ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

  1. गजबजला वैष्णवांचा चैतन्य मेळा; ज्ञानोबा आणि तुकोबा माऊलींचा सोहळा पुण्यनगरीत विसावला
  2. आषाढी वारी
  3. पालखी सोहळा २०२३ – वारकरी संप्रदाय
  4. संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2022
  5. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुखपदी ॲड. विकास ढगे
  6. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची विशेष पोलिस महानिरीक्षकांनी केली पाहणी


Download: ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा
Size: 55.3 MB

गजबजला वैष्णवांचा चैतन्य मेळा; ज्ञानोबा आणि तुकोबा माऊलींचा सोहळा पुण्यनगरीत विसावला

Ashadhi wari palkhi sohala 2022 पंढरीच्या ओढीने अलंकापूरीतून प्रस्थान झालेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा तर देहू नगरीतून प्रस्थान झालेला तुकोबांचा पालखी सोहळा बुधवारी रात्री पुण्यात दाखल झाला. पालखी सोबत आलेल्या वैष्णवांमुळे आणि टाळ आणि मृदुंगाच्या निनादाने अवखी पुण्यनगरी दुमदुमली. टाळ चिपळ्या, पताका हातात घेतलेले वारकरी शहराच्या सर्व रस्त्यांवर दिसत होते. डोक्यावर तुळशीवृदांवन घेऊन अभंग म्हणणाऱ्या महिलाही त्यांच्यासमवेत होता. हा सोहळा फर्ग्यूसन रस्त्याने मुक्काम स्थळी पोहचला. यावेळी दर्शनासाठी पुणेकरांनी रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी गर्दी केली होती. प्रत्येक रस्त्यावर दोन्ही पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होती. रांगोळ्यांनी सजवलेल्या रस्त्यांवरून पालखीचे मार्गक्रमण होत होते. ज्ञानोबातुकोबांच्या जयघोषाने सगळे शहर दुमदुमले. दरम्यान, पालखी सोहळ्यातील वारकरी यांच्या स्वागतासाठी स्वयंसेवी संस्था, संघटना, सार्वजनिक मंडळांनी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी रस्त्यांवर खाद्यपदार्थ तसेच पाणीवाटपाची व्यवस्था केली होती. दिंड्यांचा मुक्काम करायची ठिकाणे ठरलेली असतात. सार्वजनिक सभागृहे, मंगल कार्यालये, एखादे मोकळे मैदान अशा ठिकाणी वारकऱ्यांचा मुक्काम होते. पुणेकरांनी अनेक वारक-यांना मुक्कामासाठी ठेवत त्यांचा पाहूणचार केला. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पुण्यात बुधवारी रात्री आणि गुरुवारी मुक्कामी आहे. शुक्रवारी दोन्ही पालख्या पुढच्या प्रवासाठी प्रस्थान करणार आहेत.

