ज्ञानेश्वरी अध्याय पहिला

  1. श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास
  2. श्रीज्ञानेश्वरी


Download: ज्ञानेश्वरी अध्याय पहिला
Size: 80.28 MB

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग १ संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांना सर्वसामान्य लोक "माऊली" या नावानेच हाक मारतात. तेराव्या शतकाच्या अगदी शेवटी ज्यांनी या महाराष्ट्रात जे अलौकिक असे जीवन जगून दाखवले त्यांच्या विषयी अजूनही सर्व भाविकांच्या मनात एक विलक्षण श्रद्धा आहे, आदर आहे. याचे मुख्य कारण हे त्यांनी केलेले चमत्कार नसून संस्कृतातील भगवद्गीता मराठीत आणण्याचे जे थोर कार्य केले तेच होय. या ग्रंथालाच आपण ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका म्हणतो. ज्ञानेश्वरीविषयी सर्वच भाविक, पंडित, तत्वज्ञानी मान डोलावतात, हात जोडतात. पण ज्ञानेश्वरीच्या अंतरंगात कोण कोण डोकावतात हे पहाणे सगळ्यात जास्त गरजेचे आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वी त्यांनी वापरलेली मराठी भाषा ही आताच्या काळात समजायला खूपच अवघड आहे, तसेच त्यात अनेक उपमा, दृष्टांत असे वापरले आहेत की ते समजावून घेतानाच इतके कठीण जाते तर ते स्वतः समजावून घेऊन इतरांना सांगणे हे आणखी अवघड झाले आहे. सहाजिकच ज्ञानेश्वरीला केवळ नमस्कार करणारेच जास्त आहेत. फार झाले तर पारायणे करण्याचा एक पवित्र ग्रंथ एवढेच महत्व तिला दिले जाते. स्वतः ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी वयाच्या चौदाव्या वर्षी लिहिली हे ही आपणच मोठ्या अभिमानाने सांगतो आणि ती वाचायची केव्हा तर म्हातारपणी, पेन्शनीत निघाल्यावरच असा मोठा विरोधाभासही आपणच निर्माण करतो. ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा तर भाषा समजत नाही, अर्थ समजत नाही - हे मुख्य कारण सर्व सामान्यांकडून दिले जाते. हे समजून घेता येण्यासारखे आहे. याला एक उपाय म्हणजे या भाषेचा डौल, नजाकत जर आधी समजून घेतली तर जरा गोडी लागून काहीबाही तरी ज्ञानेश्वरी आपण वाचण्याचा प्रयत्न करु. याकरता आपण सरळ ओव्याच वाचायला सुरुवात करु या तर.... ज्या...

श्रीज्ञानेश्वरी

॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका ॥ ॥ ॐ श्री परमात्मने नमः ॥ ॥ अथ श्रीमद्भगवद्गीता ॥ । अथ प्रथमो अध्यायः – अध्याय पहिला । । अर्जुनविषादयोगः । ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥ देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु । अवधारिजो जी ॥ २ ॥ हें शब्दब्रह्म अशेष । तेचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष । मिरवत असे ॥ ३ ॥ स्मृति तेचि अवयव । देखा आंगीक भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥ अष्टादश पुराणें । तींचि मणिभूषणें । पदपद्धति खेवणें । प्रमेयरत्‍नांचीं ॥ ५ ॥ पदबंध नागर । तेंचि रंगाथिले अंबर । जेथ साहित्य वाणें सपूर । उजाळाचें ॥ ६ ॥ देखा काव्य नाटका । जे निर्धारितां सकौतुका । त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि ॥ ७ ॥ नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी । दिसती उचित पदें माझारीं । रत्‍नें भलीं ॥ ८ ॥ तेथ व्यासादिकांच्या मतीं । तेचि मेखळा मिरवती । चोखाळपणें झळकती । पल्लवसडका ॥ ९ ॥ देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेची भुजांची आकृति । म्हणौनि विसंवादे धरिती । आयुधें हातीं ॥ १० ॥ तरी तर्कु तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदांतु तो महारसु । मोदकु मिरवे ॥ ११ ॥ एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु । तो बौद्धमतसंकेतु । वार्तिकांचा ॥ १२ ॥ मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु । धर्मप्रतिष्ठा तो सिद्धु । अभयहस्तु ॥ १३ ॥ देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु । जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४ ॥ तरी संवादु तोचि दशनु । जो समता शुभ्रवर्णु । देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥ मज अवगमलिया दोनी । मिमांसा श्रवणस्थानीं । बोधमदामृत मुनी । अली सेविती ॥ १६ ॥ प्रमेयप्रवाल सुप्रभ । द्वैताद्वैत तेचि निकुंभ । सरिसेपणें एकवटत इ...