवरे, डी.एन.राजपूत, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य तसेच लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ.गावित म्हणाले की, बांधकाम कामगारांना आरोग्य विषयक, शैक्षणिक, बांधकाम कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी अर्थसहाय्य, बांधकाम कामगारांच्या पाल्यांकरिता शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती, प्रधान मंत्री आवास योजनेतंर्गत घरकुल, नोंदणीकृत बांधकाम कामागाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पत्नीस व पतीस अर्थसहाय्य, मध्यान्ह भोजन योजना, कामगारांच्या मुलींच्या विवाहाकरीता अर्थसहाय्य, कामगारांना अत्यावश्यक संच वाटप, तसेच सामाजिक सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. कामगारांच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगारांनी www.mahabocw.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मंत्री डॉ.गावित म्हणाले की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यात ख...

बांधकाम कामगार योजना 2023: फायदे, अर्ज, लाभ, कागदपत्रे, पात्रता संपूर्ण माहिती

Bandhkam Kamgar Yojana 2023: नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेखामध्ये बांधकाम कामगार योजना 2023 संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये ही योजना काय आहे, या योजनेसाठी पात्रता आणि अटी काय आहेत, बांधकाम कामगार योजनेचे फायदे कोणते, योजना कोणासाठी राबवली जात आहे, अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, याची अर्ज प्रक्रिया काय, बांधकाम कामगार योजनेचे फॉर्म कुठे मिळतील या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हाला या लेखांमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. Table of Contents • • • • • • • • • • • बांधकाम कामगार योजना 2023 महाराष्ट्र राज्य शासनाने राज्यातील नागरिकांच्या उज्वल भविष्याकरिता विविध योजना सुरू केलेल्या आहेत. त्यापैकी बांधकाम कामगार योजना ही एक आहे. या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार रोजगार उपलब्ध करून दिला जातो. बांधकाम कामगारांचा सामाजिक सुरक्षा, त्यांच्या मुलांचे शिक्षण, त्यांना आरोग्याविषयी सहाय्य आर्थिक सहाय्य अशा प्रकारच्या विविध कल्याणकारी योजना महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सुरू केलेल्या आहेत. या योजनेअंतर्गत विविध योजनांचा लाभ कामगारांना आर्थिक मदत म्हणून दिला जाणार आहे. बांधकाम कामगार योजनेचे उद्दिष्ट काय? • या योजनेअंतर्गत बांधकाम कामगारांचे जीवनमान सुधारणे. • तसेच धोकादायक क्षेत्रांमध्ये बालकामगारांना काम न करू देणे. • कामगारांची रोजगार क्षमता आणि रोजगाराच्या संधी वाढवणे. • त्यांचा कौशल्य विकास करणे. • सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी उपायांसाठी कार्य करणे. • व्यवसायिक आरोग्य आणि कामगारांच्या सुरक्षिततेसाठी धोरण किंवा कार्यक्रम करून कामगारांच्या जीवनशैलीत सुधारणा घडवून आणणे. • घातक कामांपासून बाल श्रम काढून श्रम कायद्याच्या अंमलबजावणीस बळकटी...

बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना

नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामद्धे बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना म्हणजेच mahabocw scholarship scheme संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे, अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा या विषयी आपण संपूर्ण माहिती या लेखामद्धे जाणून घेणार आहोत. तुम्ही जर बांधकाम कामगार असाल construction worker तर तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकरी मंडळ कोणकोणत्या योजना राबवितात या संदर्भात माहिती असायलाच हवी. जेणे करून तुम्ही या योजनांचा लाभ घेवू शकाल. तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम असाल आणि तुमचा मुलगा किंवा मुलगी शाळेत जात असेल तर त्यांना ५ हजार ते १० हजार रुपये अनुदान स्कॉलरशिप म्हणून मिळू शकते. नोंदणी केली नसेल तर खलील लिंक वर टच करून तुम्ही ऑनलाइन नोंदणी करू शकता. बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजना आवश्यक कागदपत्रे • ज्या विद्यार्थ्याचा अर्ज सादर करणार आहात त्याच्या शाळेतील उपस्थिती ७५ टक्के असल्याचे उपस्थिती प्रमाण पत्र. • शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र Bonafied Certificate. • अर्जदाराचे आधार कार्ड. • Self Declaration स्वयंघोषणापत्र. • राशन कार्ड अपलोड करावे. कोणत्या इय्यतेसाठी किती पैसे मिळणार • बांधकाम कामगारांचे दोन्ही पाल्य शाळेत असतील तर इयत्ता १ ली ते ७ वी साठी प्रत्येक वर्षाला मिळणार २ हजार पाचशे रुपये किंवा ८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी ५००० रुपये मिळतील. • पाल्य किंवा कामगार यांची पत्नी शिक्षण घेत असे तर अशावेळी त्यांना २०,००० रुपयापर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. • बांधकाम कामगार यांचा पाल्य किंवा पत्नी वैद्यकीय पदवीचे शिक्षण घेत असेल तर त्यांना प्रतिवर्ष १,००,००० तर अभियांत्रिकी पदवी शिक्षणासाठी ६०,००० एवढे अनुदान मिळेल. बां...

बांधकाम कामगार संघटनेची शिरवडे येथे सहविचार बैठक

बांधकाम कामगार संघटनेची शिरवडे येथे सहविचार बैठक कुडाळ, ता. १० ः कामगारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्व संघटना एकवटल्या पाहिजेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बांधकाम कल्याणकारी संघाचे जिल्हाध्यक्ष बाबल नांदोसकर यांनी केले. संघटनेच्या माध्यमातून शिरवडे (ता. मालवण) येथे बांधकाम कामगारांची सहविचार बैठक घेण्यात आली. यावेळी नोंदणी नूतनीकरण व अन्य लाभ या विषयांवर संघटनाध्यक्ष नांदोस्कर, सचिव रवींद्र साळकर, सहसचिव अनिल कदम, उपसमिती अध्यक्ष रवींद्र चव्हाण, सदस्य निकिता गावकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बांधकाम कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. नांदोसकर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात बांधकाम कामगार मोठ्या संख्येने आहेत. कित्येक वर्षांपासून त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी सातत्याने शासन दरबारी आवाज उठवण्यासाठी कार्यरत बांधकाम कामगारांच्या संघटना एकवटल्या पाहिजेत. संघटना मजबूत असेल तर यश दूर नाही. शासनाकडून आपल्या मागण्या मान्य करून घेऊ शकतो. राज्याच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणे तेवढेच महत्त्वाचे असून यासाठी कामगार संघटनांनी एकजूट करणे आवश्‍यक आहे.’’