आषाढी वारी

या वारीचा इतिहास फार जुना असून जवळपास तेराव्या शतकापासून वारीची परंपरा अखंड चालू असल्याचे सांगितले जाते. संत ज्ञानेश्वर नव्हें तर त्यांच्याही अगोदर त्यांचें वडिल विठ्ठलपंत हेही वारीला पायी जात असत असा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, मलप्पा वासकर या सर्व महात्म्यांनी भगवत धर्माची पताका खांद्यावर घेत अनेक वर्ष वारी केली. संत तुकाराम महाराजांच्या कुटुंबात वारीची जुनी परंपरा होती. हे स्पष्ट करतांना ते लिहितात.. 'Ashadi Wari Information in Marathi' 'वारकरी' म्हंटल की अत्यंत जिव्हाळ्याचा विषय मूळात 'वारी' या शब्दापासून ' वारकरी ' हा शब्द अस्तित्वात आला असावा. कारण पांडुरंगाची वारी करणारा प्रत्येक माणूस हा वारकरी. माणसा माणसात कसलाही भेदा - भेद न बाळगणारा वैष्णव म्हणजे वारकरी. नियमित रूपाने ज्ञानेश्वरी ,भागवत, गाथा या सर्व ग्रंथाचं पारायण करणारा एक वारकरी च असू शकतो. तुकाराम महाराजांच्या एका अभंगात ते लिहितात. या अनोख्या पालखी सोहळ्याची सुरुवात करण्याचं संपूर्ण योगदान आदरणीय श्री हैबत बाबांचं. ते गावचे देशमुख तसेच कर्तबगार सरदार होतें. त्यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यातलं आरफळ ते एकदा गावाकडे निघाले असता काही भिल्लानी त्यांच्या जवळील सर्व पैसा अडका लुटून घेउन त्यांना आणि त्यांच्या सोबतीला असणाऱ्यांना एका गुहा घरात कोंडून टाकले. परंतु बाबाच्या तोंडुन देवाचं नाम अखंड चालू होतं. ते मुखाने माऊलीचा हरिपाठ म्हणत होते. तेवढ्यात त्या भिल्लांच्या राजाला पूत्र झाला तो अत्यंत आनंदी झाला. त्याने बाबांना आणि त्यांच्या समवेत असणाऱ्यांना सोडून दिलं तसेच त्यांना मानसन्मान सुद्धा दिला हि सर्व माऊलीची कृपा हे जाणून ते तिथून घरी गेलेच नाही आणि त्यांनी सदैव आळंदीला राहु...

पालखी सोहळा २०२३ – वारकरी संप्रदाय

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा – आळंदी ते पंढरपूर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा – श्रीक्षेत्र देहू ते पंढरपूर श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळा – श्री क्षेत्र पैठण ते पंढरपूर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा – श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर श्री संत सोपान काका महाराज पालखी सोहळा – श्री क्षेत्र सासवड ते पंढरपूर संत मुक्ताबाई पालखी सोहळा – श्रीक्षेत्र मेहूण ते पंढरपूर संत मुक्ताबाई पालखी सोहळा – श्रीक्षेत्र कोथळी ते पंढरपूर श्री संत निळोबाराय पालखी सोहळा – पिंपळनेर ते पंढरपूर श्री संत बहिणाबाई पालखी सोहळा -श्रीक्षेत्र शिवूर ते पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची मानाचे मानांच्या अश्वाचा प्रवास – अंकली ते श्री क्षेत्र आळंदी

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2022

संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा 2022 महाराष्ट्रातून वारकरी आळंदीत दाखल इंद्रायणीवर झालेली प्रचंड गर्दी…वैष्णवांचा भरलेला मेळा…हरिनामाचा गजर अशा भारलेल्या वातावरणात रविवारी (ता. २०) कार्तिकी एकादशीनिमित्त नगरप्रदक्षिणा करीत भक्तिरसात चिंब होत सुमारे तीन लाख वैष्णवांनी आपली वारी माऊलीच्या चरणी रुजू केली. देऊळवाड्यातून दुपारी माऊलींचा चांदीचा मुखवटा पालखीत ठेवून नगर प्रदक्षिणा करण्यात आली. दरम्यान, मंगळवारी (ता. २२) माउलींचा संजीवन समाधीदिन सोहळा होणार आहे. इंद्रायणी नदीपलीकडील जागेत दर्शनबारी उभारण्यात आली आहे. भाविकांना दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या जवळच्या दोन मजली दर्शनबारी उभारली आहे. कार्तिकी यात्रेच्या दरम्यान घातपाताची शक्यता होवू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे, धातुशोधक यंत्रणा, तपासणी यंत्रणा बसवली आहे. हे पण वाचा:- संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र संपूर्ण कार्तिकी वारी आणि माऊलींच्या संजीवन समाधीदिन सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांच्या भक्तीने अलंकापुरीतील कार्तिकीचा सोहळा सजला होता. गेल्या चार दिवसांपासून सुरू झालेल्या वारकऱ्यांचा प्रवाह पूर्णतः इंद्रायणीच्या काठावर विसावला. आज कार्तिकी एकादशी असल्याने पायी दिंडीतून, एसटी, पीएमटी तसेच खासगी वाहनांनी लाखो भाविक आळंदीत दाखल झाले. पूर्ण निर्बंधमुक्त वारी यंदा भरल्याने वैष्णवांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. कार्तिकी एकादशीनिमित्त घाटावर पहाटेपासून वारकऱ्यांनी स्नानासाठी गर्दी केली होती. बोचऱ्या थंडीची तमा वारकऱ्यांनी बाळगली नाही. नगरपालिकेच्यावतीने महिलांसाठी स्नानगृहे उभारली होती. त्याचा चांगला वापर झाला. दुपार एकच्या सुमारास देउळवाड्यातून माऊलींची पालखी नगरप्रदक्षिणेसाठी निघाली. हजेरी मारुती मंदिरात पालखीने विसावा घेतला....

