मकर संक्रांत हा सण कोणत्या ऋतूत येतो

  1. Makar Sankrant, Festival
  2. Makar Sankrat : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे, मकरसंक्रात...
  3. Special Story
  4. 15 जानेवारीला 'या' वेळेत मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त
  5. Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला करा राशीनुसार दान, मिळेल अधिक पुण्य
  6. Makar Sankranti 2021: संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे का घालतात?


Download: मकर संक्रांत हा सण कोणत्या ऋतूत येतो
Size: 50.19 MB

Makar Sankrant, Festival

भारतीय संस्कृतीत सणांना अनन्य साधारण महत्त्व आहे. कारण प्रत्येक सणामागे काही ना काही उद्देश आहे. तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत. हा सण खरोखरच भारतीय परंपरेतील अनमोल ठेवा आहे. आपल्या स्नेहींना ह्या दिवशी तिळगुळ देऊन 'तिळगुळ घ्या, गोडगोड बोला' असे म्हणून एमकेकांशी प्रेमाचे संबंध कायम ठेवण्याचे आवाहन केले जात असते. जीवनातील कडवटपणा नष्ट करण्याच्या उद्देशाने एकमेंकांना तिळगुळ दिले जाते. दिवाळी संपल्यानंतरचा व नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच येणारा पहिला महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत होय. हा सण हिवाळ्यात येत असतो. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ही ह्या सणाला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. थंडीमुळे त्वचेमधील स्निग्धता कमी होऊन त्वचा कोरडी होते. तसेच शरीरातील उष्णताही कमी होत असते. तिळ ही स्निग्धता कायम ठेवण्‍याचे तर गुळ हा उष्ण असल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्‍याचे काम करत असतो. या दिवसापासून दिवस हा तिळा- तिळाने मोठा होत जातो, अशी अख्यायीका आहे. भारतील प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पध्दतीने संक्रांत सण साजरा केला जातो. गुजरातमध्ये आकाशात रंगबेरंगी पतंग उडवून तरी महाराष्ट्रात नवदांपत्यांना, नुकत्याच जन्मलेल्या बालकांना पहिल्या संक्रांतीला हलव्याचे दागिने घालून हा सण साजरा करण्याची प्रथा आहे. नाशिक जवळ येवरा येथे यादिवशी पतंगोत्सव साजरा करण्‍याची प्रथा आहे. भारतीय संस्कृतीत काळा रंग अशुभ मानला जातो, मात्र काळे कपडे परिधान करून साजरा केला जाणारा संक्रांत हा सण एकमेव आहे. या दिवशी सुवासिनी काळ्या रंगाची साडी तर पुरूष काळ्या रंगाचा कुर्ता पायजामा परिधान करीत असतात. 14 जानेवारीला सकाळच्या पहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. त्यामुळे संक्रांतीचा सण साजरा केला जातो. ...

Makar Sankrat : नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे, मकरसंक्रात...

नवीन वर्षाची सुरुवात झाल्यावर येणारा पहिला सण म्हणजे, मकर संक्रात. मकर संक्रांत हा सण ज्या महिन्यात येतो, त्या जानेवारी महिन्यात थंडीचा प्रचंड कडाका असतो.ही कडाक्याची थंडी आरोग्याला घातकही ठरते.मात्र या थंडीमध्येही एक गोष्ट दिलासा देऊ शकते. ही गोष्ट अत्यंत छोटी आहे, पण त्यापासून मिळणारे फायदे खूप मोठे आहेत. आपल्याकडे मकरसंक्रात (Makar Sankrat) आल्यावर नेहमी बोलले जाते, तिळगुळ घ्या…गोड गोड बोला…अर्थातच ही छोटी गोष्ट म्हणजे तिळ आहे.तिळ आणि त्यासोबत गुळ या दोघांचेही सेवन या कडाक्याच्या थंडीत केल्यास आरोग्याला खूप फायदा होतो.अगदी केसांपासून ते नखापर्यंत, शरीराच्या प्रत्येक अंगाला या तिळाचा आणि गुळाचा फायदा होतो. संक्रांतीचा (Makar Sankrat) सण ज्या ऋतूत येते, तो ऋतू म्हणजे शिशिर ऋतू.या ऋतुचे वैशिष्ट म्हणजे प्रचंड थंडी आणि सोबत थंडगार वारा.या सर्वाचा शरीराच्या आरोग्यावर परिणाम होतो. या सर्वात शरीराला गरम ठेवण्याची गरज असते.यासर्वात तिळ आणि गुळ यांचे सेवन केल्यास खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळेच संक्रातीला (Makar Sankrat) तिळगुळ खाल्ले जातात.तिळाचा वापर या दिवसात मुबलक प्रमाणात केला जातो.अगदी संक्रांत येण्याआधी काही दिवसांपासून घराघरात अंघोळीच्या पाण्यापासून ते जेवणापर्यंत तीळाचा मुबलक प्रमाणात वापर केला जातो.आंघोळीच्या पाण्यात तिळ टाकले जातात, याबरोबरच अंगालाही तिळाचे तेल लावून मसाज केला जातो. शिवाय जेवतांना भाकरी आणि भाजीमध्येही तिळ वापरले जातात.काही ठिकाणी, जिथे कडाक्याची थंडी पडते, तिथे तर तिळ आणि गुळ यांचा वापर करुन खिरही केली जाते. हे सर्व करण्यामागे एकच उद्देश असतो, की यातून आपले आरोग्य साधले जाते.थंडीमध्ये जो त्रास होतो, तो नियमीत तिळाचे सेवन केल्यास कमी होतो.थंड वातावरणापास...

