बहरला हा मधुमास song download

  1. Ricky Pond Share Dance Video On Maharashtra Shahir Movie Song Baharla Ha Madhumas
  2. Japanese Dancer Danced On Baharla Ha Madhumas Song Video Viral On Social Media
  3. VIDEO : ‘महाराष्ट्र शाहीर’च्या ‘बहरला हा मधुमास’वर हिंदी कलाकारही थिरकले, जबरदस्त डान्स व्हायरल
  4. जपानच्या युट्यूबर्सनाही पडली 'बहरला हा मधुमास'ची भूरळ, हा Video एकदा पाहाच
  5. Viral Video: किली पॉललाही पडली ‘बहरला हा मधुमास’ची भुरळ; बहीण निमासोबत धरला ठेका! पाहा व्हिडीओ
  6. Video : माधुरी दीक्षितला 'बहरला हा मधुमास' गाण्याची भुरळ, केदार शिंदे कमेंट करत म्हणाले...


Download: बहरला हा मधुमास song download
Size: 28.47 MB

Ricky Pond Share Dance Video On Maharashtra Shahir Movie Song Baharla Ha Madhumas

Ricky Pond: प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रिकी पाँडनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओला त्यानं कॅप्शन दिलं, मला या गाण्याबद्दल सांगा, 'मला वाटतंय मी छान डान्स केला आहे.मला या गाण्याची हुक स्टेप आवडली. ' रिकीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्स केल्या आहेत. रिकीच्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स रिकी पाँडच्या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्यानं या व्हिडीओला कमेंट केली, 'आपला रिकी तात्या' तर दुसऱ्या युझरनं कमेंट केली, 'खुप छान' पाहा व्हिडीओ: महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. या चित्रपटात अंकुशसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. अजय-अतुल यांनी महाराष्ट्र शाहीर या चित्रपटामधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. ' वाचा इतर महत्वाच्या बातम्या: Published at : 05 Apr 2023 01:55 PM (IST) Tags:

Japanese Dancer Danced On Baharla Ha Madhumas Song Video Viral On Social Media

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र शाहीर (Maharashtra Shahir) या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास नवा' (Baharla Ha Madhumas) हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. अनेक नेटकरी या गाण्यावर रिल्स करत आहेत. फक्त भारतातील नाही तर परदेशातील लोकांना देखील 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्याची भूरळ पडली आहे.काही दिवसांपूर्वी टांझानियाच्या काकेताकु नावाच्या जपानी कलाकारानं 'बहरला हा मधुमास नवा' या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तसेच पिरो PIRO असं नाव असणारी जपानी डान्सर देखील या व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. पाहा व्हिडीओ: महाराष्ट्र शाहीर हा चित्रपट लोकशाहीर आणि लोकनाट्यकार स्वर्गीय कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या आयुष्यावर आधारित आहे.या चित्रपटात अंकुश चौथरीसोबतच अतुल काळे, अमित डोलावत, सना केदार शिंदे या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटातील गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाची निर्मिती संजय छाब्रिया आणि बेला केदार शिंदे यांनी केली आहे. वाचा इतर महत्वाच्या बातम्या: Published at : 12 May 2023 02:49 PM (IST) Tags:

VIDEO : ‘महाराष्ट्र शाहीर’च्या ‘बहरला हा मधुमास’वर हिंदी कलाकारही थिरकले, जबरदस्त डान्स व्हायरल

VIDEO : ‘महाराष्ट्र शाहीर’च्या ‘बहरला हा मधुमास’वर हिंदी कलाकारही थिरकले, जबरदस्त डान्स व्हायरल Baharla Ha Madhumaas : ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं सोशल मीडियावर चांगलच ट्रेंड होत आहे. या गाण्यानं फक्त मराठी प्रेक्षकांना नाही तर सगळ्यांना वेड लावलं आहे. आता चक्क हिंदी कलाकार या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. हे पाहून नक्कीच सगळ्यांना आनंद झाला आहे. सध्या सोशल मीडियावर सगळ्यांना वेड लावलं आहे ते म्हणजे केदार शिंदे दिग्दर्शित ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील गाण्यानं. सध्या चर्चेत आहे ते गाणं म्हणजे ‘बहरला हा मधुमास’. या गाण्यावर सगळेच रील व्हिडीओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करताना दिसत आहेत. या गाण्यानं फक्त मराठी लोकांना नाही तर अनेक हिंदी सेलिब्रिटींना देखील वेड लावलं आहे. तुम्हाला या वर विश्वास बसत नसेल पण असं झालं आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीनं सोशल मीडियावर ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर रील व्हिडीओ शेअर केला आहे. देवोलिनानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा रील व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत देवोलिनानं पैठणी साडी नेसली आहे. देवोलिनाच्या या साडीचा रंग लाल आणि हिरवा आहे. हातात हिरव्या बांगड्या व पारंपरिक दागिन्यांचा साज करत मराठमोळा लूक केला आहे. देवोलिनानं शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. तर देवोलिनानं अप्रतिम डान्सही केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत देवोलिनानं कॅप्शन दिलं की कारण हे सध्या ट्रेन्ड करत आहे. तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट केल्या आहेत. देवोलिनाच्या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहे...

