भेटला विठ्ठल

  1. जेव्हा मला विठ्ठल भेटला...


Download: भेटला विठ्ठल
Size: 3.25 MB

जेव्हा मला विठ्ठल भेटला...

पंढरपुरी, युगे अठ्ठावीस हात कटीवर ठेवून, विटेवर उभा राहून, या विश्वाचा जगडव्याळ व्याप शांतपणे पाहत आहे पांडुरंग! कोणाचा विठू, कोणाचा विठोबा, कोणाची विठू माऊली, कोणाचा सखा पांडुरंग तर कोणाचा पंढरीनाथ... असा हा, सर्व जातीधर्म, नाती, लिंगभेद आणि स्थळ-काळाच्या मर्यादा ओलांडून या सर्व चराचरालाव्यापून उरणारा पांडुरंग...आणि त्याच्या ओढीने दर वर्षी पायी वाट तुडवत पंढरपुरची वारी करणारे वारकरी. गेली आठ-नऊ शतके त्या विठू माऊलीच्या चरणाशी तादात्म्य पावत एकरूप होऊन, प्रत्यक्ष उदहरणानेच अद्वैताचे तत्त्वज्ञान सांगत, समाजातील अनिष्ट चालीरीती, अंधश्रद्धा, अज्ञान दूर करण्याचे काम या वारकरी संप्रदायातील संत करत आहेत. असा संप्रदाय जगाच्या पाठीवर विरळाच. 'एक तरी ओवी अनुभवावी म्हणतात. त्यापुढे जाऊन मी म्हणेन 'एक तरी वारी अनुभवावी'. खरंच, कधीतरी सहज एखाद्या दिंडीत एखाद्या वारकाऱ्याबरोबर चालून बघा, त्याची विठ्ठलाची ओढ एवढी की तुम्हाला त्याच्यामागे धावावं लागेल. एखाद्या माऊलीला सहज विचारून बघा, कितवी वारी मावशी? तीला कदाचित आकडा आठवणारही नाही; पण ती तुम्हाला वेगवेगळ्या रूपात भेटलेल्या विठू सावळ्याच्या गोष्टी नक्की सांगेल. कधी तो तीला शिवारात भेटला असेल, कधी बाजारात जड टोपली उचलताना कोणीतरी पुढे केलेल्या हातात भेटला असेल. कोणाला अगदीच हाता-तोंडाशी आलेलं पीक जातंय की काय झालेलं असताना बरसलेल्या पावसात भेटला असेल. कोणाला शेवटची बस निघून गेल्यावर अवचित भेटलेल्या फटफटीवाल्याच्या रूपात भेटला असेल. असा हा पांडुरंग, श्रद्धा असेल त्याला फुला-पानांत, जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी तो सापडतो आणि मग तो वारकरी गाऊ लागतो कांदा, मुळा, भाजी| अवघी विठा बाई माझी| लहानपणापासून ही संत परंपरा पाहत मी मोठी झाले. माझे बाबा दा...