गर्जा महाराष्ट्र माझा गीत लेखक

  1. गर्जा महाराष्ट्र
  2. "तुम्ही नसताना..." ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर शाहीर साबळेंच्या नातवाची 'ती' पोस्ट चर्चेत
  3. Jai Jai Maharashtra Majha : 'गर्जा महाराष्ट्र' या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळणार
  4. Raja Badhe : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीत लिहिणारे कोण होते नागपूरकर राजा बढे ?
  5. महाराष्ट्र गीत
  6. The song Jai Jai Maharashtra Majha was announced as the state song of Maharashtra Maharashtra News : गर्जा महाराष्ट्र’ या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळला; महाराजांच्या जयंतीला शुभारंभ


Download: गर्जा महाराष्ट्र माझा गीत लेखक
Size: 61.19 MB

गर्जा महाराष्ट्र

गर्जा महाराष्ट्र दूरचित्रवाहिनी भाषा मराठी प्रकार ऐतिहासिक, महाराष्ट्रीय देश भारत सूत्रधार शीर्षकगीत/संगीत माहिती शीर्षकगीत गर्जा महाराष्ट्र माझा प्रसारण माहिती पहिला भाग २५ ऑगस्ट २०१८ अंतिम भाग १६ फेब्रुवारी २०१९ एकूण भाग २६ निर्मिती माहिती कथा संकलन कालावधी २२ मिनिटे गर्जा महाराष्ट्र ही २५ ऑगस्ट २०१८ ते १६ फेब्रुवारी २०१९ या कालावधी दरम्यान या अशा महाराष्ट्रीय व्यक्तीं होत्या की, ज्यांनी केवळ महाराष्ट्राचीच सांस्कृतिक ओळख आकारली नाही तर भारताच्या सांस्कृतिक विकासाचा मार्ग सुद्धा प्रशस्त केला. देशाला आकार देण्यात या महाराष्ट्रीयांनी जे सांस्कृतिक आणि बौद्धिक योगदान दिले, त्याचा इतिहास या मालिकेतून कालानुक्रमाने मांडला गेला आहे. या महाराष्ट्रीयांमध्ये संत, समाजसुधारक, राजकारणी आदींचा समावेश होता. कलाकार [ ] कलाकार व त्यांची भूमिका • प्रशांत चौडप्पा – भाग [ ] भाग क्रमांक भागाचे नाव प्रक्षेपित केल्याचा दिनांक ०१ २५ ऑगस्ट २०१८ ०२ १ सप्टेंबर २०१८ ०३ ८ सप्टेंबर २०१८ ०४ १५ सप्टेंबर २०१८ ०५ २२ सप्टेंबर २०१८ ०६ २९ सप्टेंबर २०१८ ०७ ६ ऑक्टोबर २०१८ ०८ १३ ऑक्टोबर २०१८ ०९ २० ऑक्टोबर २०१८ १० २७ ऑक्टोबर २०१८ ११ ३ नोव्हेंबर २०१८ १२ १० नोव्हेंबर २०१८ १३ १७ नोव्हेंबर २०१८ १४ २४ नोव्हेंबर २०१८ १५ १ डिसेंबर २०१८ १६ ८ डिसेंबर २०१८ १७ १५ डिसेंबर २०१८ १८ २२ डिसेंबर २०१८ १९ २९ डिसेंबर २०१८ २० ५ जानेवारी २०१९ २१ १२ जानेवारी २०१९ २२ २६ जानेवारी २०१९ २३ १९ जानेवारी २०१९ २४ २ फेब्रुवारी २०१९ २५ ९ फेब्रुवारी २०१९ २६ १६ फेब्रुवारी २०१९ हे सुद्धा पहा [ ] • • • संदर्भ [ ]

"तुम्ही नसताना..." ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ला राज्यगीताचा दर्जा मिळाल्यानंतर शाहीर साबळेंच्या नातवाची 'ती' पोस्ट चर्चेत

जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा हे गीत ऐकल्यानंतर अंगावर रोमांच उभे राहतात. कविवर्य राजा बढे लिखित ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीतामधील दोन कडव्यांना महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत मंगळवारी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीपासून हे गीत अंगीकारण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने शाहीर साबळे यांचे नातू केदार शिंदे यांनी एक पोस्ट शेअर करत याबद्दल प्रतिक्रिया दिली. केदार शिंदे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. नुकतंच त्यांनी त्यांचे आजोबा शाहीर साबळेंबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. याबरोबर केदार शिंदेंनी एक पोस्ट केली आहे. त्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याबरोबर त्यांनी MaharashtraShaheer28April2023 महाराष्ट्रशाहीर MaharashtraShaheer असे हॅशटॅगही शेअर केले आहेत. आणखी वाचा : मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… केदार शिंदेंची पोस्ट “My real Hero. #महाराष्ट्रशाहीर साबळे. बाबा, तुमच्या जन्मशताब्दी वर्षात पुन्हा एकदा तुमचा झंझावात निर्माण होतोय. महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र गीत आता राज्यगीत म्हणून जाहीर करण्यात आलं. तुमच्या मनात खरच ही इच्छा असणार. १९६० पासून अव्याहतपणे तुम्ही हे गौरव गीत जगभर गाऊन प्रसिद्ध केलत. तुम्ही आता नसताना पुढच्या कितीतरी पिढ्या आता याच गाण्याला मानसन्मान देतील. या वर्षात तुमच्या जीवनावर आधारित सिनेमा सुध्दा येईल. आत्मा जागृत असतो. आणि तो जे आपल्याला हवं ते करून घेतो. तुम्ही करताय. आम्ही केवळ निमित्तमात्र. २८ एप्रिल र...

Jai Jai Maharashtra Majha : 'गर्जा महाराष्ट्र' या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळणार

मुंबई : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा( Jai Jai Maharashtra Majha)… हे स्वर ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभा राहतो. महाराष्ट्र दिन अणि शिवजयंतीला हमखास हे गाणं मोठ्या आवाजात वाजवले जातो. हे गाणं ऐकताना महाराष्ट्रातील जनतेचा ऊर अभिमानाने भरुन येतो. आता याच ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला राज्यगीतचा दर्जा दिला जाणार आहेत. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा दिला जाणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे. अमृत मोहत्सवी वर्षा निम्मित प्रत्येक राज्याला एक गीत असावे असे ठरले आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. या गाण्यातील दोन कडवी घेतली जाणार आहेत. हे गीत एक मिनिट किंवा दीड मिनिटाचे गीत करून हे राज्यगीत म्हणून घोषीत केले जाणार आहे. महाराष्ट्र पुरस्कार कार्यक्रम आणि राज्य गीत याची घोषणा दिवाळी नंतर एक कार्यक्रमात केली जाणार आहे. सर्व शासकीय मोठया कार्यक्रमात हे गीत लावले जाणार आहे. हे गीत संपूर्ण महाराष्ट्राला नविन उत्साह देणार असल्याचा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र गौरव गीत अशी “जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा” या गीताची ओळख आहे. सीमा आंदोलनाच्या काळात हे गाणं चांगलच लोकप्रिय झाले होते. कवी राजा बढे यांनी लिहिलेलं आणि संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेलं हे गीत शाहिर साबळे यांनी त्यांच्या खणखणीत आवाजानं अजरामर केले.

Raja Badhe : 'जय जय महाराष्ट्र माझा' गीत लिहिणारे कोण होते नागपूरकर राजा बढे ?

