झी24तास

  1. dipak kesarkar made big statement against sanjay raut Maharashtra Political Crisis News in Marathi
  2. बदली आणि पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी खूशखबर; सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत
  3. संशय! आमदार फुटले की पाठवले? कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात संशयाचं वातावरण
  4. shivsena MLA split or sent? Congress NCP leaders suspicion News in Marathi


Download: झी24तास
Size: 41.14 MB

dipak kesarkar made big statement against sanjay raut Maharashtra Political Crisis News in Marathi

मुंबई : शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या माजी मंत्री आणि आमदार असलेल्या दीपक केसरकर यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. 'राऊत यांची शिवराळ भाषा सहन केली जाणार नाही. कोणत्याही पक्षाला असा प्रवक्ता मिळू नये' असे केसरकर यांनी म्हटलं आहे. 'झी24तास'शी बोलताना त्यांनी आपले म्हणणं मांडलं. काय म्हटले दीपक केसरकर ? वाचा सर्वोच्च न्यायालयात दाद 'विधिमंडळातील शिवसेनेच्या 55 आमदारांचे नेतृत्व सध्या एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे 14-15 आमदारांची बैठकीमध्ये त्यांना गटनेते पदावरून काढणं बेकायदेशीर आहे. विधानसभेच्या उपाध्यक्षांवर अविश्वास ठराव असताना त्यांनाही आमदारांना अपात्र करण्याचा अधिकार उरत नाही.' 'बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस ही नियमानुसार 7 दिवसांची असते. परंतू आम्हाला 48 तासांची देण्यात आली आहे. यासर्व बेकायदेशीर गोष्टींविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.' संजय राऊत यांच्या भाषेवर टीका 'संजय राऊत यांच्या आक्षेपार्ह भाषेवर बोलताना केसरकर म्हणाले की, असा प्रवक्ता कोणत्याही पक्षाला मिळू नये अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. कारण असे प्रवक्ते हे पक्षाचा नाश करतात. शिवसेनेत आज जी परिस्थिती निर्माण झाली त्याला राऊतांची वक्तव्य कारणीभूत आहेत.' संजय राऊत यांच्याविरोधात आमदारांमध्ये संताप 'सर्व आमदारांमध्ये राऊतांविरोधात तीव्र संताप आहे. ते आमदारांच्या मतावर निवडून आले आहेत. आमदारांना प्रेत म्हणण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या खासदारकीचा राजीनामा द्यावा. राऊतांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या मदतीने निवडून यावं. त्यांना त्यांचा चांगला सपोर्ट आहे. त्यानंतर त्यांनी आमच्यावर बोलावं.' 'राऊतांनी किती बापाचे... असं आक्षेपार्ह विधान केलं. त्यामुळे...

बदली आणि पदोन्नतीची वाट पाहणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी खूशखबर; सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत

पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत गुंतवा 1500 रुपये, ठेवीवर मिळवा 35 लाख, जाणून घ्या स्कीम? राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेले अनेक दिवस प्रशासकीय अधिकारी पदोन्नती आणि बदल्यांची वाट पाहत होते. याबाबत आता शिंदे सरकारने भूमिका घेतली असून... © Zee २४ तास द्वारे प्रदान केलेले मुंबई : राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. गेले अनेक दिवस प्रशासकीय अधिकारी पदोन्नती आणि बदल्यांची वाट पाहत होते. याबाबत आता शिंदे सरकारने भूमिका घेतली असून राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारानंतर तसेच पावसाळी अधिवेशनानंतर पोलीस तसंच सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या महत्त्वाच्या बदल्या केल्या जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना उद्धव ठाकरे यांनी 30 जून पर्यंत बदल्या करू नये असा शासकीय अध्यादेश काढला होता. वास्तविक मे महिन्याच्या अखेरपर्यंत राज्यात सर्वत्र पदोन्नती आणि कार्यकाळ संपलेल्या अधिकाऱ्यांच्या नियमानुसार बदल्या आणि प्रमोशन होत असते. मात्र राज्यात राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक पाहता मुख्यमंत्री तत्कालीन उद्धव ठाकरे यांनी पक्षांतर्गत आमदारांची नाराजी नको यासाठी एक महिना बदल्यांना मुदत वाढ दिली होती. मात्र तीस जून च्या आधीच राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून जावे लागलं. त्यानंतर मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे यांची वर्णी लागली सरकार जुलैच्या पहिल्या आठवड्यात बहुमत सिद्ध केल्यानंतर देखील अद्याप पर्यंत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मंत्रीमंडळ विस्तार रखडल्याने प्रशासकीय बदल्या कधी होणार याचीच चर्चा प्रशासनात आहे. या संदर्भात प्रशासकीय अधिकारी संघटनांचे प्रतिनिधी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच मुख्य सचिव मनू कुमार श...

