Divya marathi epaper amravati

  1. गुजरातच्या बनावट बियाण्याचे वर्ध्यात फुटले बिंग; साठ लाखांचे बियाणे जप्त


Download: Divya marathi epaper amravati
Size: 23.34 MB

गुजरातच्या बनावट बियाण्याचे वर्ध्यात फुटले बिंग; साठ लाखांचे बियाणे जप्त

झटपट पैसे कमावण्यासाठी सेलू तालुक्यातील एक जण चक्क गुजरातेतून बनावट कपाशीचे बियाणे आणून शेतकऱ्यांच्या माथी मारत होता. अखेर त्याचे बिंग फुटले आणि ५६ लाख ८८ हजार ८०० रुपयांचे बियाणे तर इतर साहित्य एकूण किंमत १ कोटी ५५ लाख ८३ हजार ९७० रुपये जप्त करत १४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत चौघाजणांना ताब्यात घेण्यात आले. रेहकी येथील राजू सुभाष जयस्वाल (३८) याच्यासह १४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूने झटपट पैसे कमावण्यासाठी चक्क बोगस बियाणे विक्रीचा फंडा सुरू करण्याचे ठरवले. गुजरात राज्यातील अहमदाबाद जिल्ह्यातील ईडर येथील राजाभाई व महेंद्रभाई रादरामली येथून कपाशीचे बनावट बियाणे विक्रीसाठी वर्धात घेऊन आला. वर्ध्यातील म्हसाळा येथील नवीन जागा विकत घेऊन त्या जागेवर दोन रूमचे घर बांधून त्या ठिकाणी बनावट बियाण्याचे पॅकेट तयार करत गावातील व इतर राज्यातील युवकांच्या मदतीने जिल्ह्यातील कृषी केंद्रात विक्रीसाठी उपलब्ध करून दिले. तक्रार प्राप्त होताच कृषी विभागाने धाड टाकून बियाणे जप्त केले. तालुका कृषी अधिकारी सुभाष शामरावजी मुंडे (५४, रा. सुराणा लेआऊट, नालवाडी, वर्धा) यांनी सेवाग्राम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी धरमसिंग यादव (२७, रा. जौनपूर, युपी), राजकुमार वडमे (३९, रा. रेहकी, ता. सेलू), हरिश्चंद्र उईके (१८, रा. राडोंगरी, जि. छिंदवाडा, एमपी), अमन धुर्वे (१८, रा. लास, जि. छिंदवाडा), सुदामा सोमकुंवर (२७, रा. लास, जि. छिंदवाडा), गजू बोरकर (रा. सेलू, वर्धा), विजय बोरकर (रा. हमदापूर, वर्धा), प्रवीण (रा. वरोरा, चंद्रपूर), वैभव भोंग (रा. अमरावती), हीना किराणाचे मालक पंकज जगताप (यवतमाळ), गजभिये (क्रिस्टल कंपनी नागपूर), गजू ठाकरे (रा. कारला रोड, वर्धा), शुभम बेद (रा. वर्धा) या १...