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळाप्रमुखपदी ॲड. विकास ढगे

आळंदी, ता. १७ : संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या विद्यमान तीन विश्वस्तांना तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, पालखी सोहळा प्रमुखपदी अॅड. विकास ढगे यांची एकमताने निवड झाल्याचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी सांगितले. देसाई म्हणाले, ‘‘आळंदीतून ११ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे. विद्यमान विश्वस्तांचा कार्यकाळ १६ मे रोजी संपला आहे. मात्र, यंदाच्या पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी सध्याच्या तिन्ही विश्वस्तांना १७ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे.’’ संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त ॲड. विकास ढगे, लक्ष्मीकांत देशमुख यांची विश्वस्तपदाची मुदत संपली होती. दरम्यानच्या काळात नव्या विश्वस्त मंडळाच्या निवडीची प्रक्रिया सुरू होती. यंदा वारीच्या नियोजनासाठी सध्याच्या तिन्ही विश्वस्तांना १७ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढ मिळाल्यानंतर विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत ॲड. विकास ढगे यांची पालखी सोहळा प्रमुखपदी एकमताने निवड झाली. ढगे हे पुणे जिल्हा वकील संघटनेचे माजी अध्यक्ष होते. तर पालखी सोहळा प्रमुखपदाची यापूर्वी तीन वेळा जबाबदारी पार पाडली आहे. निवडीनंतर ॲड. ढगे म्हणाले, ‘‘आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूर ते आळंदी या वारीच्या काळात लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येईल. त्यांना अधिकाधिक सुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.’’

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची विशेष पोलिस महानिरीक्षकांनी केली पाहणी

नसीर शिकलगार फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा कालावधीमध्ये कायदा सुव्यवस्था रहावी तसेच वाहतूक सुरळीत रहावी या दृष्टीने पोलिस प्रशासन काटेकोरपणे लक्ष देणार असल्याचे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले. फुलारी यांनी आज, सोमवार पालखी सोहळा मार्गाची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. विशेष पोलिस महानिरीक्षकांनी निरा दत्त घाट, लोणंद पालखीतळ, तरडगाव पालखीतळ, फलटण पालखी तळ व बरड पालखीतळ यांची आणि पालखी मार्गाची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख बापू बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचे निरीक्षक धन्यकुमार गोडसे, फलटण नगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. सातारा जिल्ह्यात १८ जूनला श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. या कालावधीत भाविकांना पायी चालताना कोणत्याही अडचणी येऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावी त्याचबरोबर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यादृष्टीने स्थानिक अधिकारी व पोलिसांशी आपण संवाद साधत असल्याचेही फुलारी यांनी सांगितले. पालखी सोहळा मार्गामध्ये कोणाला काही अडचणी आल्यास त्यांनी त्वरित पोलिस किंवा प्रशासनाची संपर्क साधण्यासाठी सर्व अधिकारी व पोलिसांचे मोबाईल नंबर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पालखी काळात अनेक जण आकडे टाकून वीज घेत असतात त्यामुळे मोठी दुर्घटना घडू नये म्हणून महावितरणशीही चर्चा करणार असल्याचे फुलारी यांनी सांगितले