Special Story

मकर संक्रांत एकाच दिवशी का येते? मकर संक्रांत सण दरवर्षी एकाच तारखेला का येतो? असा प्रश्न नक्कीच आपल्यातील अनेकांना पडला असेल. हिंदु संस्कृतीतील एकमेव असा सण आहे जो एकाच तारखेला येतो. याचे कारण म्हणजे तो सूर्याच्या (सूर्याच्या स्थानावर) कॅलेंडरनुसार येतो. इतर सर्व सण हे चंद्राच्या कॅलेंडरवर (चंद्राच्या स्थानावर) आधारलेले असतात, त्यामुळे ते दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येतात. मकर संक्रांत या सणाचा शेतीशीदेखील संबंध आहे. म्हणून या दिवशी विवाहित महिला एकमेकींना शेतात आलेल्या धान्याचे वाण देतात. या दिवशी स्त्रिया साज-शृंगार करुन मंदिरात जातात. हरभरे, ऊस, बोरे, गव्हाची ओंबी, तीळ अशा गोष्टी सुगडात भरुन त्या देवाला अर्पण करतात. दक्षिणायन-उत्तरायण आपण जर दररोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केले तर सूर्याची बदललेली जागा लक्षात येईल. ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रृवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो. 21 मार्च ते 21 जूनपर्यंत सूर्य उत्तरेला सरकतो. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. तर 22 सप्टेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत सूर्य दक्षिण दिशेला सरकतो. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. तर 22 मार्च आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य बरोबर पूर्व दिशेला उगवतो. या दोन तारखांना ‘विषुवदिन’ असे म्हणतात. या दिवशी दिवस-रात्र समान बारा-बारा तासांचे असतात. मकर संक्रांतच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. 21-22 डिसेंबरला सूर्याचे उत्तरायण सुरु होते. अर्थातचं त्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरुच असते. पृथ्वीवरुन पाहिले असता 21-22 डिसेंबरपासून सूर्योदयाचे स्थान दिवसेंदिवस उत्तरेकडे सरकते. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, तेव्हा या राशीला ...

15 जानेवारीला 'या' वेळेत मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त

मुंबई : इंग्रजी वर्षात पहिला सण येतो तो 'मकर संक्रांत'. दरवर्षी मकर संक्रांत 14 जानेवारी रोजी साजरी केली जायची. मात्र यंदा हा सण 15 जानेवारी रोजी साजरा केला जाणार आहे. मकर संक्रांत यामध्ये 'मकर' शब्द हा मकर राशीचा आहे. या दिवशी मकर राशीत सूर्य प्रवेश करतो. एका राशीतून दुसर्‍या राशीत सूर्याच्या जाण्याला 'संक्रांती' असं म्हणतात. मकर संक्रांतीमधील, 'मकर' हा शब्द मकर राशीचे प्रतीक आहे व 'संक्रांती' म्हणजे संक्रमण. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या दिवसाला 'मकर संक्रांती' म्हणतात. पुण्य काळ मुहूर्त : 07.19. 14 ते 12. 31 (कालावधी : 5 तास 14 मिनिटे) महापुण्य काल मुहूर्त : 07.15.14 ते 09.15.14 (कालावधी : 2 तास 0 मिनिटे) संक्रांत क्षण : 01.53.48 मकर संक्रांतीचं महत्व या दिवशी सूर्य आपला मुलगा शनिदेवसोबतचा राग विसरून पुन्हा घरी परतात. या दिवशी नदीत स्नान करून पूजा अर्चा करून दान केल्याने त्या व्यक्तीच्या पुण्याईत अगणित वाढ होते. या दिवशी शुभ दिवस सुरू होतात. हा खास दिवस सुख आणि समृद्धीचा शुभ दिवस म्हणून साजरा केला जातो.

