धाक समानार्थी शब्द मराठी

  1. मराठी शब्दकोशातील धाक व्याख्या आणि समानार्थी शब्द


Download: धाक समानार्थी शब्द मराठी
Size: 20.59 MB

मराठी शब्दकोशातील धाक व्याख्या आणि समानार्थी शब्द

धाक—पु. भय; धास्ती; दहशत, जरब; वचक; दरारा. (क्रि॰बाळगणें; धरणें; राखणें). 'तैसा कौरवां अशेखां । धाकु तुझा ।'-ज्ञा २.२१५. (वाप्र.) धाक दाखविणें-भीति, दहशत घालणें;दरारा ठेवणें. ॰फिटणें, ॰उडणें-भीति जाणें; दरारा न वाटणें.'तेंवीं त्याचा समूळ धाक । फिटून गेला तत्काळ ।' -नव २४.१४९. 'चालला शिंदा दखनचा धाक उडाला ।' -ऐपो ४३३.धाक लावणें-भीति वाटेल असें करणें, वागणें; धाक दपटशादाखविणें; जरबेंत ठेवणें. 'तूं असतां मत्पक्षी लाविन मी धाकलोकपाळाला ।' -मोभीष्म ११.१९. [हिं.] ॰दरारा-पु. दह-शत; वचक; जरब; भीति आणि धास्ती. (क्रि॰ पडणें; असणें;बसणें; बाळगणें; धरणें; राखणें). धाक ना धोका-कांहीं भीति,आदर नसणें; मुळींच धास्ती न वाटणें. पूर्ण निर्भीड, निर्भय, बेडरवृत्ति. ॰धुकी,धूक-स्त्री. धाकडधुकड पहा.