Marathi baatmya

  1. 11 June 2023 मराठी बातम्या


Download: Marathi baatmya
Size: 14.32 MB

11 June 2023 मराठी बातम्या

11 June 2023 Latest Marathi News Updates: वाचा महाराष्ट्रातील आणि देशभरातील मराठी बातम्या. | Read Top Marathi news from Maharashtra and across India. • मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन • पहिला हल्ला दिल्लीवर; इतर राज्यं निशाण्यावर : केजरीवाल • इतरांना दोष देण्याऐवजी आत्मपरीक्षण करावं : पायलट • कर्नाटकात आजपासून महिलांना बस प्रवास मोफत • विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारताचं लोटांगण मान्सूनचं महाराष्ट्रात आगमन मान्सूनचं आज अखेर महाराष्ट्रात आगमन झालं. दक्षिण महाराष्ट्रात पावसानं हजेरी लावली. दर वर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून चार ते पाच दिवस उशिरा आल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली. आज मान्सूननं संपूर्ण सिंधुदुर्ग, गोवा तसंच रत्नागिरी आणि कोल्हापूरचा काही भाग व्यापला. पुढच्या ४८ तासांत मान्सूनची आणखी प्रगती होण्याची शक्यता आहे. ‘बिपरजॉय’ सौराष्ट्र-कच्छचा किनारा १५ जून रोजी ओलांडण्याची शक्यता ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचं रूपांतर अतिशय तीव्र चक्रीवादळात झालं आहे आणि १५ जून रोजी दुपारी हे चक्रीवादळ सौराष्ट्र-कच्छ आणि शेजारच्या पाकिस्तानचा किनारा ओलांडेल, अशी शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तोपर्यंत या भागात मासेमारी पूर्ण बंद ठेवण्याचा आणि मासेमारांनी १२ ते १५ जूनदरम्यान मध्य आणि उत्तर अरबी समुद्रात न उतरण्याचा, तसंच या किनाऱ्यापासून दूर राहण्याचा सल्लाही विभागानं दिला आहे. याच काळात हे वादळ कच्छ आणि कराचीच्या दरम्यान किनाऱ्याला धडकण्याचीही शक्यता आहे. १४ जून रोजी सकाळपर्यंत हे वादळ उत्तरेकडं सरकेल, त्यानंतर ईशान्येकडं जाऊन १२५ ते १३५ किलोमीटर प्रति तास या वेगानं किनारपट्टी ओलांडेल. पहिला हल्ला दिल्लीवर; इतर राज्यं निशाण्यावर : केजरीवाल दिल्लीतल्या प्रशासकीय सेवांवरच्या...