जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचा अर्थ

  1. 'जय जय महाराष्ट्र माझा' लवकरच महाराष्ट्राचे राज्यगीत होणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
  2. 'महाराष्ट्र शाहीर' रिलीज होण्याआधीच मोठी घोषणा! 'जय जय महाराष्ट्र माझा' ठरलंं 'राज्यगीत'
  3. जय जय महाराष्ट्र माझा ने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात
  4. Jai Jai Maharashtra Mazha Could Be Maharashtra State official Song Say Minister Sudhir Mungantiwar


Download: जय जय महाराष्ट्र माझा या कवितेचा अर्थ
Size: 51.4 MB

'जय जय महाराष्ट्र माझा' लवकरच महाराष्ट्राचे राज्यगीत होणार, सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई - १ मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्याच्या स्थापना समारंभात दादर येथील शिवाजी पार्कवर शाहीर साबळे गायलेले 'जय जय महाराष्ट्र माझा' (Jai Jai Maharashtra Mazha) हे गाणे महाराष्ट्राचे राज्यगीत होणार आहे. अशी माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir mungantiwar) यांनी दिली आहे. शाहीर साबळे यांनी हे गाणे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर गायले होते. राज्यात सरकारी कार्यालयात संभाषणाची सुरूवात वंदे मातरम् ने करण्याची घोषणा मुनगंटीवार यांनी आधीच केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी ‘हिन्दुस्तान टाईम्स’ ला दिलेल्या माहितीनुसार, जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणार असून. या गाण्यातून महाराष्ट्र राज्य, इतिहास आणि संस्कृती आणि उत्सवांचे गुणगाण होईल.यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करण्यात आली आहे.'जय जय महाराष्ट्र माझा' हे गीत १.१५ ते १.३० मिनिटांचे करण्याचे नियोजन आहे.या गाण्यातील मूळ शब्द बदलले जाणार नाहीत. राज्यातील कार्यक्रमांची सुरुवात या गाण्याने तर राष्ट्रगीताने संबंधित कार्यक्रमाची सांगता होईल, अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे. देशात सध्या ११ राज्यांनी आपले स्वत:चे राज्यगीत म्हणून मान्यता दिली आहे.'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळेल, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे. हे गीत कवी रादा बधे यांनी लिहिले आहे. तर श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिले आहे. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे. २०१५ मध्ये शाहीर साबळे यांचे निधन झाले. साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गीत रिलीज होणार आहे.

'महाराष्ट्र शाहीर' रिलीज होण्याआधीच मोठी घोषणा! 'जय जय महाराष्ट्र माझा' ठरलंं 'राज्यगीत'

मुंबई, 31 जानेवारी : 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला महाराष्ट्रचं राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आज झालेल्या राज्य मंत्री मंडळाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला. राजा बडे यांनी हे गाणं लिहिलं आहे. इतिहास आणि संस्कृतीचं दर्शन घडवून देणाऱ्या या गाण्याला शाहिर साबळे यांचा भारदस्त आवाज लाभला. आज कित्येक वर्षांनी देखील जय जय महाराष्ट्र माझा हे शाहिर साबळेंच्या आवाजातील गाणं अंगावर शहारे आणतात. शाहिर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित महाराष्ट्र शाहिर हा सिनेमा येत्या 28 एप्रिल 2023 रोजी महाराष्ट्र शाहिर प्रदर्शित होणार आहे. त्याआधीच शाहिरांचं गीत महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयापैकी हा एक निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे महाराष्ट्राला अधिकृत राज्यगीत मिळालं आहे. सांस्कृतिक कार्य विभागाने यासंदर्भातील घेतलेल्या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी मिळाली. त्यानुसार 'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' हे आता महाराष्ट्राचे राज्यगीत असेल, असं घोषित करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून 19 फेब्रुवारी 2023ला या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. हेही वाचा - Maharashtra Shahir : 'अगंबाई अरेच्चा'तील ही चिमुकली आठवतेय का? 'महाराष्ट्र शाहीर' मध्ये साकारणार महत्वाची भूमिका देशाच्या अमृत महोत्सवी वर्षात देशातील प्रत्येक राज्याचं एक गीत असावं असं ठरलं आहे. त्यानुसार महाराष्ट्र गीतासाठी एकूण 3 गीतांची निवड करण्यात आली होती. त्यातील 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताची राज्यगीत म्हणून निवड झाली. शाहिर साबळेंच्या आयुष्यावर आधारित 'महार...

जय जय महाराष्ट्र माझा ने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात

“वंदे मातरम्” नंतर “जय जय महाराष्ट्र माझा”ने अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार मुंबई, प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार दि 27 फेब्रुवारी ते शनिवार 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, दि 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. अधिवेशनाची सुरुवात विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये वंदे मातरम् ने होते. आता वंदे मातरम् नंतर राज्याचे राज्यगीत ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गायन केले जाणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. • विधानसभा कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे आज घेण्यात आली. महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे प्रत्येक अधिवेशनात पहिल्या दिवशी “वंदे मातरम्’ नंतर “जय जय महाराष्ट्र माझा” हे राज्यगीत म्हटले जाणार आहे. • भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत म्हणून “जय जय महाराष्ट्र माझा – गर्जा महाराष्ट्र माझा” हे कविवर्य राजा निळकंठ बढे यांच्या गीतामधील दोन चरण “महाराष्ट्राचे राज्यगीत” म्हणून नुकतेच घोषित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना स्फूर्ती व प्रेरणा देणारे तसेच महाराष्ट्राच्या शौर्याचे वर्णन करणारे गीत आहे. • “जय जय महाराष्ट्र माझा” या राज्यगीतातील एकूण 2 चरणे वाजविण्यात येणार असून याचा अवधी 1 मिनिट 41 सेकंद असेल. या 2 चरणांचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले असून अवधूत गुप्ते, नंदेश उमप, गणेश चंदनशिवे आणि वैशाली माडे य...

Jai Jai Maharashtra Mazha Could Be Maharashtra State official Song Say Minister Sudhir Mungantiwar

मुंबई : 'जय जय महाराष्ट्र माझा' (Jai Jai Maharashtra Mazha) हे राज्यगीत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. हे गाणं राज्य गीत झाल्यानंतर अधिकृत गाणं असलेल्या देशातील निवडक राज्यांच्या यादीत लवकरच महाराष्ट्राचा समावेश होऊ शकतो अशी माहिती मंत्री मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. राज्य सरकार 'जय जय महाराष्ट्र माझा' या गीताला राज्याचे अधिकृत राज्य गीत म्हणून अंतिम रूप देण्याच्या तयारीत आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिन्दुस्तान टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार, जय जय महाराष्ट्र माझा हे राज्यगीत होणार असून. या गाण्यातून महाराष्ट्र राज्य, इतिहास आणि संस्कृती आणि उत्सवांचे कौतुक होईल. या विषयावर चर्चा करण्यासाठी गेल्या महिन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सध्या देशातील फक्त 11 राज्यांचेच स्वत:चे गाणे आहे. यात आता महराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत असेल. अधिकृत राज्य गीत म्हणून 'जय जय महाराष्ट्र माझा' या गाण्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्यता मिळेल, अशी माहिती मंत्री मुनगंटीवार यांनी दिली आहे. हे गीत कवी रादा बधे यांनी लिहिले आहे. तर श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिले आहे. कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गीत गायले आहे. 2015 मध्ये शाहीर साबळे यांचे निधन झाले. साबळे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष राज्यात साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने हे गीत रिलीज होणार आहे. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले त्यावेळी मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळे यांनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर हे गाणे गायले होते.