पंढरपूर लाईव्ह दर्शन

  1. पंढरपूर मराठी बातम्या
  2. Shri Vitthal Rukmini Mandir, Pandharpur
  3. Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आषाढी वारी साठी ठेवणार प्रस्थान
  4. आषाढी २०२३; वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी प्रत्येक दोन किलोमीटरवर विसावे असणार
  5. ऑनलाईन दर्शन पास बुकिंग (darshan pass booking )
  6. पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता JioTV वर


Download: पंढरपूर लाईव्ह दर्शन
Size: 27.38 MB

पंढरपूर मराठी बातम्या

• • मुंबई - मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाच ट्रेनने जळगावला रवाना, दोन्ही नेत्यांमध्ये झाली चर्चा • मुंबई - राज्यातील ऊस तोड कामगार आणि शेतमजुरांची ई श्रम पोर्टलवर नोंदणीची मोहिम हाती घ्यावी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे • मुंबई - दोन साखर कारखान्यांमधील अंतर २५ किलोमीटर आहे हे काढून टाकावं, जो मागेल त्याला कारखाना काढण्याची परवानगी द्यावी - सदाभाऊ खोत • • रिषभ पंतला वर्ल्ड कप खेळवण्याची BCCI ला घाई, टीम इंडियाच्या दोन स्टार्सची Asia Cup मध्ये होणार वापसी • • कोल्हापुरातील विशाळगडावर प्राण्यांचा बळी देण्यास बंदी, सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान • • • मुंबई - संजय राऊत धमकी प्रकरणातील आरोपी मयूर शिंदेला 19 जूनपर्यंत पोलीस कोठडी • • मोठी घोषणा : मुंबई इंडियन्सच्या संघात राशीद खान, ट्रेंट बोल्ड, कागिसो रबाडा अन् अनेक स्टार! • • • भारतीय संघात 'भाकरी' फिरणार; वेस्ट इंडिज दौऱ्यात ५ मोठे बदल दिसणार, ३ युवा खेळाडूंना संधी • नाशिक: शाळा प्रवेशोत्सव..... आई-वडिलांच्या खांद्यावर मुले निघाली शाळेला! वाजत गाजत शाळेत आणले • पुन्हा एकदा मुंबई लोकलच्या सुरक्षेचा प्रश्न पुढे आला, गुन्हेगारांना कायद्याची भीती राहिली नाही - सुप्रिया सुळे • • मेहनतीचं फळ! यशस्वी जैस्वाल टीम इंडियाच्या कसोटी संघातून खेळणार; चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट • • रत्नागिरीत कॅशिअरनेच घातला बँकेला दीड लाखाचा गंडा, चोरी लपविण्यासाठी ठेवल्या खोट्या नोटा • • माझ्या महाराष्ट्र सैनिकांशी झालेली नजरभेट सुद्धा खूप उत्साह आणि आनंद देणारी होती - राज ठाकरे • वेस्ट इंडिज दौऱ्याबाबत मोठे अपडेट्स, संघात फेरबदल ! संजू सॅमसनचे वन डे, ट्वेंटी-२० संघात होणार पुनरागमन • • नाशिक: शाळांमध्ये प्रवेशो...

Shri Vitthal Rukmini Mandir, Pandharpur

श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर,पंढरपूर पंढरपूर येथील श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराची ही अधिकृत वेबसाईट आहे. भाविकांना श्रीपांडुरंगाची,श्रीरुक्मिणीमातेची तसेच पंढरपूरची महत्वाची परंतु थोडक्यात अशी माहिती याद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पंढरपूर येथे येण्याचे मार्ग, नकाशे, निवास व्यवस्था, परिसरातील तीर्थस्थळे, मंदिरातील दिनक्रम, मंदिर अधिनियम १९७३, मंदिर समितीचे उपक्रम, महत्वाचे दूरध्वनी क्रमांक इ. माहिती या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. सूचना किंवा प्रतिक्रिया आमच्याकडे किंवा [email protected] या ईमेल पत्त्यांवर पाठवाव्यात.धन्यवाद. कार्यालय संपर्क क्र. ०२१८६-२२४४६६,२२३५५० भक्त निवास संपर्क क्र. ०२१८६-२२८८८८, २२२१११, २२३१११

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2023: संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आषाढी वारी साठी ठेवणार प्रस्थान

संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थानानंतर आज (11 जून) आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala) प्रस्थान ठेवणार आहे. मागील 350 वर्ष जुनी ही वारकरी संप्रादयाची वारीची परंपरा आजही उत्साहात कायम आहे. यंदा या पालखी सोहळ्याचं 338 वं वर्ष आहे, त्यासाठी वैष्णवांचा मेळा अलंकापुरी मध्ये जमला आहे. आजपासून टाळ- मृदुंगाच्या तालावर वारकरी आषाढी एकादशी साठी पंढरपूर कडे रवाना होतील. पुणे शहरामध्ये पालखी सोहळ्याच्या निमित्ताने वाहतूकीमध्येही बदल करण्यात आले आहेत. आज संध्याकाळी 4 च्या सुमारास माऊलींची पालखी प्रस्थान ठेवणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी माऊलींचा पालखी सोहळा गांधी वाडा येथील आजोळघरी आळंदी मुक्कामी असते. त्यानंतर दोन दिवसांनी सासवड मुक्कामास दिवे घाटातून तिचा प्रवास सुरू होतो. पायी मजल- दर मजल करत ही पालखी 28 जूनला पंढरपूरात दाखल होईल तर 29 जूनला विठूरायाचं दर्शन होणार आहे. पहा माऊलींच्या पालखी सोहळ्याचं वेळापत्रक माऊलींच्या पालखीसाठी पुण्यातील वाहतूकीमधील बदल — पुणे शहर वाहतूक पोलीस (@PuneCityTraffic) पुण्यामध्ये 12 जून दिवशी काही मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले असून त्याला पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. 12 ते 15 जून पर्यंत वाहतूकीमध्ये या पालखी सोहळ्यांच्या अनुषंगाने काही बदल करण्यात आले आहेत.

