गजानन महाराजांची बावन्नी

  1. गजानन महाराजांची पालखी, आषाढी वारीमुळे परळीत रंगला भक्तीसोहळा
  2. Gajanan Maharaj Palkhi In Parli And Rukmini Mata Palkhi In Parbhani
  3. गजानन महाराज
  4. गजानन महाराज आरती
  5. gajanan maharaj


Download: गजानन महाराजांची बावन्नी
Size: 49.63 MB

गजानन महाराजांची पालखी, आषाढी वारीमुळे परळीत रंगला भक्तीसोहळा

संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे परळी शहरात मंगळवारी सकाळी उड्डाणपूलावरून आगमन झाले. शहरात ठीक ठिकाणी या पालखी सोहळ्याचे स्वागतकरून हजारो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. स्वागतासाठी शहरात पालखी मार्गावर नागरिक सज्ज झाले होते. शेगाव येथून आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे परळीमार्गे निघालेल्या संत गजानन महाराज पालखीवारीचे गंगाखेडहून परळीच्या शक्तीकुंज वसाहतमध्ये आज दुपारी आगमन झाले. पालखी मार्गात अल्पोपहार,चहापाणी, पिण्याचे पाणीची व्यवस्था विविध सामाजिक संघटनेच्यावतीने करण्यात आली. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती ही पालखी ,पायी वारी राणी लक्ष्मी बाई टॉवर ,नेहरू चौक मार्गे वैद्यनाथ मंदिर व वैद्यनाथ मंदिर मार्गे संत जगमित्र नागा मंदिर येथे आली, या ठिकाणी गजानन महाराजांच्या पालखीची पूजा श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्ट सेक्रेटरी राजेश देशमुख यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. यावेळी संत जगमित्रनागा मंदिराचे पुजारी औटी परिवार उपस्थित होता. गजानन महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी दिवसभर भाविकांची रीघ लागली होती. आज संत जगमित्र नागा मंदिर परिसरात पालखी मुक्कामी असून बुधवारी पहाटे कण्हेरवाडी मार्गे आंबाजोगाईकडे प्रस्थान होईल. मंगळवारी चांदूरबाजार येथील संत गुलाब महाराज पालखी चे परळीत आगमन झाले , देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या वैद्यनाथाच्या परळी नगरीतून विदर्भातील अनेक दिंड्या आषाढीवारीसाठी परळी मार्गे पंढरपूरकडे जातात. Web Title: Gajanan Maharaj's palanquin, the devotional ceremony was colorful due to Ashadhi Vari Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all ...

Gajanan Maharaj Palkhi In Parli And Rukmini Mata Palkhi In Parbhani

Ashadhi Wari 2023:आषाढी वारीसाठी निघालेल्या राज्यभरातील पालख्या पंढरपूरकडे टप्याटप्याने कूच करत आहेत. दरम्यान श्री संत गजानन महाराज पालखी बीडच्या गजानन महाराज पालखी परळीच्या थर्मल कॉलनीतील श्रीराम मंदिर आणि न्यू हायस्कूल शाळेत सोमवारी मुक्कामी होती. तर ही पालखी आज दिवसभर परळी शहरात असून, आजचा मुक्काम जगमित्र मंदिरात असणार आहे. गण गण गणात बोते, विठ्ठल नामाचा व माऊलीचा जयघोष करीत पालखीचे आगमन झाले. रखरखत्या उन्हात वारकरी भगव्या पताका, गळ्यात टाळ, पखवाजाच्या तालात पालखी परळीत दाखल झाली आहे. वारकऱ्यांचा 750 किलोमीटरचा प्रवास गजानन महाराज पालखीसोबत सातशे वारकरी, तीन अश्व, नऊ गाड्या व रुग्णवाहिका आहे. पालखी 27 जूनला पंढरपूरला पोहोचणार असून, दिंडी नऊ जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत आहे. शेगाव ते पंढरपूर पायी वारी 33 दिवसांची असून, वारकऱ्यांचा 750 किलोमीटरचा प्रवास होणार आहे. श्री गजानन पालखीचे परळीच्या सीमेवर अ. भा. वारकरी मंडळाच्या वतीने हभप रामेश्वर महाराज कोकाटे यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या. तर पालखीतील विणेकरी मृदंगवादक, गायक, टाळकरी, वारकरी महाराज मंडळींचेही स्वागत करण्यात आले. परळी शहराच्या प्रमुख मार्गावरून पालखी पुढे निघाली. तर यावेळी पालखीचे स्वागत करण्यासाठी परळीकर सज्ज असल्याचे पाहायला मिळत आहे. तर नागरिक, व्यापारीवर्गाच्या वतीनेही या पालखीचे आदरातिथ्य करण्यात येत आहे. इतर महत्वाच्या बातम्या:

