कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर

  1. संत एकनाथ अभंग ३४८८ते३६८८


Download: कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर
Size: 21.66 MB

संत एकनाथ अभंग ३४८८ते३६८८

संत एकनाथ श्रीनिवृत्तीनाथांची स्तुति ३४८८. विश्वाचा तो गुरु । स्वामी निवृत्ति दातारु ॥१॥ आदिनाथापासून । परंपरा आली जाण ॥२॥ ज्ञानदेवा ज्ञान दिलें । चांगदेवातें बोधिलें ॥३॥ तोचि बोध माझे मनीं । राहो एका जनार्दनीं ॥४॥ ‍३४८९. केला उपकार जगीं तारियेले सर्व । निवृत्ति गुरु माझा जीव उध्दरिले सर्व ॥१॥ कायावाचामनें शरण निवृत्तिपायीं । देहभावें मीतूंपणा उरलाची नाहीं ॥२॥ ऐसा श्रीनिवृत्ति ज्ञानदेवें धरिला चित्तीं । चांगया प्रेम दिधलें गुरु वोळखिला चित्तीं ॥३॥ एका जनार्दनीं शरण निवृत्तिप्रती । संसार नुरेचि उरी निवृत्ति म्हणतां चित्तीं ॥४॥ ३४९०. धन्य धन्य निवृत्तिदेवा । काय महिमा वर्णावा ॥१॥ शिव अवतार तूंचि धरुन । केलें त्रैलोक्य पावन ॥२॥ समाधि त्र्यबंक शिखरीं । मागें शोभे ब्रह्मगिरी ॥३॥ निवृत्तिनाथाचे चरणीं । शरण एका जनार्दनीं ॥४॥ ३४९१. समाधि निवृत्ति म्हणतां । हारे संसाराची व्यथा ॥१॥ दृष्टीं पाहातां निवृत्तिनाथ । काय भय नाहीं तेथ ॥२॥ समाधि पाहतांचि डोळां । काय सांगूं तो सोहळा ॥३॥ एका जनार्दनीं शरण । समाधि पहातांचि जाण ॥४॥ ३४९२. निवृत्ति निवृत्ति । म्हणतां पाप नुरे चित्तीं ॥१॥ निवृत्ति निवृत्ति नाम घेतां । जन्म सार्थक तत्वतां ॥२॥ निवृत्ति निवृत्ति । संसाराची होय शांति ॥३॥ निवृत्ति नामाचा निजछंद । एका जनार्दनीं आनंद ॥४॥ ३४९३. धन्य आजी डोळां । स्मामी निवृत्ति देखिला ॥१॥ कुशावर्ती करुं स्नान । घेऊं निवृत्तिदर्शन ॥२॥ प्रदक्षिणा ब्रह्मगिरी । चौ‍‍‍‍र्‍यांयशीची चुकली फ़ेरी ॥३॥ गंगाद्वारीं स्नान करतां । हारे पय पान व्यथा ॥४॥ ऐसीं तीन अक्षरें । एका जनार्दन स्मरे ॥५॥ ३४९४. निवृत्तिनाथ तीन अक्षरें । सदा जप करी निर्धारें ॥१॥ पूर्वज उध्दरती साचार । वेदशास्त्रीं हा निर्धार ॥२॥ पुनरपि जन्माची । वार्ता...