जपानच्या युट्यूबर्सनाही पडली 'बहरला हा मधुमास'ची भूरळ, हा Video एकदा पाहाच

जपानच्या युट्यूबर्सनाही पडली 'बहरला हा मधुमास'ची भूरळ, हा Video एकदा पाहाच Japan Artist Reel on Baharala Ha Madhumas: 'महाराष्ट्र शाहीर' (Maharashatra Saheer) या चित्रपटातील 'बहरला हा मधुमास' (Baharala Ha Madhumas) हे गाणं सध्या जगभर व्हायरल झालं आहे. सध्या जगभरातील चाहते या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. तेव्हा अशाच एका जपानमधल्या कलाकारांनीही या गाण्यावर रिल (Baharala Ha Madhumas Reel) तयार केलं आहे आणि जे सगळीकडेच व्हायरल झालं आहे. तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का? Japan Artist Reel on Baharala Ha Madhumas: 28 एप्रिलला 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं चांगला गल्ला भरला आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपले आजोबा आणि महाराष्ट्राचे लाडके कलाकार शाहीर साबळे यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. या चित्रपटातून केदार शिंदे यांची लेक सना शिंदेही प्रमुख भुमिकेत आहेत. हा तिचा पहिलाच चित्रपट असून सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता अंकुश चौधरीनं (Ankush Choudhary) या चित्रपटातून शाहीर साबळेची भुमिका निभावली आहे. सना शिंदे आणि अकुंश चौधरी यांच्या भुमिकेचे सर्वत्र कौतुक झाले आहे. या चित्रपटातील बहरला हा मधुमास हे गाणं प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर उचलून धरला आहे. इन्टाग्रामवर चाहते या गाण्याचे रिल्स बनवत आहेत. सध्या हे रिल्सही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यातून फक्त भारतातील चाहतेच नाही तर जगभरातील अनेक चाहते या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत सोबतच या गाण्यावर रिल्सही बनवत आहेत. सैराटमधील झिंगाट या गाण्यानंतर आता बहरला हा मधुमास हे गाणं सो...

Viral Video: किली पॉललाही पडली ‘बहरला हा मधुमास’ची भुरळ; बहीण निमासोबत धरला ठेका! पाहा व्हिडीओ

टांझानियन सोशल मीडिया स्टार किली पॉल आणि त्यांची बहीण निमा पॉल हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. टांझानियातील एका आदिवासी भागातील भावाबहिणीची ही जोडी प्रत्येक ट्रेंडवर व्हिडीओ बनवताना दिसते. हिंदीचं नव्हे तर, मराठी गाण्यांवरचं त्यांचं प्रेम देखील अनेकदा नेटकऱ्यांनी पाहिलं आहे. आता ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावरील व्हायरल रील पाहून किली आणि निमाला देखील यावर व्हिडीओ करायचा मोह आवरला नाहीये. त्यांनी देखील यावर व्हिडीओ तयार केला आहे. Abdu Rozik-MC Stan: अब्दू रोझिक आणि एमसी स्टॅनमधील मधील वाद मिटले? ‘या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण! या व्हिडीओमध्ये किली आणि निमा दोघेही त्यांच्या पारंपारिक वेशात ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावर ताल धरताना दिसले आहेत. किली पॉल आणि त्याची बहीण निमा यांनी या डान्स व्हिडीओला रिक्रिएट करताना या गाण्याची हूक स्टेप कॉपी केली आहे. ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्याच्या डान्स स्टेप लक्षात ठेवून किली आणि निमाने हा व्हिडीओ तयार केला आहे. भावा-बहिणींचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आला आहे. दोघांच्या या व्हिडीओवर नेटकरी लाईक्सचा वर्षाव करत आहेत. नेटकरी कमेंट्स करून या दोघांचे कौतुक करत आहेत. शाहीर साबळे यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान होते. लोककलेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र आणि राज्याभिमान जागविण्याचे काम केले. या कार्याच्या माध्यामतून ते अनेक जाज्ज्वल्य प्रतिभा असलेल्या मान्यवरांच्या सानिध्यात आले. ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटाच्या निमित्ताने यातील काही व्यक्तिमत्त्वे रुपेरी पडद्यावर अवतरणार आहेत. २८ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Video : माधुरी दीक्षितला 'बहरला हा मधुमास' गाण्याची भुरळ, केदार शिंदे कमेंट करत म्हणाले...

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित ५६व्या वर्षीही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालते. अभिनय कौशल्याने बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या माधुरीचा चाहता वर्गही मोठा आहे. सध्या माधुरी दीक्षित एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवणाऱ्या डान्सिंग क्वीनला मराठी गाण्याची भुरळ पडली आहे. माधुरी दीक्षितने ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन माधुरीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये माधुरी दीक्षित लाल रंगाची साडी नेसून बहरला हा मधुमास गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. या गाण्याच्या हुक स्टेप्स तिने केल्या आहेत. माधुरी दीक्षितच्या या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हेही वाचा>> ‘बहरला हा मधुमास’ गाण्यावरील माधुरी दीक्षितचा रील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कमेंट केली आहे. “मनापासून धन्यवाद. माझ्या “महाराष्ट्र शाहीर” या चित्रपटातलं हे गाणं आहे. तुम्ही ते सादर केलं याचा मराठी म्हणून विशेष अभिमान आणि आनंद आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. नक्की पाहा एका मराठी थोर कलाकार शाहीर साबळे यांना ती मानवंदना ठरेल. जय महाराष्ट्र,” असं केदार शिंदेंनी कमेंटमध्ये म्हटलं आहे. हेही वाचा>> रीलवर ट्रेंडिंग असलेलं ‘बहरला हा मधुमास’ हे गाणं ‘महाराष्ट्र शाहीर’ या मराठी चित्रपटातील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं असून अंकुश चौधरी व सना शिंदे या सिनेमांत मुख्य भूमिकेत आहेत. २८ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. २ जूनला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी ...