डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

  1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी
  2. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ महापरिनिर्वाण दिवसापुरते?
  3. Mahaparinirvan Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास ‘महापरिनिर्वाण दिन’ का म्हटलं जातं?
  4. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
  5. Mahaparinirvan Diwas 2021 : Dr Babasaheb Ambedkars 65th Death Anniversary
  6. Mahaparinirvan Din 2022: आज महापरिनिर्वाण दिन! जाणून घ्या, डॉ. आंबेडकरांच्या पुण्यतिथीला का म्हटलं जातं महापरिनिर्वाण दिन?


Download: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन
Size: 6.26 MB

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी

Dr Babasaheb Ambedkar mahaparinirvan din : आपली राज्यघटना घडवण्यात डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा होता. त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. बाबासाहेब हे एक महान समाजसुधारक आणि अभ्यासक होते. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेपंडित आणि दलितांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले होते. म्हणून 6 डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. आजच्या या पोस्टमध्ये आपण Contents • 1 डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी | Dr Babasaheb Ambedkar mahaparinirvan din mahiti Marathi • 2 महापरिनिर्वाण म्हणजे काय? • 3 भीमज्योत • 4 भेटी देणारे उल्लेखनीय व्यक्ती • 5 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ) • 5.1 कोणता दिवस ‘महापरीनिर्वाणदिन’ म्हणून साजरा केला जातो? • 5.2 भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? • 5.3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? • 5.4 दीक्षाभूमी नागपूर • 6 सारांश (Summary) डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन माहिती मराठी | Dr Babasaheb Ambedkar mahaparinirvan din mahiti Marathi डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्लीतील त्यांच्या घरी निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला राजगृहावर (दादर) आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये 7 डिसेंबर 1956 रोजी 12 लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. त्यावेळी हिंदू स्मशान भूमी एवढीच त्या जागेची ओळख होती. काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला. आंबेडकरा...

बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार केवळ महापरिनिर्वाण दिवसापुरते?

द पॉईंट नाऊ प्रतिनिधी: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचा आज ६५ वा महापरिनिर्वाण दिन असून यानिमित्ताने फक्त महाराष्ट्र नाही तर जगभरातील अनुयायी दादरमधील चैत्यभूमीवर येत असतात. दरम्यान करोना संकट असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. मात्र यावरुनच चैत्यभूमीवर नाराज कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. अनेक अनुयायी आदल्या दिवशीच दादरमध्ये येऊन थांबत असतात. मात्र यावेळी कोणत्याही सोयीसुविधा नसल्याने संतप्त अनुयायांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तसंच करोनाच्या पार्श्वभूमीवर अभिवादनासाठी आत प्रवेश दिला जात नसल्यानेही त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसंच राजकीय नेते थेट येऊन दर्शन घेत आहेत, त्यासोबत त्यांचे अनेक कार्यकर्तेदेखील त्यापद्धतीने दर्शन घेत आहेत. मग सामान्य माणसाने का रांगेत येऊन दर्शन घ्यावे या निषेधार्थ काही तरुणांनी घोषणाबाजी सुरु केली. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्सही खाली पडले. यानंतर काही अनुयायांमध्येच तसंच पोलिसांसोबत झटापट झाली. पण काही वेळाने परिस्थिती नियंत्रणात आली. दरम्यान हे तरुण केवळ स्टंटबाजी करत असल्याचं तेथील आयोजनकर्त्यांचं म्हणणं आहे. महापरिनिर्वाण दिनी अनेकजण राज्याबरोबरच देशातील वेगवेगळ्या भागांमधून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर येतात तेव्हा ते दादर स्थानकामध्येच उतरतात. त्यामुळेच या स्थानकाला डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून केली जात आहे. आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त भीम आर्मीने आंदोलन करुन ही मागणी पुन्हा केल्याचं पहायला मिळालं. भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी आधी दादर स्थानकासम...

Mahaparinirvan Din : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनास ‘महापरिनिर्वाण दिन’ का म्हटलं जातं?

6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळंच या दिवसाला 'महापरिनिर्वाण दिन' किंवा 'महापरिनिर्वाण दिवस' म्हटलं जातं. • • Last Updated : December 05, 2022, 17:28 IST • Mumbai, India • • • • • • • मुंबई, 5 डिसेंबर: 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन होय. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं. त्यामुळंच या दिवसाला महापरिनिर्वाण म्हणजे काय? बौद्ध धर्मानुसार महापरिनिर्वाण हे आयुष्याचे प्रमुख तत्व आणि ध्येय देखील आहे. संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा सांगितला आहे, याचाच अर्थ ‘मोक्ष’ असा होतो. बौद्ध धर्मानुसार, जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना आणि जीवनातील वेदनांपासून आणि जीवन चक्रातून मुक्त होतो, म्हणजेच तो पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही. लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. बौद्ध धर्मातील लोक बाबासाहेबांना ‘बोधिसत्व’ मानतात. त्यामुळं त्यांच्या पुण्यतिथीसाठी हेही वाचा: चैत्यभूमीला लाखो लोक देतात भेट- मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्याचा थोडक्यात आढावा- • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्यप्रदेशातील इंदौर जिल्ह्यामधील 'महू' येथे झाला. • भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणून त्यांना ओळखलं जातं. स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलं. • अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इकोनॉमिक्समध्ये पी.एच....

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन

आंबेडकरांचे ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्ली येथे निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी ७ डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला दादर येथील राजगृहावर आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये ७ डिसेंबर १९५६ रोजी १२ लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. सर्व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, घरात, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.

Mahaparinirvan Diwas 2021 : Dr Babasaheb Ambedkars 65th Death Anniversary

मुंबई : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन. दरवर्षी महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो भीम अनुयायी मुंबईतल्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येत असतात. यंदा कोरोनाचे निर्बंध शिथिल असले तरी ओमायक्रॉनचं सावट आहे. त्यामुळे लोकांनी गर्दी करू नये, कोरोनाचे नियम पाळूनच अभिवादन करावं असं आवाहन करण्यात आलंय. अनुयायांना थेट ऑनलाइन दर्शनही घेता येणार आहे. महाडच्या चवदार तळ्यावर दलित मित्र खांबे गुरुजी ट्रस्टच्या माध्यमातून अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने महाडच्या चवदार तळे परिसरात मेणबत्या प्रज्वलित करून, अभिवादन करण्यात आलं. महाड आणि परीसरातील शेकडो आंबेडकरी अनुयायी चवदार तळ्यावर उपस्थित होते. भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरीनिर्वाण दिनाच्या पूर्व संध्येला मनमाड शहरातील आंबेडकरी जनतेने कॅण्डल मार्च काढून अभिनव पद्धतीने आपल्या लाडक्या नेत्याला अभिवादन केले. मनमाड शहर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला मानलं जातं. सफेद वस्त्र परिधान करत हातात मेणबत्ती घेवून बुद्धम शरणम गच्छामीच्या जयघोषात शिस्तबद्ध पद्धतीने हा कॅण्डल मार्च काढला. विविध पक्ष, संस्था, संघटना तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते कॅण्डल मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झाले .

Mahaparinirvan Din 2022: आज महापरिनिर्वाण दिन! जाणून घ्या, डॉ. आंबेडकरांच्या पुण्यतिथीला का म्हटलं जातं महापरिनिर्वाण दिन?

• • India • Mahaparinirvan Din 2022: आज महापरिनिर्वाण दिन! जाणून घ्या, डॉ.आंबेडकरांच्या पुण्यतिथीला का म्हटलं जातं महापरिनिर्वाण दिन? Mahaparinirvan Din 2022: आज महापरिनिर्वाण दिन! जाणून घ्या, डॉ. आंबेडकरांच्या पुण्यतिथीला का म्हटलं जातं महापरिनिर्वाण दिन? Mahaparinirvan Din 2022 : डॉ. आंबेडकर यांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास केला आणि 14 ऑक्टोबर 1956 रोजी त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे अंतिम संस्कारही बौद्ध धर्मानुसार करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर Mahaparinirvan Din 2022 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar ) यांचा आज म्हणजेच 6 डिसेंबर रोजी स्मृतिदिन आहे. 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला होता. या दिवसाला ‘महापरिनिर्वाण दिन’ (Mahaparinirvan Diwas) म्हटलं जातं. डॉ. बाबासाहेबांवर महापरिनिर्वाणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 डिसेंबर रोजी मुंबईमधील दादरस्थित चैत्यभूमी येथे बौद्ध धर्मानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. Also Read: • • • परिनिर्वाण म्हणजे काय बौद्ध धर्मात अनेक तत्व सांगितले आहे. त्या पैकी एक म्हणजे परिनिर्वाण. परिनिर्वाण म्हणजे मृत्यूनंतरचे निर्वाण, जो मनुष्य निर्वाण प्राप्त करतो तो संसारीक आसक्ती, इच्छा आणि जीवनातील दुःखांपासून मुक्त राहतो. यासोबतच तो व्यक्ती जीवन चक्रातूनही मुक्त राहतो. पण निर्वाण मिळवणे इतके सोपे नाही. त्यासाठी सदाचारी आणि धार्मिक जीवन जगावे लागते. बौद्ध धर्मात भगवान बुद्धांच्या मृत्यूला महापरिनिर्वाण म्हणतात. यासह संस्कृतमध्ये महापरिनिर्वाण या शब्दाचा अर्थ ‘परिणीबाना’ असा असून याचाच अर्थ ‘मोक्ष’ होतो. ब...