भाग्य दिले तू मला

  1. 'भाग्य दिले तू मला' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, कावेरीच्या जिवाला धोका? नवा प्रोमो पाहून प्रेक्षक झाले नाराज bhagya dile tu mala marathi serial new promo release


Download: भाग्य दिले तू मला
Size: 59.31 MB

'भाग्य दिले तू मला' मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, कावेरीच्या जिवाला धोका? नवा प्रोमो पाहून प्रेक्षक झाले नाराज bhagya dile tu mala marathi serial new promo release

‘भाग्य दिले तू मला’ ही ‘कलर्स मराठी’वरील मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. मालिकेत अभिनेता विवेक सांगळे आणि अभिनेत्री तन्वी मुंडले राज-कावेरीची प्रमुख भूमिका साकारत आहेत. राज-कावेरीच्या जोडीने प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली आहे. मात्र, लवकरच या मालिकेत एक नवा ट्विस्ट येणार आहे. या आगामी कथानकाचा एक प्रोमो मालिकेतील कलाकारांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा प्रोमो पाहून प्रेक्षकवर्ग काहीसा नाराज झाला आहे. “आता फक्त आठवणीतच…”, शशांक केतकरचा वडिलोपार्जित वाडा पाडला जाणार; म्हणाला, “एका घराऐवजी…” ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने राज-कावेरीच्या लग्नानंतर वेगळे वळण घेतले होते. राजवर्धन आणि त्याच्या आईची सगळी प्रॉपर्टी वैदेही आणि सानियाने हस्तगत केल्यामुळे मोहिते कुटुंबीय ‘माहेरचा चहा’ या कंपनीची नव्याने सुरुवात करतात, असे दाखवण्यात आले होते. या सगळ्या संकटांनंतर राजची आई रत्नमाला मोहिते एक नवी सुरुवात म्हणून राज-कावेरीला हनिमूनला पाठवण्याचा निर्णय घेतात. मात्र, दुसरीकडे सानियाने राज- कावेरीच्या घातपाताचा कट रचला आहे. हेही वाचा : मालिकेत येणाऱ्या या नव्या ट्विस्टचा प्रोमो सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला असून हा प्रोमो राज-कावेरीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तन्वी मुंडले आणि अभिनेता विवेक सांगळेने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये राज-कावेरी हनिमूनला गेले असताना एक व्यक्ती कावेरीला धक्का मारून दरीत ढकलते असे दाखवण्यात आले आहे. प्रोमो पाहून प्रेक्षक काहीसे नाराज झाले आहेत. हेही वाचा : नवा प्रोमो पाहून प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त करीत अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने “राज-कावेरीचे लग्न झाल्यापासून एकही प्रोमो चांगला दाखवला नाही,” अशी प्रतिक्रिया दिली असून दुसऱ्या एका युजरने...