एकनाथ शिंदे

  1. "एकनाथ शिंदेंची मोठी झेप, देवेंद्र फडणवीसांना...", शिंदे गटाच्या जाहिरातीचं छगन भुजबळांना आश्चर्य; म्हणाले...
  2. Eknath shinde News: Eknath shinde News in Marathi, Photos, Latest News Headlines about एकनाथ शिंदे Loksatta.com


Download: एकनाथ शिंदे
Size: 37.56 MB

"एकनाथ शिंदेंची मोठी झेप, देवेंद्र फडणवीसांना...", शिंदे गटाच्या जाहिरातीचं छगन भुजबळांना आश्चर्य; म्हणाले...

शिवसेनेच्या शिंदे गटाने आज (मंगळवार, १३ जून) अनेक वर्तमान पत्रांमध्ये एक जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत त्यांनी एक सर्वेक्षण प्रसिद्ध केलं आहे. या सर्वेक्षणानुसार राज्यातल्या जनतेने मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना सर्वाधिक पसंती दर्शवली आहे. या बाबतीत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागे असल्याचा दावा केला आहे. तसेच ‘राष्ट्रात मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशा मथळ्याखाली ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मथळ्याद्वारे शिंदे गटाने भाजपाची ‘देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र’ ही घोषणा मागे टाकली आहे. शिंदे गटाच्या या जाहिरातीवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे गटाची जाहिरात पाहून आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, पूर्वी शिंदेंच्या जाहिरातीत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस असायचे. दोघांचे एकत्र फोटो लावले जायचे. परंतु ही जाहिरात पाहून मला आश्चर्य वाटलं. पूर्वी फडणवीसांचा फोटो असायचा परंतु यावेळी फडणवीस एकदम गायब झाले. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… छगन भुजबळ म्हणाले. जाहिरातीत महाराष्ट्रात शिंदे आणि हिंदुस्थानात मोदी असा मथळा आहे. ते पाहून मला आश्चर्य वाटलं. खरंतर ही शिंदे साहेबांची मोठी झेप आहे. परंतु त्या जाहिरातीवर हे ही वाचा >> भुजबळ म्हणाले, अशा घटनांनी मनं दुखावली जातात.

Eknath shinde News: Eknath shinde News in Marathi, Photos, Latest News Headlines about एकनाथ शिंदे Loksatta.com

एकनाथ संभाजी शिंदे (Eknath Shinde) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जून २०२२ मध्ये शिवसेनेविरोधात बंड करुन भाजपासोबत सरकार स्थापन केलं. ते २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचे सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून निवडून आले. एकनाथ शिंदे हे शिवसेनेमध्ये बंडखोरी करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेले पहिले नेते आहेत. आपण बंड केलेला नसून उठाव केलेला आहे आणि आपण आजही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांवर चालणारे कट्टर शिवसैनिक असून सध्या स्थापन केलेले सरकार शिवसेना भाजपाचेच आहे अशी भूमिका शिंदे यांनी मांडली आहे. ते शिवसेनेचे (Shivsena) सदस्य म्हणून कोपरी-पाचपाखाडी, ठाणे, येथून विधानसभेचे सदस्य आहेत. एकनाथ शिंदे हे ठाणे महापालिकेत दोन टर्म नगरसेवक होते आणि तीन वर्षे स्थायी समितीचे सदस्य आणि चार वर्षे सभागृह नेते होते. त्यांचा जन्म ९ फेब्रुवारी १९६४ रोजी महाराष्ट्रात झाला. त्यांचे मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण मंगला हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, ठाणे येथून झाले. नंतर त्यांनी ५६व्या वर्षी बीएची डिग्री प्राप्त केली. त्यांनी श्रीमती लता एकनाथ शिंदे यांच्याशी विवाह केला. त्यांच्या मुलाचे नाव श्रीकांत शिंदे आहे. ते ऑर्थोपेडिक सर्जन असून ते कल्याण मतदारसंघातून लोकसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते.