पहाटेचे वर्णन

  1. खालील विषयांवर निबंधलेखन करा. वर्णनात्मक निबंध पहाटेचे सौंदर्य. आमची अविस्मरणीय सहल
  2. रम्य पहाट मराठी निबंध
  3. रम्य पहाट मराठी निबंध
  4. पहाटेचे वर्णन करणारी रचना
  5. Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन – Maharashtra Board Solutions
  6. पाच तास झटून रुक्मिणीमातेची पावले केली पूर्ववत
  7. विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी: वार्तालाप (11) नामाची महिमा
  8. इयत्ता १२ मराठी रेशीमबंध मराठी स्वाध्याय PDF ~ HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board
  9. वर्णनात्मक निबंध मराठी


Download: पहाटेचे वर्णन
Size: 21.48 MB

खालील विषयांवर निबंधलेखन करा. वर्णनात्मक निबंध पहाटेचे सौंदर्य. आमची अविस्मरणीय सहल

पहाटेचे सौंदर्य पहाट आपल्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावर एक नवीन दिवसाची नवीन स्वप्नांची नवीन ध्येयाची नवीन योजनांची आणि नवीन आयुष्याची नवीन आनंदाची नवीन पर्वाची सौंदर्य घेऊन आलेली असते. अश्याच एका सुंदर पहाटेच्या सौंदर्याचा अनुभव मी घेतला. वातावरण खूप छान होते. आजुबाजुला अनेजण उस्तहात व्यायाम करत होते. आरोग्याबाबत जागरूक लोक, जवळपास सर्व वयोगटातील लोक मॉर्निंग वॉक करताना मला पहायला मिळाले. वाटेत लागलेल्या मैदानावर मुले पळण्याचा व्यायाम करीत होती. त्यांच्याकडे पाहून आपणही रोज रोज असे व्यायामाला यायचे हे मनातल्या मनात ठरवले. पहाटेचा तो गार मंद वारा मला अनुभवता आला. मी अनेक कवितांमध्ये पहाटेच केलेलं सुंदर वर्णन वाचले होते परंतु आज ते स्वतः समोर पहायला मिळत होते. निसर्गाची नवनवीन रूपे मी पाहिली. इथून पुढे पहाटे लवकर उठून पहाटेचे सौंदर्य अनुभवायचे मी ठरवले. मनाला वेगळीच प्रसन्नता येत होती. हा अनुभव माझ्यासाठी नवा होता. अंधाराचे जाळे फिटू लागले होते. हळूहळू सूर्य नारायण वर येऊ लागला. आता रस्ते नीट दिसू लागले होते. सकाळी झाडांवर पक्षी किलबिलाट करताना पाहून मन आतून प्रसन्न होते. बहरलेली शेतं बघून जणू स्वर्गच अनुभवल्यासारखं वाटले. आजूबाजूचा हिरवागार निसर्ग आणि हळू हळू वर येणारा सूर्य हे दृश्य खूपच छान वाटत होते. हे रम्य दृश्य मला अनोखं होतं. निसर्गात केवढे सौंदर्य दडले आहे हे मी माझ्या डोळ्यांनी पाहत होतो. रस्त्यावर जास्त रहदारी पहायला मिळत न्हवती. काही लोक आळस झटकत व्यायाम करत होती. वातावरण शांत आणि प्रसन्न वाटत होते. ताजी हवा माझ्या शरीरातील सर्व आळस काढून टाकत होती. शेजारच्या देवळामधे काकड आरती चालू होती. काही चाहची दुकाने उघडली होती. वातावरण थोडे थंड असल्यामुळे लोकांनी कानटोपी, स्...

