Lokmat epaper नागपूर

  1. ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टममुळे नागपूर ते दुर्गदरम्यान १३० च्या स्पीडने धावली ट्रेन
  2. नागपूर पोलिसांचे ‘मिशन फिटनेस’; वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटल करणार
  3. Marathi News, मराठी बातम्या, मराठीत ठळक बातम्या


Download: Lokmat epaper नागपूर
Size: 23.75 MB

ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टममुळे नागपूर ते दुर्गदरम्यान १३० च्या स्पीडने धावली ट्रेन

ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टममुळे नागपूर ते दुर्गदरम्यान १३० च्या स्पीडने धावली ट्रेन By June 12, 2023 09:32 PM 2023-06-12T21:32:25+5:30 2023-06-12T21:32:53+5:30 Nagpur News दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या कळमना ते दुर्ग या २६५ किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गावर ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टम कार्यान्वित करण्यात आली आहे. यामुळे नागपूर ते दुर्ग मार्गावर रेल्वेगाडी प्रतितास १३०च्या स्पीडने धावली आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे क्षेत्रातील कळमना (नागपूर) ते दुर्ग, जयरामनगर ते बिलासपूर ते बिल्हा (३२ किलोमीटर) आणि बिलासपूर ते घुटकू (१६ किलोमीटर) या एकूण ३१३ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावर ऑटो सिग्नलिंग प्रणाली सुरू करण्यात आली आहे. साधारणत: दोन रेल्वे स्थानकांमध्ये १२ ते १५ किलोमीटरचे अंतर असते. ही प्रणाली सुरू होण्यापूर्वी दोन रेल्वे स्थानकांच्या मध्ये एकच ट्रेन चालविली जात होती. त्यामुळे पहिली ट्रेन त्या स्थानकाला पार करत नाही तोपर्यंत दुसरी ट्रेन मागच्या स्थानकावर रेंगाळत होती. आता मात्र तसे होणार नाही. दोन रेल्वे स्थानकांच्या मध्ये ऑटोमॅटिक सिग्नल सिस्टममुळे दोन, तीन किंवा चारही ट्रेन एकामागोमाग सुरक्षित अंतराने धावू शकतात. पुढच्या सिग्नलमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला तर मागच्या ट्रेनला ऑटोमॅटिक सूचना मिळेल आणि त्यामुळे ती जागीच थांबविली जाईल. या प्रणालीमुळे ट्रेन विलंबाने धावण्याचा, रेंगाळण्याचा प्रकार कमी होऊन ट्रेनची गती जास्तीत जास्त वाढविण्यास मदत होईल. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर ते दुर्गपर्यंतची सेक्शनल स्पीड वाढवून राजधानी एक्स्प्रेसच्या समकक्ष ती १३० प्रतितास वेगाने चालविण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचेल, असा दावा रेल्वे प्रशासन करीत आहे. जास्त देखभालीची गरज नाही या संबं...

नागपूर पोलिसांचे ‘मिशन फिटनेस’; वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटल करणार

नागपूर पोलिसांचे ‘मिशन फिटनेस’; वैद्यकीय रेकॉर्ड डिजिटल करणार By June 14, 2023 09:26 PM 2023-06-14T21:26:18+5:30 2023-06-14T21:27:06+5:30 Nagpur News पोलिस कर्मचाऱ्यांची सखोल वैद्यकीय तपासणी होणार आहे. यासाठी नागपूर पोलिस दलाने पुढाकार घेतला असून, या तपासणीला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे याअंतर्गत कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय डाटा डिजिटली साठविण्यात येणार आहे. एका क्लिकवर मिळणार आरोग्याची माहिती प्रत्येक कर्मचाऱ्याच्या तपासणीचा रेकॉर्ड डिजिटली स्टोअर करण्यात येणार आहे. यामुळे राज्यात कर्मचारी कुठेही कर्तव्यावर असले व आरोग्याची काही समस्या जाणवली तर त्यांचा रेकॉर्ड एका क्लिकवर संबंधित डॉक्टरला उपलब्ध होऊ शकणार आहे, अशी माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी संदीप शिंदे यांनी दिली. राज्यातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. तणाव असलेल्या कर्मचाऱ्यांचे ‘सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन’ या तपासण्यांदरम्यान कर्मचाऱ्यांचे ‘सायकॅट्रिक इव्हॅल्युएशन’देखील करण्यात येत आहे. यात तणाव असलेल्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशनदेखील करण्यात येत आहे. रक्त, लघवी, ईसीजी, एक्सरे, इको, इएनटी यासारख्या चाचण्यादेखील करण्यात येत आहे. दररोज ठरावीक संख्येत कर्मचारी तपासणीसाठी बोलविण्यात येत आहेत.

Marathi News, मराठी बातम्या, मराठीत ठळक बातम्या

• 'त्या अभिनेत्यानं माझं लैंगिक..' नित्यानं सांगितलं कास्टिंग काऊचं धक्कादायक सत्य • VIDEO-स्वतःच्याच अंत्यसंस्काराला आली मृत व्यक्ती, आकाशातून पुन्हा जमिनीवर अवतरली • भारताच्या सर्वांत मोठ्या बचाव मोहिमेबाबत डॉक्युमेंटरी; History TV18 वर • तुम्ही ही बेडवर जेवता का? डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून अशी चुक करणारच नाही • लालपरी कधी तयार होताना पाहिली आहे का, नाही ना! वर्कशॉपमधून SPECIAL VIDEO

एलटीटी

मध्य रेल्वेच्या भूसावळ विभाग प्रबंधक कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्र. ०२१३९ एलटीटी-नागपूर एक्स्प्रेस शनिवार, १७ जून रोजी एलटीटी स्थानकावरून ००.५० वाजता (शुक्रवारची मध्यरात्र) रवाना होऊन शनिवारी सकाळी १०:२७ वाजता अकोला स्थानकावर येईल. तीन मिनिटांचा थांबा घेऊन ही गाडी १०:३० वाजता अकोल्याहून रवाना होऊन दुपारी १५:३२ वाजता नागपूर स्थानकावर पोहोचणार आहे. या गाडीला भूसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला मुर्तीजापूर, बडनेरा, धामनगाव, वर्धा या स्थानकांवर थांबा असणार आहे.