गुरुचरित्र पारायण पूजा मांडणी

  1. गुरूचरित्र अध्याय एकोणीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra


Download: गुरुचरित्र पारायण पूजा मांडणी
Size: 33.48 MB

गुरूचरित्र अध्याय एकोणीसावा ॥ श्री गुरूचरित्र ॥ Shri GuruCharitra

श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसरस्वत्यै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: ॥ नामधारक शिष्यराणा । लागे सिध्दाचिया चरणां । करसंपुट जोडून । विनवीतसे तया वेळी ॥१॥ जय जया सिध्द योगीश्वरा । तूंचि ज्योति अंधकारा । भक्तजनांच्या मनोहरा । भवसागरतारका ॥२॥ अज्ञानतिमिररजनींत । निजलों होतों मदोन्मत्त । गुरुचरित्र मज अमृत । प्राशन करविलें दातारा ॥३॥ त्याणें झालें मज चेत । ज्ञानसूर्यप्रकाश होत । तुझे कृपेने जागृत । जाहलों स्वामी सिध्दमुनि ॥४॥ पुढील कथाविस्तारा । निरोपावा योगीश्वरा । कृपा करी गा दातारा । म्हणोनि लागला चरणांसी ॥५॥ ऐकोनि शिष्याचें वचन । संतोषला सिध्द आपण । सांगतसे विस्तारुन । श्रीगुरुमहिमा अनुपम्य ॥६॥ शिष्योत्तमा नामंकिता । सांगेन ऐके गुरुची कथा । औदुंबरतळी अतिप्रीता । होते श्रीगुरु परियेसा ॥७॥ ऐकोनी सिध्दाचें वचन । नामधारक करी प्रश्न । अनेक पुण्यवृक्ष त्यजून । काय प्रीति औदुंवरी ॥८॥ अश्वत्थ्वृक्ष असे थोर । म्हणोनि सांगती वेद शास्त्र । श्रीगुरुप्रीति औदुंबर । कवण कारण निरोपावें ॥९॥ सिध्द म्हणे नामंकिता । सांगेन याचिया वृतांता । जधीं नरसिंह अवतार होता । हिरण्यकश्यप विदारिला ॥१०॥ नखेंकरूनि दैत्यासी । विदारिलें कोपेसीं । आंतडीं काढूनियां हषीं । घालती माळ गळां नरहरीनें ॥११॥ त्या दैत्याचे पोटी विष होतें काळ्कूटी । जैसी वडवाग्नि मोठी तैसें विष परियेसा ॥१२॥ विदारण करितां दैत्यासी । वेधलें विष त्या नखांसी । तापली नखें बहुवसी । ऐक शिष्या एकचित्तें ॥१३॥ तये समयी महालक्ष्मी । घेऊनि आली अतिप्रेमी । औदुंबरफळ नामी । शांतीकारणें नखांसी ॥१४॥ तये वेळी शीतलार्थ । नखें रोविलीं औदुंबरात । विषाग्नि झाला शांत । उग्र नरसिंह शांत झाला ॥१५॥ शांत जाहला नृसिंहदेव । देता झाला लक्ष्मीसि खेंव । संतोषोनि उभय देव । वर देती तये...