रम्य पहाट मराठी निबंध

पहाटेची वेळ अतिशय प्रसन्न असते .रोमारोमात चैतन्य फुलवणारी. मनाला मोहवणारी अल्हाददायक पहाट दिवसभराच्या कामासाठी ऊर्जा आपल्या शरीरात निर्माण करते. विशेषतः पावसाळ्यानंतरच्या काळातील पहाट अधिक चैतन्यमय प्रसन्न असते कारण या पहाटे मध्ये ग्रीष्मातील अंग जाळणारी दाहकता नसते, तसेच वर्षा ऋतु मधील पावसाची संततधारही नसते. पावसाळा नुकताच संपलेला असतो. या वेळी आकाश निरभ्र होते. पहाट होताच सगळीकडे पसरलेला काळोखाचा पडदा हळूहळू विरळ होत जातो आणि त्या पडद्यामागे घडलेल्या अस्पष्ट गोष्टी हळूहळू दिसू लागतात . त्यांचे अस्तित्व जाणवू लागते. त्याच वेळी आकाशातील पांढऱ्या ढगांची गडबड ही चालू असते . लहान मुलांसारखे एकमेकांना ढकलत प्रत्येक ढग पुढे येण्याचा प्रयत्न करत असतो. स्वच्छ निळे आकाश असते आणि त्यामध्ये पांढऱ्या रंगांची दाटी हे बघून म्हणाला अगदी आल्हाददायक वाटते . एखाद्या कुशल चित्रकाराने सहजपणाने आपल्या कुंचल्यातून चित्र रेखाटावे तसेच सर्वात महान चित्रकार असलेल्या निसर्गाने रेखाटलेले हे चित्र आणि त्यातील रंगसंगती अप्रतिमच असते. साधेपणातील सौंदर्य आपल्या निदर्शनात येते. अशावेळी माझ्या मनात हिंदीतील एक वाक्य सहज आणि सतत येते ते म्हणजे," सादगी मे ही सुंदरता हैं! " हिवाळ्यातील सकाळ मात्र फारच गंमत करून जाते. हिवाळ्यात केलेला व्यायाम आरोग्याच्या दृष्टीने अधिक पोषक असतो. त्यामुळे हिवाळ्यात पहाटे फिरायला आणि व्यायाम करायला जाणाऱ्यांची चांगलीच दांडी उडते. सकाळच्या बोचऱ्या थंडीत बिछान्यातून बाहेर येण्याचे धाडसच होत नाही . आईने पांघरून दिलेल्या किंवा आजीच्या जुन्या साडी पासून बनवलेल्या गोधडी मधली ऊब जगावेगळीच असते. त्यावेळी एका क्षणाला मन म्हणते चला आज व्यायामाला जाऊया, पण अंगावरचे पांघरून काढताच थंडीमु...

रम्य पहाट मराठी निबंध

नमस्कार मित्रांनो रम्य पहाट मराठी निबंध या विषयावर खूप वेळा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यामुळे मी आशा करते की ही पोस्ट तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल तुम्ही पेपरला जायच्या आधी ही पोस्ट एकदा वाचून गेला तर तुम्हाला पेपर मध्ये नक्कीच मदत होईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला रम्य पहाट मराठी निबंध रम्य पहाट मराठी निबंध | Essay on pahat in Marathi मी ह्या वर्षीच्या सुट्टीत माझा वर्गमित्र वैभव याच्या गावी जायचे ठरवले वैभवच्या गावी येऊन पोहोचलो तेव्हा बरीच रात्र झाली होती दिवसभर कष्टाची कामे करून गाव शांत झोपले होते वैभवच्या घरात माझे मोठ्या प्रेमाने स्वागत झाले संध्याकाळच्या जेवणासाठी स्वादिष्ट असं भोजन होतं. जेवण झाल्यानंतर आम्ही सर्वजण झोपायला गेलो. सकाळी मला जाग आली तेव्हा सगळीकडे अंधार होता पहाट झालेली नव्हती वैभव च्या घरातील मंडळी मात्र जागी झालेली होती त्या सर्वांची दररोजची कामे शांतपणे चालू होती मी वैभव ला विचारले बाहेर एक फेरी मारून येऊया का लगेच होकार दिला मग पहाटेची भ्रमंती करण्यासाठी मी आणि वैभव घराबाहेर पडलो. अजून सूर्य उगवला नव्हता दिशा नुकत्याच उजळत होत्या सारा गाव हळूहळू जागा होत होता घरोघरी अंगणात सडा सावन झाडून ही कामे चालू होती वातावरण शांत व प्रसन्न होते मी आणि वैभव मूकपणे चालत होतो शहरात कधी अनुभवायला न मिळणारी इतकी शांतता आणि प्रसन्नता माझ्या मनाला सुखावत होती. गावाकडे येऊन खूप प्रसन्न वाटत होतं सगळं काही आता अंधुक अंधुक दिसत होतं आकाशातील तारे हळूहळू विजू लागले एखादाच तारा आपली तेजस्वी अस्तित्व दाखवत होता. पूर्वेच्या कडाचे आकाशात केशरी आणि गुलाबी रंगात अशा विविध छटांनी उजळून निघत होते जसे एखाद्या विदूषक रंगीबिरंगी कपडे घालतो तसेच रंगीबिरंग...

पहाटेचे वर्णन करणारी रचना

प्राचीवरती, रंग घेउनी, उषा लाजरी, आली शुभ शकुनांची, रांगोळी ही, अवनीवरती, दिसली क्षितिजावरती, रथ घेऊनी, रविराज हळू, येई येताना मग, हात धरोनी, ऊषेलाही,घेई लाज लाजुनी, अता उषेची, लाली दिसून, आली नटली सजली, खुलली हसली, अरुणावर, भुलली मंद मंद तो, पहाटवारा, शीळ नवीनच, घेई त्याच शीळेने,परिसर सारा , भारावूनी, जाई चाऱ्यासाठी, सारे पक्षी, दूर रानी,जाई पान्हा अपुला, पिलास देण्या, धेनू करती, घाई मंदिरातला, घंटारव तो, मुग्ध करुनी, जाई त्याच रवाने, सुवासिनींची लगबग सूरू, होई भूपाळीच्या मधुर स्वराने झुंजूमुंजू होई पहा माधवा, पूर्व दिशेला,अरुणोदयहोई

Maharashtra Board Class 12 Marathi Yuvakbharati Solutions निबंध लेखन – Maharashtra Board Solutions

कृती खालील विषयांवर निबंधलेखन करा. प्रश्न 1. वर्णनात्मक निबंध- पहाटेचे सौंदर्य. आमची अविस्मरणीय सहल. उत्तर : वर्णनात्मक निबंध दैनंदिन जीवनात आपण पाहिलेल्या व्यक्तींचे, प्रसंगांचे, दृश्यांचे किंवा वस्तूंचे शब्दांनी केलेले प्रत्ययकारक चित्रण म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. वर्णिलेल्या प्रसंगांतील, दृश्यांतील, मानवी स्वभावांतील बारकाव्यांचा तपशील येणे वर्णनात्मक निबंधात आवश्यक असते. समजा, आपण एखादया व्यक्तीचे वर्णन करीत आहोत; अशा वेळी त्या निबंधात त्या व्यक्तीच्या सद्गुणांचे वर्णन येणारच. पण त्याचबरोबर (त्या व्यक्तीमधील उणिवाही सांगितल्या पाहिजेत. तसेच, तिच्या हालचाली, लकबी, सवयी यांतील बारकावे सांगितले पाहिजेत. म्हणजे ती व्यक्ती आपल्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी राहते. असे लेखन घडले, तर तो चांगला वर्णनात्मक निबंध ठरेल. व्यक्तीच्या वर्णनाप्रमाणेच वस्तू, ठिकाण, दृश्य, प्रसंग यांचेही हुबेहूब, प्रत्ययकारी वर्णन लिहिता आले पाहिजे. ती वस्तू , ते ठिकाण आपण समोर उभे राहून पाहत आहोत, असा प्रत्यय आला पाहिजे. प्रत्ययकारकता हा वर्णनात्मक निबंधाचा प्राण आहे. नोंद : येथे निबंधात विदयार्थ्यांच्या मार्गदर्शनार्थ मुद्दे दिलेले आहेत. परीक्षेत केवळ निबंधांचे विषय देण्यात येतात, याची नोंद घ्यावी. वर्णनात्मक निबंधाचा एक नमुना : घरातील एक उपद्रवी कीटक [मुद्दे : उपद्रवकारक कीटकांचा प्राथमिक परिचय – त्रासाचे स्वरूप – कीटकांविषयी कुतूहल – कीटकांचे स्थूल स्वरूप – वागण्याची वैशिष्ट्यपूर्ण रीत – कीटकांपासून होणारा महत्त्वाचा त्रास – त्या कीटकांची पैदास – त्या कीटकांच्या निर्मूलनाचा मार्ग.] माशी ही परमेश्वराप्रमाणे सर्वव्यापी व सर्वसंचारी आहे. कोठेही जा. तुम्हांला माशी आढळणारच. मी तरी माशी नसलेले ठिकाण अज...