नागपूर: पुढारी वृत्तसेवा :‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत विशेषत: सीमा आंदोलनादरम्यान आंदोलकांच्या तोंडी होते. नागपूरचे कवी राजा बढे यांनी लिहिलेले संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेले हे गीत शाहीर अमीर साबळे यांनी आपल्या खणखणीत आवाजाने अजरामर केले. राज्य सरकारने या गीताला राज्यगीत म्हणून आज (दि.३१) मंजुरी दिली. यामुळे नागपूरकर गीतकार राजा बढे (Raja Badhe) आणि पर्यायाने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. या गीताचे कवी असलेले नागपूरकर राजा बढे (Raja Badhe) यांची संपादक, चित्रपट निर्माते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार आणि गायक अशी चतुरस्त्र ओळख आहे. तरीही त्यांची खरी ओळख मराठी कवी आणि गीतकार अशीच होती. सीमा आंदोलन व संघर्षाच्या काळात त्यांचे हेच गीत मराठी मनांना संघर्षाची प्रेरणा देणारे ठरले. नागपुरात तुळशीबाग येथील चौकाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. नागपुरात जन्मलेल्या राजा बढे यांचे माध्यमिक शिक्षण नागपुरातील टिळक विद्यालयात झाले आहे. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात पत्रकारितेने झाली. त्यानंतर बरीच वर्षे त्यांनी आकाशवाणीला सेवा दिल्यावर त्यांनी चित्रपट व्यवसायात प्रवेश केला. “स्वानंद चित्र’ ही संस्था उभी केली आणि ’रायगडचा राजबंदी’ हा संभाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट त्यांनी काढला. स्वातंत्र्यवीर सावरकर हे राजा बढे यांचे दैवत होते. त्यांची असंख्य गीते गाजली. त्यापैकी पन्नासच्या दशकातील त्यांचे ‘जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत गायक शाहीर साबळे यांनी अजरामर केले. राजा बढे यांच्या नावे १८ कवितासंग्रह, ४ नाटके, ९ संगीतिका, ५ एकांकिका, एक कादंबरी आहे. शिवाय त्यांनी प्रसिद्ध साहित्याचे भावानुवाद देखील केले...

महाराष्ट्र गीत

गीत जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ॥धृ.॥ रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा जय जय महाराष्ट्र माझा ... ॥१॥ भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा ॥२॥ काळ्या छातीवरी कोरली, अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती, खेळ जीवघेणी दारिद्र्याच्या उन्हात शिजला निढ़ळाच्या घामाने भिजला देशगौरवासाठी झिजला दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा ॥३॥ गीत : संगीत : स्वर :

The song Jai Jai Maharashtra Majha was announced as the state song of Maharashtra Maharashtra News : गर्जा महाराष्ट्र’ या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळला; महाराजांच्या जयंतीला शुभारंभ

Jai Jai Maharashtra Majha : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा(Jai Jai Maharashtra Majha)… हे स्वर ऐकताच प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर रोमांच उभा राहतो आणि उर अभिमानाने भरुन येतो. आता याच ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला राज्यगीतचा दर्जा मिळाला आहे. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला. राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजुरी मिळाली. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्याचा ठराव या बैठकीत मंजुर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून 19 फेब्रुवारीपासून 2023 पासून हे गीत अंगिकारण्यात येत आहे. ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताला महाराष्ट्राच्या राज्यगीताचा दर्जा दिला जाणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली होती. अखेर या घोषणेची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार आहे. या गीताला राज्यगीतचा दर्जा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्याच्या अमृत मोहत्सवी वर्षा निम्मित प्रत्येक राज्याला एक गीत असावे असा ठराव केंद्रीय पातळीवर घेण्यात आला. त्यानुसार महाराष्ट्रातील तीन गीतांची निवड झाली होती. त्यापैकी ‘गर्जा महाराष्ट्र’ या गीताची राज्यगीत म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली होती. या गाण्यातील दोन कडवी घेतली जाणार आहेत. हे गीत एक मिनिट किंवा दीड मिनिटाचे गीत करून हे राज्यगीत म्हणून सादर केले जाणार आहे. 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून हे गीत राज्यगीत म्हणून सादर केले जाणार आहे. सर्व शासकीय मोठया कार्यक्रमात हे गीत लावले जाणार आहे....