कला संचालनालय

  1. यांना निलंबितच करा...
  2. सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईचे अधिकृत संकेतस्थळावर सहर्ष स्वागत....
  3. DOA Terms
  4. स्कॉलरशिप फॉर्म भरणे सुरू महाराष्ट्र 2021
  5. सर ज जी कला महाविद्यालयाचा नियोजनबद्ध विकास करावा


Download: कला संचालनालय
Size: 68.30 MB

यांना निलंबितच करा...

‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’च्या संदर्भात आम्ही लिहीत असलेल्या लेखांना / पोस्टना फेसबुक फ्रेंड्सचा प्रचंड प्रतिसाद लाभतो. ‘चिन्ह’च्या वेबसाईटवर सदर लेखन मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं आहे. ज्यांना ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ विषयी फारशी माहिती नसते असे वाचक मात्र या पोस्टनी अतिशय अस्वस्थ होतात. ‘काय सारखं जेजे – जेजे चालवलंय’ असंही ते त्राग्यानं म्हणतात. अशाना कधीतरी उत्तर द्यायचंच होतं ते आज देतो. ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ ही एका अर्थानं महाराष्ट्रतल्या कला शिक्षण संस्थांची मातृसंस्था आहे. इतकंच नाहीतर तिचा भारतातील अन्य राज्यातल्या कला शिक्षणावर देखील मोठा प्रभाव आहे. मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली त्याच्या आधीच मुंबईत ‘जेजे स्कूल ऑफ आर्ट’ची स्थापना झाली होती. यावरुन मी काय म्हणतो आहे ते लक्षात येऊ शकेल. केवळ भारतातल्याच नाहीतर तर संपूर्ण आशियातल्या कला शिक्षण पद्धतीवर जेजेचा प्रभाव खूप काळ टिकून होता. १९८५ सालानंतर मात्र त्याला दृष्ट लागली आणि सरकारच्या दुर्लक्षामुळं या संस्थेचं जवळ जवळ मातेरं झालं. राज्यकर्त्यांना या संस्थेचं महत्व कधी कळलंच नाही हेच आमचं दुर्दैव आहे. त्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळं आणि भ्रष्ट आचरण करुन केलेल्या शिक्षक – अधिकारी भरतीमुळं जेजेवर आणि पर्यायानं कला संचालनालयावर आज ही अवस्था ओढवली आहे. माझ्यासारखे जेजेचे असंख्य विद्यार्थी कलाक्षेत्रात किंवा ज्या क्षेत्रात त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवलं त्याचं सारं श्रेय जेजेच्या वास्तूला किंवा त्या परिसराला देतात. ( त्यांच्या या संस्थेबाबतच्या उत्कट भावना ‘जेजे जगी जगले’…या ‘चिन्ह’च्या आगामी ग्रंथात मोठ्या प्रमाणावर प्रकट झाल्या आहेत. ) आणि म्हणूनच जेजे संस्कृती नष्ट झाली तर महाराष्ट्राच्या कला क्षेत्राची पूर्णतः वाताहत होईल या भय...

सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबईचे अधिकृत संकेतस्थळावर सहर्ष स्वागत....

प्रस्तावना : सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र हे एक अत्यंत पुरोगामी आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असे राज्य आहे. अनेक कलाप्रकारांना आणि कलाकारांना महाराष्ट्राच्या या मातीने आणि रसिक प्रेक्षकांनी कायम प्रोत्साहन दिले आहे. विविध कला आणि कलाकारांप्रती राज्याच्या शासनकर्त्यांचा दृष्टीकोन उदार, सकारात्मक आणि प्रोत्साहनाचा आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे शासकीय पातळीवरील सांस्कृतिक कार्यासंबंधीच्या योजना कार्यान्वित करण्यात येतात. या राज्यातील सांस्कृतिक अंगाची लोकांना माहिती व्हावी, एक प्रकारचे भावनात्मक ऐक्य निर्माण व्हावे, तसेच सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने महोत्सव आयोजित करण्यात येतात. त्यात राज्य नाट्य महोत्सव, राज्य चित्रपट महोत्सव, तसेच संगीत, नृत्य, तमाशा, कीर्तन, भजन, लोककला, खडी गमंत, शाहिरी आणि दशावतार महोत्सव इत्यादी विविध कला महोत्सव आयोजित करण्यात येतात. याशिवाय या संचालनालयातर्फे नाट्यप्रशिक्षण शिबिरे, तमाशा प्रशिक्षण शिबिरे, बालनाट्य प्रशिक्षण शिबिरे, कीर्तन प्रशिक्षण शिबिरे व शाहिरी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येतात. याशिवाय वयोवृद्ध, अपंग, आर्थिक स्थैर्य नसलेल्या कलाकारांना आर्थिक मदत प्रदान करणे, सांस्कृतिक कार्य क्षेत्रात कार्य करीत असलेल्या संस्थांना सहाय्यक अनुदान देणे इत्यादी कामे या संचालनालयाकडे आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 वा राज्यभिषेक दिनी दिनांक 1 ते 6 जून, 2023 या कालावधीत किल्ले रायगड येथे पायथ्याशी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सदरील कार्यक्रमाच्या अनुषंगाने जाहिर निवेदनात देण्यात आलेल्या तपशीलानुसार कामाकारीता दरपत्रक ...