आषाढी २०२३; वारकऱ्यांच्या विश्रांतीसाठी प्रत्येक दोन किलोमीटरवर विसावे असणार

सोलापूर : उष्णतेची तीव्रता कमी झालेली नसल्याने वारकऱ्यांसाठी दीड पट जास्त टँकर तसेच थंड पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक दोन किलोमीटरवर विसावे केले आहेत. त्याठिकाणी आरोग्य पथके ठेवण्यात आली आहेत. माझी वसुंधरा अभियानांतर्गत चौथा टप्पा सुरु करण्यात आला असून प्रत्येक मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. आषाढी वारीनिमित्त १५ ते १८ लाख भाविक पंढरपुरला येतात. वारकऱ्यांना आवश्यक सोयी-सुविधा देऊन वारी स्वच्छ, हरित व निर्मल करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. यासाठी वारीपूर्वी प्रत्यक्ष पालखी तळ व मार्गाची पाहणी केली. पालखी मार्गावर एकूण २ हजार ७०० शौचायले उपलब्ध असून मागच्या वर्षीपेक्षा ६० टक्के जास्त शौचालये उपलब्ध करुन दिली आहेत. त्यापैकी महिलांसाठी ५० टक्के शौचालये देण्यात आली आहेत. याशिवाय पालखी सोहळ्यामध्ये येणाऱ्या नागरिकांना आवश्यक माहिती व मदत मिळण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्यात येत आहे. या ॲपमध्ये पालखी मार्गक्रमण, विसावा व मुक्कामचे ठिकाण, पालखी सोहळ्याचे प्रमुख, वैद्यकीय सेवा, टँकर, गॅसची टाकी मिळण्याचे ठिकाण, रुग्णवाहिका, अग्निशमन, लाईव्ह पंढरपूर दर्शन आदी महत्वाची माहिती पुरविण्यात येणार आहे. Web Title: Ashadhi 2023; There will be rest stops every two kilometers for the runners to rest Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

ऑनलाईन दर्शन पास बुकिंग (darshan pass booking )

ऑनलाईन दर्शन पास बुकिंग श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने मागील काही वर्षांपासून ऑनलाईन दर्शन बुकिंगची सुविधा उपलब्द करून दिली आहे. या सेवेद्वारे आपण आपल्या दर्शनाची वेळ ठरवून त्यानुसार बुकिंग करू शकतो. आपल्या सोयीचा दिवस आणि वेळ निवडण्याची सुविधा असल्याने आपण त्याच वेळेत येऊन दर्शन करू शकतो. त्यामुळे आपला बराच वेळ वाचतो. आणि दर्शन रांगेत तासनतास उभा राहावे लागत नाही . त्यामुळे श्री विठ्ठल भक्तांनी पंढरपूरला येण्याचे ठरवले असेल तर आपल्या येण्याचा दिवस निश्चित करून त्या वेळेचे दर्शन पास आधीच बुक करावे. दर्शन पास बुक करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा आपली सर्व माहिती द्यावी . आणि दर्शनास येताना आपले ओळखपत्र ( उदा. आधारकार्ड ) सोबत ठेवावे. ज्यामुळे दर्शन पासचा गैरवापर होणार नाही. दर्शन पास कसा बुक करावा ? व्हिडीओ पहा श्री विठ्ठल दर्शन या वेबसाईटवर आपल्याला पंढरपूर येथील प्रसिद्ध श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर शहर, परिसर याविषयी माहिती विनामूल्य उपलब्ध केली जाईल. त्याच बरोबर नियमितपणे श्री विठ्ठल रुक्मिणीचे फोटो, व्हिडीओ ,चंद्रभागा तीर्थ , पंढरपूर परिसरातील इतर मंदिरे, प्रेक्षणीय स्थळे इत्यादी माहिती विनामूल्य दिली जाईल. हि सेवा विनामूल्य असली तरी आपण विठ्ठल दर्शन या वेबसाईटला ऐच्छिक देणगी देऊ शकता.

पंढरपूर च्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लाईव्ह दर्शन आता JioTV वर

जिओ टीव्ही वर लाईव्ह दर्शन घेण्यासाठी भाविक 'दर्शन' आयकॉन वर क्लिक करून विठ्ठल रुक्मिणी चॅनेल वर जाऊन आपल्या आराध्य देवतेचे दर्शन घेऊ शकतात.याआधी जिओ टीव्ही वर श्री अमरनाथ, चार धाम, तुळजापूर, कोल्हापूर ची महालक्ष्मी, अष्टविनायक, जेजुरीचा खंडोबा यासारख्या देवतांचे लाईव्ह दर्शन उपलब्ध असून भाविक दररोज या देवतांचे लाईव्ह दर्शन घेतात.