मराठी बातम्या ताज्या आजच्या

  1. 05 May 2023 मराठी ताज्या बातम्या


Download: मराठी बातम्या ताज्या आजच्या
Size: 58.61 MB

05 May 2023 मराठी ताज्या बातम्या

05 May 2023 Latest Marathi News Updates: वाचा महाराष्ट्रातील आणि देशभरातील आजच्या मराठी बातम्या. | Read Top Marathi news from Maharashtra and across India. • ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे अध्यक्ष शरद पवारच! • मतांसाठी काँग्रेस दहशतवादापुढे झुकला; पंतप्रधानांचा घणाघात • दहशतवाद थांबलाच पाहिजे; ‘एससीओ’मध्ये पाकिस्तानी परराष्ट्रमंत्र्यांसमोर जयशंकर यांची स्पष्ट भूमिका • ‘द केरळ स्टोरी’ चित्रपटाविरोधात केरळमध्ये निदर्शने हेही वाचा किंवा ऐका : ​ ​ ​ ‘राष्ट्रवादी काँग्रेस’चे अध्यक्ष शरद पवारच! राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेतला. अध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं त्यांनी तीन दिवसांपूर्वी जाहीर केलं होतं. मुंबईत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी अध्यक्षपद पुन्हा स्वीकारत असल्याची घोषणा केली. ‘पक्षात उत्तराधिकारी निर्माण व्हायला हवा आणि त्यासाठी संघटनात्मक बदल झाले पाहिजेत,’ असंही पवार या वेळी म्हणाले. कार्यकर्त्यांचं प्रेम आणि त्यांच्या मतांचा आदर राखून हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. पवार निर्णय जाहीर करत असताना, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार मात्र या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. ते नाराज आहेत का, असे विचारले असता, कोणाचीही नाराजी नसल्याचं पवार यांनी स्पष्ट केलं. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाबद्दल सुरू असलेल्या चर्चेत काहीही अर्थ नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषद संपवून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी पवार यांच्यावर पुष्पवृष्टी करून आनंद साजरा केला. मतांसाठी काँग्रेस दहशतवादापुढे झुकला; पंतप्रधानांचा घणाघात ‘मतांच्या राजकारणासाठी काँग्रेस दहशतवादापुढे झुकला; तसंच दहशतवादाला...