पाच तास झटून रुक्मिणीमातेची पावले केली पूर्ववत

पुणे : आशिष देशमुख ‘आम्ही रात्री बारा वाजता रुक्मिणी मातेच्या गाभार्‍यात प्रवेश केला. या ठिकाणचे वातावरण एका सकारात्मक ऊर्जेने भारलेले असल्याने थकवा आलाच नाही. मातेच्या पावलांची खूप झीज झाली होती. रात्रीच्या नीरव शांततेत आम्ही कामाला लागलो ते पहाटेचे पाच कधी वाजले, ते कळलेच नाही. पावले जेव्हा पूर्ववत झाली तेव्हा आम्हा सर्वांना रखुमाईची मनोभावे सेवा केल्याचे भाग्य लाभले. हा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे…’हे शब्द आहेत केंद्रीय पुरातत्व विभागाच्या विज्ञान विभागाच्या पथकाचे प्रमुख श्रीकांत मिश्रा यांचे. केंद्राच्या या टीमचे प्रमुख कार्यालय औरंगाबाद येथे आहे. त्यावर देशातील 13 राज्यांचा कार्यभार आहे. तसेच वेळप्रसंगी त्यांच्या टीमला विदेशातील मूर्तिसंवर्धनासाठी जावे लागते. या टीमने 2015-16 मध्ये पांडुरंगाच्या मंदिरावर संवर्धनाचे काम केले आहे. त्यानंतर याच टीमने प्रथम 2020 मध्ये कोरोना काळात विठ्ठलमूर्तीवर वज्र-लेप करण्याचे काम केले. यंदा मे 2022 मध्ये रुक्मिणी मातेच्या चरणांवर संवर्धन प्रक्रिया करण्याचे काम केले आहे. वज्र-लेपानिमित्त वारंवार पंढरपुरात जाणारे हे रसायनशास्त्रज्ञही पंढरपुरात गेल्यावर मूर्तीसमोर गेले की भान हरपून जाऊन भावविभोर होतात, अशी कबुलीच त्यांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना दिली. विठ्ठल आणि रुक्मिणी या दोन्ही मूर्ती वेगवेगळ्या पाषाणात तयार केल्या आहेत. विठ्ठलमूर्तीचा दगड खडबडीत, तर रुक्मिणी मातेच्या मूर्तीचा दगड मऊ आहे. दोन्ही मूर्तींच्या पायांची खूपच झीज झाली होती.