DOA Terms

• Before filling Online Application Form Download INFORMATION BULLETIN and read the same carefully. Candidates ascertain the eligibility before filling application form.(ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी माहितीपत्रक डाउनलोड करा आणि ते काळजीपूर्वक वाचा. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराची पात्रता पडताळून पहा.) • Candidate should note the password given by Him/Her and keep in safe custody. It is necessary for further login. Safe custody of the password is the responsibility of candidate.(उमेदवाराने त्याने/तिने दिलेला पासवर्ड लक्षात ठेवा आणि सुरक्षित कोठडीत ठेवा. पुढील लॉगिनसाठी हे आवश्यक आहे. पासवर्ड सुरक्षित ठेवणे ही उमेदवाराची जबाबदारी आहे.) • Please note that if a candidate commits any mistake in filling the online Application Form, it cannot be corrected by this office. The Office will take no responsibility of any kind for such forms. • The Applicant must possess the required criteria and education qualification as mentioned in the Information Bulletin.(कृपया लक्षात घ्या की उमेदवाराने ऑनलाइन अर्ज भरताना काही चूक केली असेल तर ती या कार्यालयाद्वारे दुरुस्त करता येणार नाही. कार्यालय अशा फॉर्मसाठी कोणत्याही प्रकारची जबाबदारी घेणार नाही.) • Applicant Email ID and Mobile number will be used for further correspondence.(अर्जदाराचा ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक पुढील पत्रव्यवहारासाठी वापरला जाईल.) • After reading above instructions to fill Online Application Form, the Applicant has to click Go to New Registration button to display Online Application Form.(ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी वरील सूचना वाचल्य...

स्कॉलरशिप फॉर्म भरणे सुरू महाराष्ट्र 2021

महाराष्ट्र शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया 2022 सुरू | Maharashtra Government Scholarship Online Application For Academic Year 2021-22 MahaDBT Scholarship Scheme : महाराष्ट्र राज्यात शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी आता फॉर्म भरू शकता. शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरायचा, तसेच यावर्षी जे नवीन विद्यार्थी आले आहेत त्यांना माहीत नाही की शिष्यवृत्ती फॉर्म कसा भरावा लागतो कोणत्या विभागासाठी भरावा लागतो कोण कोणते विभाग शिष्यवृत्तीसाठी अर्ज स्वीकारतात शिष्यवृत्ती फॉर्म भरण्यासाठी पैसे भरावे लागतात का अशी संपूर्ण माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आलेली आहे त्यामुळे सविस्तर माहिती वाचा. शिष्यवृत्ती विभाग खालील प्रमाणे | Department Of Scholarship : 1. आदिवासी विकास विभाग 2. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग 3. उच्च शिक्षण संचालनालय 4. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग 5. तंत्र शिक्षण संचालनालय 6. OBC, SEBC, VJNT आणि SBC कल्याण विभाग 7. वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय 8. अल्पसंख्याक विकास विभाग 9. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी 10. कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभाग 11. कला संचालनालय 12. MAFSU नागपूर 13. कृषी विभाग 14. अपंगत्व विभाग स्कॉलरशिप फार्म मोबाईल द्वारे कसा भरायचा व्हिडिओ लवकरच उपलब्ध होईल. स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी वेबसाईट : 👉 स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी लागणारी डॉक्युमेंट : 👉 स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी कोणत्याही प्रकारची फी द्यावी लागत नाही विद्यार्थी वरील व्हिडीओ पाहून व्यवस्थितपणे मोबाईलच्या साह्याने हा फॉर्म भरू शकता. फार्म भरण्यासाठी ची वेबसाईट वरती देण्यात आलेली आहे. त्याच नंतर मुलांना एक सर्वात मोठा प्रॉब्लेम येत असतो तो म्हणजे त्यांच...

सर ज जी कला महाविद्यालयाचा नियोजनबद्ध विकास करावा

मुंबई, दि. 2 : राज्य शासनाने सर ज जी कला महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी आतापर्यंत 30 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. कला महाविद्यालयाने नियोजनबद्ध विकास आराखडा तयार करून सर ज जी महाविद्यालयाचा विकास करावा, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केल्या. कला संचालनालय तर्फे आयोजित 61 वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन समारोपप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत बोलत होते. यावेळी कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा, वसंत सोनवणी, मनीषा सुर्वे, गणेश तरतरे आदी उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. सामंत म्हणाले, कला महाविद्यालयाची कीर्ती जगभर पसरली आहे. येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा दिल्या पाहिजेत. त्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल. कला महाविद्यालयाच्या अडचणी लक्षात घेऊन नियोजनबद्ध आराखडा तयार करण्यात यावा. कार्यक्रमाच्या प्रारंभी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते वसंत सोनवणी यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी व जनसंपर्काच्या कामाचे संपूर्ण समन्वयन माहिती व जनसंपर्क महासंचालनालय करते. शासन निर्णय, लोकाभिमुख योजना, महत्त्वाच्या शासकीय घोषणा, मंत्रिमंडळ निर्णय आदींची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम ‘महासंवाद’ द्वारे केले जात आहे. अचूक, अधिकृत आणि वस्तुनिष्ठ माहितीसाठी एकमेव ‘महासंवाद’!