मराठी बातम्या ताज्या

  1. 15 April 2023 मराठी ताज्या बातम्या


Download: मराठी बातम्या ताज्या
Size: 25.1 MB

15 April 2023 मराठी ताज्या बातम्या

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बस कोसळून १३ जणांचा मृत्यू जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर बोरघाट इथं शिंगरोबा मंदिराजवळ पहाटे ४ वाजता एक खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला. बसमध्ये एकूण ४२ जण प्रवास करत होते. प्रवाशांपैकी २९ जण जखमी आहेत. मुंबईच्या गोरेगाव इथल्या बाजीप्रभू झांज पथकातील तरुण मुलांचा गट पुण्यातील एक कार्यक्रम आटोपून पुन्हा मुंबईकडे परतीचा प्रवास करत असताना ही घटना घडली. या अपघाताविषयी शोक व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदत जाहीर केली आहे. अपघातातील मृतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही श्रद्धांजली वाहिली. मृतांच्या नातेवाइकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ठाणे जिल्हा कोर्टाकडून राहुल गांधींना दिलासा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बदनामीच्या खटल्यात राहुल गांधी यांना ठाणे जिल्हा कोर्टानं कोर्टात हजार राहण्यापासून कायमची सूट दिली आहे. राहुल गांधी यांचे वकील नारायण अय्यर यांनी दाखल केलेल्या अर्जावर आज सुनावणी झाली. त्या वेळी भिवंडीचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सी. वाडीकर यांनी हा निर्णय दिला. मात्र, याबरोबरच दोन अटींचं पालन करण्यासही सांगण्यात आलं आहे. ‘राहुल गांधी यांच्या वकिलाला वेळोवेळी आणि नियमितपणे प्रत्येक तारखेस कोर्टात हजार राहावं लागेल आणि कोर्टानं आरोपीला कोर्टात हजर करण्याची सूचना केल्यास राहुल गांधींना स्वतः हजर राहावं लागेल,’ या त्या दोन अटी आहेत. अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे समन्स केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात ‘सीबीआय’नं दिल्ली सरकारच्या उत्पादनशुल्क धोरणप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज स...