पन्हाळगड

मंडळी लेखाच्या शीर्षकात प्रश्नचिन्ह टाकायचे कारण या ट्रेकबद्दल मी ज्या ज्या लोकांशी बोललो होतो त्या सर्वांनी हा ट्रेक करायला किमान दोन दिवस पाहीजेतच असे ठासुन सांगितले होते.त्यामुळे भावाने मला जेव्हा सांगितले की मुंबईचे जिजाउ प्रतिष्ठान हा ट्रेक एका दिवसात करते आणि आजपर्यंत सहा वेळा त्यांनी दर वर्षी हा ट्रेक असाच केलाय तेव्हा मी त्याला वेड्यात काढले. हा ट्रेक "द लाँगेस्ट वन डे इन सह्याद्री" म्हणुन ओळखला जातो. पन्हाळागड ते विशाळगड अंतर अंदाजे ५७ कि.मी. जे या ट्रेकला जाऊन आले असतील किंवा ज्यांनी वाचले ऐकले असेल त्यांना या ट्रेकच्या कठीणपणाबद्दल कल्पना असेलच.मलाही होती आणि त्यातच माझ्या ड्रीम ट्रेकमधे टॉपवर असलेला हा ट्रेक गेली अनेक वर्षे मला हुलकावणी देत होता. शेवटी धीर केला आणि मुंबईच्या साटम सरांना फोन लावला.(साटम सर मुंबई महापालिकेत नोकरीला आहेत आणि ट्रेकिंग हा त्यांचा व्यवसाय नाही .केवळ ईतिहासाच्या वेडापायी असे ट्रेक घेउन जातात,शिवाय स्वतः सुद्धा कायम फिरतीवर असतात.) साटम सरांनी स्पष्ट शब्दात मला सांगितले "हे पहा,हा अतिशय कठीण ट्रेक आहे.बाजीप्रभु आणि मावळ्यांनी ते अंतर एका दिवसात तोडले होते.त्यांना श्रद्धांजली म्हणुन आम्ही तो एका दिवसातच करतो.मग २०/२२/२४ कितीही तास लागोत.तुम्ही आपापल्या तब्येतीचा विचार करा आणि मगच या.तिकडे येउन काही त्रास झाला तर मध्ये काही मदत मिळण्याची शक्यता कमीच." पण सर जसजसे माझे ब्रेनवॉशिंग करत होते तसतसा माझा निश्चय पक्का होत होता.आणि मी शेवटी माझा सहभाग पक्का करुन टाकला. ==================================================== थोडा ईतिहास सांगतो.... अफझलखान वधानंतर महाराजांनी मोठी मोहीम सुरु केली आणि आदीलशाहीचा बराच मुलूख जिंकला.त्यांचे पारीपत्य करण्...

विवेक पटाईत / कविता, ललित लेख इत्यादी: वार्तालाप (11) नामाची महिमा

समर्थ रामदासांनी श्रीसार्थ दासबोधात चौथ्या दशकातील तिसर्‍या समासात नामाच्या माहिमेचे वर्णन केले आहे. समर्थ म्हणतात नामस्मरणाचा अधिकार लहान थोर सर्वांना आहे.भगवंताचे नामस्मरण केल्याने मूढ व्यक्ति संसाररूपी समुद्र सहज पार करून जातो. सांसारिक समस्यांचे समाधान ही नाम स्मरणाने सहज होते. प्र भू श्रीरामाने समुद्रात टाकलेला दगड पाण्यात बुडून गेला. वानरांनी राम नाव लिहून टाकलेले दगड पाण्यावर तरंगत राहिले. ही आहे नामाची महिमा. एक जुनी आठवण. एकदा आमच्या मंत्रालयात आलेल्या नव्या अधिकार्‍याला कारचे लाईसेन्स बनवायचे होते. तो दिल्लीच्या एका आरटीओत गेला. तिथे काउंटर वर असलेल्या कर्मचार्‍याला त्याचा परिचय दिला. पण तो कर्मचारी त्याच्या कडे दुर्लक्ष करत म्हणाला, तुमच्या सारखे भरपूर साहेब इथे येतात, जाऊन लाइनीत उभे रहा. तिथली भीड पाहून अधिकारी कार्यालयात परतला. त्याने आपल्या पीएला समस्या सांगितली. पीए म्हणाला चिंता करू नका उद्या तुमचे काम होईल. पीएने साहेबांचे नाव घेऊन आरटीओच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या स्टाफची बोलणी केली. साहेबांची अपाइंटमेंट फिक्स केली. दुसर्‍या दिवशी साहेब पुन्हा आरटीओ गेले. अर्ध्या तासात साहेबाला लाईसेन्स मिळाले. जे साहेबाला जमले नाही त्यांच्या पीए ने साहेबांचे नाव घेऊन सहज केले. मोठ्या लोकांचे नाव घेऊन संकटातून सहज मुक्ति मिळते असा अनुभव आयुष्यात सर्वांनाच येतो. तसेच आपण कितीही पापी असलो तरी भगवंताचे नाव घेऊन सहज संसार चक्रातून अजामीळ प्रमाणे मुक्त होऊ शकतो. • ▼ (21) • ► (1) • ▼ (2) • • • ► (4) • ► (6) • ► (4) • ► (4) • ► (21) • ► (2) • ► (4) • ► (2) • ► (5) • ► (3) • ► (2) • ► (1) • ► (2) • ► (24) • ► (5) • ► (2) • ► (1) • ► (2) • ► (4) • ► (6) • ► (1) • ► (1) • ► (2) • ►...