Makar Sankranti 2023: मकर संक्रांतीला करा राशीनुसार दान, मिळेल अधिक पुण्य

यावेळी मकर संक्रांतीच्या दोन तारखांबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. तथापि, जेव्हा सूर्य देव आपली राशी बदलतो आणि मकर राशीत पोहोचतो तेव्हा संक्रांतीची सुरुवात होते. जेव्हा सूर्य देव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत येते. या वर्षी 14 जानेवारी रोजी रात्री 08.57 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल. अशा स्थितीत मकर संक्रांतीचा मुहूर्त 15 जानेवारीला येत आहे. मात्र सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाचा काळ असल्याने संक्रांतीच्या तारखेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ज्योतिषाचार्य पं. मनोज कुमार द्विवेदी यांच्या मते, शनिवार, 14 जानेवारी रोजी सूर्याचा मकर संक्रांतीचा मुहूर्त 08:57 वाजता येत असला तरी, रात्रीच्या वेळी स्नान आणि दान नाही. यासाठी उदय तिथीची मान्यता आहे म्हणजेच सूर्योदय झाल्यावर मकर संक्रांतीचे स्नान आणि दान असेल. म्हणूनच या वर्षी मकर संक्रांती रविवार, 15 जानेवारी 2023 रोजी साजरी केली जाणार आहे. राशीनुसार या गोष्टी दान करा • मेष – पिवळी फुले, हळद, तीळ पाण्यात मिसळून भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. तीळ-गुळाचे दान करावे. • वृषभ – पाण्यात पांढरे चंदन, दूध, पांढरी फुले, तीळ टाकून भगवान सूर्याला अर्घ्य द्यावे. खिचडी दान करा. • मिथुन – पाण्यात तीळ टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करा. मूग डाळ खिचडी दान करा. • कर्क- दूध, तांदूळ, तीळ पाण्यात मिसळून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. तुम्हाला संकटांपासून मुक्ती मिळेल. गूळ, तीळ दान करा. • सिंह- कुंकुम आणि रक्तपुष्प, तीळ पाण्यात टाकून सूर्याला अर्घ्य अर्पण करा.गुळ, तीळ दान करा. • कन्या- पाण्यात तीळ, दुर्वा, फुले टाकून सूर्याला अर्घ्य द्यावे. मूग डाळीची खिचडी बनवून दान करा. गाईला चारा द्या. • तूळ- पांढरे चंदन, दूध, तांदूळ दान करा. पांढरे चंदन मिसळू...

Makar Sankranti 2021: संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाची कपडे का घालतात?

मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो असे ज्योतिषशास्त्रामध्ये मानले जाते. सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण होण्यालाच संक्रांत असं म्हटलं जातं. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र मोठी असते. या दिवसापासून दिवस मोठा होतो आणि रात्र छोटी होते. मोठ्या काळोख्या रात्रीला निरोप देण्यासाठी काळे कपडे घातली जातात. संक्रांतीला काळे कपडे वापरण्यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येतो. पांढरा रंग कसा उष्णता शोषून घेत नाही, तसा काळा रंग हा ऊष्णता शोषून घेतो. त्यामुळे थंडीच्या दिवसात शरीर उबदार रहावे म्हणजे संक्रांतीला काळे कपडे वापरतात. तसेच तिळ खाल्याने शरीरात उष्णता निर्माण करण्यास उपयुक्त ठरतात त्यामुळे सांस्कृतिक तिळगुळ खाल्ला जातो.