पांडुरंगाचे अभंग

  1. अवघी मिथ्या आटी
  2. 25 Namo Adirupa


Download: पांडुरंगाचे अभंग
Size: 69.1 MB

अवघी मिथ्या आटी

अवघी मिथ्या आटी – अवघी मिथ्या आटी । राम नाहीं जव कंठीं ॥१॥ सावधान सावधान । उगवीं संकल्पीं हें मन ॥ध्रु.॥ सांडिलें तें मांडे। आग्रह उरल्या काळें दंडे ॥२॥ तुका म्हणे आलें भागा । देउनि चिंतीं पांडुरंगा ॥३॥ अर्थ रामनाम कंठात जो पर्यंत येत नाही तो पर्यंत सर्व आटाआटी प्रयत्न व्यर्थच आहत त्यामुळे तू सावध हो सावध हो सर्व संकल्पनातूनमोहाच्या जाळ्यातून मनाची सुटका कर.एखाद्या गोष्टीचा त्याग केला आणि त्याचा पुन्हा स्वीकार केला तर मग यम दंड करतो.तुकाराम महाराज म्हणतात आपल्या भाग्यात जे आले आहे ते पांडुरंगाला अर्पण करून पांडुरंगाचे चिंतन करत जा. अभंग विडिओ स्वरूपात पहा . अवघी मिथ्या आटी – संत तुकाराम अभंग संत तुकाराम अँप डाउनलोड Post navigation

25 Namo Adirupa

‘नमो आदिरूपा ओंकारस्वरूपा, विश्वाचिया रूपा पांडुरंगा| तुझिया सत्तेंने तुझे गुण गावू, तेणें सुखी राहूं सर्वकाळ|| तूंचि श्रोता वक्ता ज्ञानासि अंजन, सर्व होणें जाणें तुझे हातीं| तुका म्हणे जेथें नाहीं मी तूं पण, स्तवावें तें कवण कवणालागीं||’ संतश्रेष्ठ श्रीतुकाराममहाराजांना भगवंतांनी स्वप्नात दर्शन देऊन “सुंदर अभंगांची रचना करा” असा आदेश दिला. “आपल्यावर सरस्वतीची कृपा आहे. आपली अभंग गाथा लोकमान्य होईल” असे भगवंताकडून वरदान प्राप्त झाले. “भगवंताने आशीर्वाद दिले आहेतच तर आज्ञापालन करू. सर्व उत्तमच होणार आहे कारण तोच माझा रक्षक आहे” असा विचार करीत श्रीतुकाराममहाराजांनी अभंग लिहायला घेतले. “पहिला अभंग देवाच्या वंदनाचा असावा” आणि त्याच क्षणी श्रीगणेशाचे व पांडुरंगाचे एकत्रित मंगल ज्यात सहज होणार होते, अशा ‘ओंकाराचे’ त्यांना स्मरण झाले. श्रीतुकाराममहाराजांना विलक्षण आनंद झाला. पांडुरंगाच्या कृपाशीर्वादानेच मंगलाचा अभंग रचला गेला तो वरीलप्रमाणे. या अभंगाचा अर्थ असा- ‘एक ओंकार, त्या ओंकारापासून ब्रह्मा, विष्णु, महेश व पुढे सर्व विश्व आणि वेद यांची निर्मिती झाली. विश्वरूप धारण करणारा तू पांडुरंग आहेस’ असे वर्णन करून श्रीतुकाराममहाराज पुढे म्हणतात, “तूच विश्वाचा आदि असून हे विश्व तुझेच रूप आहे. तुझ्याच कृपेने तुझेच गुण सदैव गात राहून आम्ही सुखी राहणार असा विश्वास आहे. तू श्रोता व वक्ता आहेस. सर्वकाही तुझ्याच हातात आहे. तुझ्या ठिकाणी आम्ही एकरूप झालो आहोत. आमची स्तुति गोड मानून घे आणि कृपा कर.” या सुंदर अभंगात संपूर्ण तत्त्वज्ञान सामावलेले आहे. श्रीमद्भागवतामध्ये महाभागवत भक्तप्रल्हादांचा त्यांच्या गुरूंबरोबर झालेला संवादही प्रेरक आहे. पाठशालेत शिकत असताना गुरु म्हणतात, “प्रल्हादा, तुझे...