संशय! आमदार फुटले की पाठवले? कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या गोटात संशयाचं वातावरण

टीम मंगळवेढा टाईम्स । महाविकास आघाडीमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच संशयाचं वातावरण देखील निर्माण होताना दिसत आहे. शिवसेनेच्यामध्ये बंडाळी निर्माण झाली. त्यात एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार जाताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत जे आमदार उपस्थित होते, ते देखील आता शिंदे गटात जाताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत यासंदर्भात काही नेत्यांनी सुरू असल्याची माहिती ‘झी24तास’ने प्रसिद्ध केली आहे. यापूर्वी शिवसेनेत अनेक नेत्यांनी बंड केले. पण त्यांच्या पाठीमागे देखील इतके आमदार कधीही गेले नाही. मग एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके आमदार कसे काय? शिवसेनेचे निष्ठावंत आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय निकट वरती आमदार देखील शिंदे यांना पाठिंबा कसे देतात? हे आमदार स्वतःहून जात आहेत की त्यांना शिवसेनेतच कोणी मोठा नेता जाण्याचा सल्ला देत आहे? असा सवाल देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित करीत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत देखील या संदर्भात सुर उमटला आहेत. शिवसेनेत याआधी छगन भुजबळ गणेश नाईक नारायण राणे राज ठाकरे यासारख्या दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त करत बंड पुकारले होते. मात्र त्यांच्या पाठीमागे देखील इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार कोणीच गेले नाही. आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके आमदार कसे जात आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांनी ‘झी24तास’ला नाव न घेण्याच्या अटीवर भूमिका मांडली की, एकनाथ शि...

shivsena MLA split or sent? Congress NCP leaders suspicion News in Marathi

सागर कुलकर्णी, मुंबई : महाविकास आघाडीमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली असतानाच संशयाचं वातावरण देखील निर्माण होताना दिसत आहे. शिवसेनेच्यामध्ये बंडाळी निर्माण झाली. त्यात एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे 40 पेक्षा जास्त शिवसेनेचे आमदार जाताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत जे आमदार उपस्थित होते, ते देखील आता शिंदे गटात जाताना दिसत आहेत. या सर्व घडामोडींमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शंका व्यक्त केली आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांमध्ये यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती 'झी24तास' ला मिळाली आहे. यापूर्वी शिवसेनेत अनेक नेत्यांनी बंड केले. पण त्यांच्या पाठीमागे देखील इतके आमदार कधीही गेले नाही. मग एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके आमदार कसे काय? शिवसेनेचे निष्ठावंत आणि उद्धव ठाकरे यांचे अतिशय निकटवर्ती आमदार देखील शिंदे यांना पाठिंबा कसे देतात? हे आमदार स्वतःहून जात आहेत की त्यांना शिवसेनेतच कोणी मोठा नेता जाण्याचा सल्ला देत आहे? असा सवाल देखील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते उपस्थित करीत आहेत. काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत देखील या संदर्भात सूर उमटला आहेत. शिवसेनेत याआधी छगन भुजबळ गणेश नाईक नारायण राणे राज ठाकरे यासारख्या दिग्गज नेत्यांनी नाराजी व्यक्त करत बंड पुकारले होते. मात्र त्यांच्या पाठीमागे देखील इतक्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे आमदार कोणीच गेले नाही. आता मात्र एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे इतके आमदार कसे जात आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत एका वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्यांनी 'झी24तास'ला नाव न घेण्याच्या अटीवर भूमिका मांडली की, एकनाथ शिंदे मोठे नेते आहे पण त्यांच्या मागे शिवसेनेचे इतके मोठ...