दिसणारा हरिपाठ

  1. ॥ Haripatha by five Marathi Saints ॥
  2. संत निवृत्तीनाथ हरिपाठ


Download: दिसणारा हरिपाठ
Size: 20.68 MB

॥ Haripatha by five Marathi Saints ॥

॥ Haripatha by five Marathi Saints ॥ ॥ श्री पंचरत्न हरिपाठ ॥ ॥ श्री पंचरत्न हरिपाठ ॥ १ श्रीज्ञानेश्वरमहाराजकृत हरिपाठाचे अभंग ॥ श्री गणेशाय नमः ॥ १ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥ ४ ॥ २ चहूं वेदीं जाण षट्शास्त्रीं कारण । अठराहीं पुराणें हरीसी गाती ॥ १ ॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तूं दुर्गमा न घालीं मन ॥ ३ ॥ पाठभेद -वायां दुर्गमी न घालीं मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥ ३ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥ सगुण निर्गुण गुणांचें अगुण । हरिविणें मत व्यर्थ जाय ॥ २ ॥ अव्यक्त निराकार राहीं ज्या आकार । जेथुनी चराचर त्यासी भजें ॥ ३ ॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनीं पुण्य होय ॥ ४ ४ भावेंवीण भक्ति भक्तिवीण मुक्ति । बळेंवीण शक्ति बोलूं नये ॥ १ ॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥ १ ॥ सायासें करिसी प्रपञ्च दिननिशीं । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥ ४ ॥ ५ योग याग विधी येणें नोहे सिद्धि । वायांचि उपाधि दंभधर्म ॥ १ ॥ भावेंवीण देव न कळे निःसंदेह । गुरुवीण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥ तपेवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेवीण हित कोण सांगे ॥ ३ ॥ ज्ञानदेव मार्ग दृष्टांताची मात । साधूचे संगती तरुणोपाय ॥ ४ ॥ ६ साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥ १ ॥...

संत निवृत्तीनाथ हरिपाठ

हरिविण दैवत नाहीं पैं अनुचित्तीं । अखंड श्रीपती नाम वाचॆ ।। १।। रामकृष्ण मूर्ति या जपा आवृत्ती । नित्य नामॆं तृप्ती जाली आम्हां ।। २।। नामाचॆनि स्मरणॆं नित्य पैं सुखांत । दुजीयाची मात नॆणॊ आम्ही ।। ३।। निवृत्ति जपतु अखंड नामावळी । हृदयकमळीं कॆशीराज ।। ४।। संत निवृत्तीनाथ हरिपाठ – २ हरिविण चित्तीं न धरीं विपरीत । तरताती पतित रामनामॆं ।। १।। विचारुनी पाहा ग्रंथ हॆ अवघॆ । जॆथॆं तॆथॆं सांग रामनाम ।। २।। व्यासादिक भलॆ रामनामापाठीं । नित्यता वैकुंठीं तयां घर ।। ३।। शुकादिक मुनि विरक्त संसारीं । रामनाम निर्धारीं उच्चारिलॆं ।। ४।। चॊरटा वाल्मीकि रामनामीं रत । तॊही ऎक तरत रामनामीं ।। ५।। निवृत्ति साचार रामनामी दृढ । वघॆचि गूढ उगविलॆ ।। ६।। ३ हरिमार्ग सार यॆणॆंचि तरिजॆ । यॆरवीं उभिजॆ संसार रथ ।। १।। जपतां श्रीहरी मॊक्ष नांदॆ नित्य । तरॆल पैं सत्य हरि नामॆं ।। २।। काय हॆं ऒखद नामनामामृत । हरिनामॆं तृप्त करी राया ।। ३।। निवृत्ति साचार हरिनाम जपत । नित्य हृदयांत हरी हरी ।। ४।। संत निवृत्तीनाथ हरिपाठ –४ ऎकॆविण दुजॆं नाहीं पैं यॆ सृष्टी । हॆं ध्यान किरीटी दिधलॆं हरी ।। १।। नित्य या श्रीहरि जनीं पैं भरला । द्वैताचा अबॊला तया घरीं ।। २।। हरीविणॆं दॆवॊ नाहीं नाहीं जनीं । अखंड पर्वणी हरी जपतां ।। ३।। निवृत्ति साकार हरिनाम पाठ । नित्यता वैकुंठ हरिपाठ ।। ४।। संत निवृत्तीनाथ हरिपाठ –५ जपतां कुंटिणी उतरॆ विमान । नाम नारायण आलॆं मुखा ।। १।। नारायण नाम तारक तॆं आम्हां । नॆणॊं पैं महिमा अन्य तत्त्वीं ।। २।। तरिलॆ पतित नारायण नामॆं । उद्धरिलॆ प्रॆमॆं हरिभक्त ।। ३।। निवृत्ति उच्चार नारायण नाम । दिननिशी प्रॆम हरी हरी ।। ४।। संत निवृत्तीनाथ हरिपाठ –६ ऎक तत्त्व हरि असॆ पैं सर्वत्र । ऐसॆं सर्वत्र शास्त्र...