गजानन महाराज

गजानन महाराजान्चा गजानन आशिश ग्रन्थ वाचणे प्रत्येकाला शक्य होत नाही म्हनुन गजानन बावनी जि रोज म्हणु शकतो. जय जय निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||२|| सदेह तू, परी विदेह तू | देह असून देहातीत तू ||३|| माघा वैद्य सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||४|| उष्ट्या पत्रावालीनिमित्त | विदेह्त्व तव हो प्रगट ||५|| बंकट लालावारी तुझी | कृपा जाहली ती साची ||६|| गोसाव्याच्या नवसासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||७|| तव पद तीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला ||८|| जानाकीरामा चिंच वणे | नासावोनी स्वरूपी आणणे ||९|| मुकीन चंदूचे कानवले | खाउन कृतार्थ त्या केले ||१०|| विहिरी माजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११|| मध माश्यांचे डंख तुवा | सहन सुखे केले देवा ||१२|| त्यांचे काटे योगबले | काढुनी सहजी दाखविले ||१३|| कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४|| वेद म्हणुनी दाखविला | चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५|| जळत्या पर्याकावरती | ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६|| टाकळीकर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७|| बाळकृष्ण बाळापुराचा | समर्थ भक्ताची जो होता ||१८|| रामदास रूपे तुला | दर्शन देवोनी तोषविला ||१९|| सुकुलालाची गोमाता | द्वाड बहु होती ताता ||२०|| कृपा तुझी होताच क्षणी | शांत जाहली ती जननी ||२१|| घुडे लक्ष्मण शेगावी | येता व्याधी तू निरवी ||२२|| दांभिकता परी ती त्याची | तू न चालवोनी घे साची ||२३|| भास्कर पाटील तव भक्त | उद्धरलासी तू त्वरित ||२४|| आज्ञा तव शिरसावंद्य | काकाही मानती तुज वंद्य ||२५|| विहिरीमाजी रक्षियला | देवा तू गणू जवरयाला ||२६|| पिताम्बराकार्वी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७|| सुबुद्धी देशी जोश्याला | माफ करी तो दंडाला ||२८|| सवडत येशील गंगाभारती | थुंकून वारिल...

गजानन महाराज आरती

हे सर्वाद्या सर्वशक्ती | हे जगदोद्वारा जगत्पति | साहय व्हावें सत्वरगति | या लेकराकारणें ||१|| जे जे काही ब्रम्हांडात | तें तें तुझें रुप सत्य | तुक्यापुढें नाहीं खचित | कोणाचीही प्रतिष्ठा ||२|| तूं निरंजन निराकार | तूंच अवधूत दिगंबर | साकाररुप सर्वेश्र्वर | विश्र्वनाथ तूंच की ||३|| जे जे काही म्हणावें | तें तें तुझे रुप बरवें | दासगणूस आतां पावे | हीच आहे याचना ||४|| तूंच काशी विश्र्वेश्वर | सोमनाथ बद्रीकेदार | महंकाल तेवि ओंकार | तूंच की रे त्र्यंबकेश्र्वरा ||५|| भीमाशंकरा मल्लिकार्जुन | नागनाथ पार्वतीरमण | श्रीघृणेश्वर म्हणून | वेरुळगांवी तूंच की ||६|| तूंच परळी वैजनाथ | निधीतटाला तूंच स्थित | रामेश्वर पार्वतीकांत | सर्व संकट निवारता ||७|| हे कृपार्णवा नारायणा| महाविष्णो आनंदधना | हे शेषशायी परिपूर्णा | नरहरि वामना रघुपते ||८|| तूं वृंदावनीं श्रीहरी | तूं पांडुरंग पंढरपुरीं | व्यंकटेश तूं गिरीवरीं | पुरीमाजीं जगन्नाथे ||९|| द्वारेसी नंदनंदन | नाम देती तुजकारण | जैसे भक्तांचें इच्छील मन | तैसे तुज ठरविती ||१०|| आता हे चंद्रभागातटविहारा | या गजाननस्तोत्रा साहय करा | हेंच मागें पसरुनि पदा | तुज विठठले दासगणू ||११|| गजानन जे स्वरुप कांही | तें तुक्याविण वेगळे नाही | दत्त भैरव मार्तड तेही | रुपें तुझीच अधोक्षजा ||१२|| या सर्व स्वरुपांकारण | आदरे मी करी वंदन | माझे त्रिताप करा हरण | हेंच आहे मागणे ||१३|| हें महालक्ष्मी कुलदेवते | कृपाकटाक्षें लेकरातें | पाही दासगणूतें | हीच तुजला प्रार्थना ||१४|| आतां श्रीशंकराचार्य गुरुवर | तेवी नाथ मच्छिंदर | निवृत्तीदास ज्ञानेश्वर | समर्थ सज्जनगडीचे ||१५|| हे तुकारामा महासंता | तुजलागी दंडवता | करितों होई मला त्राता | नाहीं ऐसे म्हणूं नका |...

gajanan maharaj

जन्म: ज्ञात नाही, माघ वद्य ७, १८७८ दिनांक २३-२-१८७८ रोजी शेगाव मध्ये प्रकट झाले, आई/वडील: ज्ञात नाही वेष: दिगंबर कार्यकाळ: १८७८ ते १९१० समाधी/निर्वाण: ऋषीपंचमी ८-९-१९१०, भाद्रपद शुक्ल पंचमी चरित्र ग्रंथ: श्री गजानन विजय चरित्र ग्रंथ (लेखक: दासगणू महाराज ) गजानन महाराजांचे प्रकटीकरण – गजानन महाराज (shegaon gajanan maharaj) वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन (gajanan maharaj) महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज (gajanan maharaj) शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. “गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी (gajanan maharaj) भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्...