बांधकाम कामगार दिवाळी बोनस

  1. विविध मागण्यांसाठी १८ आक्टोंबरला लाल बावटा कामगार संघटनेचा धडक मोर्चा
  2. बांधकाम कामगार सेनेतर्फे ठिय्या आंदोलन
  3. जालना : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना १० हजार दिवाळी बोनस द्या
  4. इमारत बांधकाम कामगारांची होणार दिवाळी गोड


Download: बांधकाम कामगार दिवाळी बोनस
Size: 62.65 MB

विविध मागण्यांसाठी १८ आक्टोंबरला लाल बावटा कामगार संघटनेचा धडक मोर्चा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी १० हजार बोनस द्या व पेंडीग कोविड अनुदान कामगारांच्या खात्यावर तत्काळ जमा करा, आदीसह विविध मागण्यांसाठी १८ आक्टोंबरला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. भरमा कांबळे व जिल्हा सचिव कॉ. शिवाजी मगदूम यांनी आज (शुक्रवार) पत्रकार बैठकीत दिली. दिवाळीचा सण तोंडावर आला आहे.गेल्या वर्षभरात कोरोना आणि महापुरामुळे बांधकाम कामगार अस्वस्थ आहे.त्यामुळे त्यांना कल्याणकारी मंडळाकडून दिवाळी बोनस देवून दिलासा द्यावा. तसेच सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाकडे दाखल केलेले ऑफलाईन व ऑनलाईन सर्व लाभाच्या अर्जाचा तात्काळ निपटारा केला पाहिजे. महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे लाभ देण्याचे सर्व अधिकार हे स्थानिक कार्यालयांना होते, परंतु पूर्वीच्या भाजप सरकारने ते सर्व अधिकार मुंबई कार्यालयाकडे ठेवल्याने कामगारांना लाभ मिळताना मोठ्या अडचणी येत आहेत. मंडळाने जाहीर केलेले मागील कोविड अनुदान अनुक्रमे २ हजार व ३ हजार अद्याप काही कामगारांना मिळालेले नाही. तसेच सध्याचे १५०० रूपये कोविड अनुदान सुद्धा बहुतांशी कामगारांना मिळालेले नाही. कोल्हापूर कार्यालयाने १ जून २०२१ रोजी मंडळाकडे साधारण ४ हजार ३०० हून अधिक कामगारांची यादी मंडळाकडे पाठवून सुद्धा मंडळाने अध्याप त्या कामगारांच्या खात्यावर रक्कम वर्ग केलेली नाही. मंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून कामगारांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी विलंब लागत असल्याने, लाभ देण्याचे सर्व अधिकार स्थानिक कार्यालयांना द्यावेत, आदीसह खालील मागण्यासाठी १८ आक्टोंबरला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडक देत आहोत. मागण्या :- १) महापुरामध...

बांधकाम कामगार सेनेतर्फे ठिय्या आंदोलन

इचलकरंजी, ता. ७ : नोंदीत बांधकाम कामगारांना दहा हजार रुपये दिवाळी बोनस द्यावा. बंद असलेली मेडीक्लेम योजना सुरू करावी. यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेतर्फे सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. आंदोलनात सहभागी बांधकाम कामागारांनी घोषणाबाजी करीत मागणीचे निवेदन शॉप निरीक्षक महेश हेंद्रे यांना दिले. विविध मागणीचे निवेदन देऊन पंधरा दिवस झाले. मात्र, अद्याप निर्णय न झाल्याने आज सहायक कामगार आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र एक वर्षापासून नोंदीत बांधकाम कामगारांना ऑनलाईन भरलेले विविध लाभाचे पैसे मिळालेले नाही. तसेच नवीन नोंदणी व नूतनीकरण केलेले ऑनलाईन अर्जही सहा महिने तपासले नाहीत. इचलकरंजी कामगार आयुक्त कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे अनेक बांधकाम कामगारांचे नुकसान होत आहे. दिवाळी पंधरा दिवसांवर असून दहा हजार फक्त सानुग्रह अनुदान मिळावे, असे निवेदनात नमूद केले आहे. राजेंद्र निकम, सद्दाम मुजावर, सूर्यकांत लोंढे, विनायक सुतार, अल्ताफ नायकवाडे, बाबू पुजारी उपस्थित होते.

जालना : नोंदणीकृत बांधकाम कामगारांना १० हजार दिवाळी बोनस द्या

जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेचे मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने जालना, ता. १८ : सिटू संलग्न जालना जिल्हा बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने बांधकाम कामगारांच्या विविध न्याय मागण्यासाठी व प्रलंबित प्रश्नांसाठी मंडळाच्या कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच कामगार अधिकारी तथा नोंदणी अधिकारी यांच्या मार्फत मुख्यकार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, सन २०१७ मध्ये बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान म्हणून रु.५,००० देण्यात आले होते ते २०१९ मध्ये बंद केले. त्याच धर्तीवर यावर्षीही दिवाळी सणासाठी बोनस म्हणून १० हजार रु. द्यावे, कामगारांच्या पाल्यांचे शिष्यवृत्ती व विविध योजनेचे २ वर्षापासून प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढावे, करोना काळातील दिलेल्या अर्थसहाय्यापासून वंचित राहिलेल्या कामगारांना त्वरीत अर्थसहाय्य वाटप करावे. ऑनलाईन नोंदणी व नुतनीकरणाचे अर्ज दाखल केल्यानंतर ८ दिवसात तपासणी करून पावत्या व स्मार्ट करण्यात यावे, आदी मागण्या सिटू प्रणीत बांधकाम कामगार राष्ट्रीय फेडरेशनच्या वतीने करण्यात आल्या आहेत. यावेळी सिटूचे जिल्हाध्यक्ष कॉ.मधुकर मोकळे, संघटनेचे कोषाध्यक्ष कॉ.सुभाष मोहिते, ऍड.अनिल मिसाळ, कॉ.शरद ढेरे, कॉ.दीपक शेळके, कॉ. प्रभाकर चोरमारे, शरद डुकरे, अहेमद मिस्त्री, गजानन पातरफळे, सुधाकर कोथळकर, विजय बोर्डे, सर्जेराव बरसाले, बाबासाहेब पाटोळे यांच्यासह मोठ्या संख्येने बांधकाम कामगार आंदोलनात सहभागी होते.

इमारत बांधकाम कामगारांची होणार दिवाळी गोड

हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी झालेल्या इमारत बांधकाम कामगारांना प्रत्येकी पाच हजार रूपये दिवाळी बोनस देण्याचा प्रस्ताव दिला असल्यांचे कळले आहे लवकरच सर्व नोंदीत इमारत बांधकाम कामगार यांना दिवाळी बोनस म्हणुन ५००० रूपये देण्याचे जाहिर केले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व इमारत बांधकाम कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे कोरोनाच्या झटक्याने सर्वच कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवला होता अस्यात हि घोषणा दिलासा देणारी आहे पण तरी आता सर्वच कामगारांची मागणी आहे कि ज्या कामगारांचे नुतनी करण राहिले आहे त्यांना हि या दिवाळी बोनसचा लाभ मिळावा सरकारने लवकरात लवकर दिवाळी बोनस द्यावा तरच कामगारांची दिवाळी गोड होईल ... व हा दिवाळी बोनस दिवाळी आधी कामगारांच्या खात्यावर वर्ग व्हावा जे ने करून दिवाळीची खरीदी इमारत बांधकाम कामगारांना करता येईल शासनाने कोटीं रूपये खर्चून शासकिय इमारत बांधुन आम्हाला मिळाल काय या विचारांचे मनात नगारे वाजतात आणि अंतर्मुख झाल्यावर हि अस्तव्यस्त व्यवस्था नको नको होते आणि वाटत आम्ही आजवर निरपेक्षतुन मिळावल काय गमावलं तर इतकं आहे की त्याचा हिशोब नाही शासकिय इमारतीवर कित्येक कोटी रुपये खर्च करून आम्हाला काय दिलं तर फक्त शासकिय रूग्णालय म्हणुन साधी विलाज हिन इमारत शासकिय शिक्षण हिन इमारतआज समाजातील अनेक घटक हे विलाजा अभावी मरत आहे कुजत आहे आर्थिकदृष्टया संपत आहे कारण शासकिय विलाज व्यवस्था शिक्षण व्यवस्था हि खाजगीकरणा मुळे अधुनिकरणाच्या नावावर रसातळा गेली आहे त्यात राज्यकर्त्यां बरोबर अनेक रित्या आजचा नागरीक हा विचार हिन निर्बुद्धी होऊन जातीपाती करता लढतांना दिसतो पण सदृढ व्यवस्था मिळवा म्हणुन कधी झटतांन...