इयत्ता १२ मराठी रेशीमबंध मराठी स्वाध्याय PDF ~ HSSlive: Plus One & Plus Two Notes & Solutions for Kerala State Board

इयत्ता १२ मराठी रेशीमबंध मराठी स्वाध्याय PDF या लेखात, आम्ही मराठी रेशीमबंध विषयासाठी इयत्ता १२ मराठी सोल्यूशन्स देऊ. इयत्ता १२ मधील विद्यार्थी पाठ्यपुस्तकांमध्ये उपस्थित असलेल्या व्यायामांसाठी प्रश्न आणि उत्तरे डाउनलोड आणि कॉपी करण्यास सक्षम असतील. इयत्ता १२ मराठी रेशीमबंधाच्या पुस्तकात महाराष्ट्र बोर्डाच्या अभ्यासक्रमातील सर्व प्रश्नांचा समावेश आहे. येथे सर्व प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणासह सोडवले आहेत आणि डाउनलोड करण्यासाठी विनामूल्य उपलब्ध आहेत. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता १२ मराठी रेशीमबंधाचे पुस्तक खाली दिले आहे. आम्‍हाला आशा आहे की आमच्‍या इयत्‍ता १२ वीच्‍या मराठी रेशीमबंधाचे पुस्‍तक तुमच्‍या अभ्यासात मदत करेल! जर तुम्हाला आमचे इयत्ता १२ चे पुस्तक आवडले असेल तर कृपया ही पोस्ट शेअर करा. इयत्ता १२ मराठी रेशीमबंध स्वाध्याय à...

वर्णनात्मक निबंध मराठी

5/5 - (4 votes) वर्णनात्मक निबंध मराठी | Varnatmak Nibandh In Marathi वर्णनात्मक निबंध : वर्णनात्मक निबंध हा निबंध लेखनाचा एक मुख्य भाग आहे. वर्णनात्मक निबंध हा स्थळ व ऋतू निसर्ग प्रवास याही घटनांचे वर्णन करतो. वर्णनात्मक निबंधामध्ये प्राणी स्थान वस्तू दृश्य एखादी व्यक्ती या गोष्टींचा वर्णन केला जातो . वर्णनात्मक निबंध मध्ये निबंधकार एखादी घटना तथ्य दृश्य वस्तू स्थान या क्रमबद्ध वर्णन अशाप्रकारे करतो की पाठक ते समक्ष तिथे दृश्य पहात आहे. आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे वस्तूचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब वर्णन करणे शब्दात रेखाटलेले चित्र वाचकांसमोर उभे करणे म्हणजे वर्णनात्मक निबंध होय. एखांदा चित्रकार हुबेहूब एखाद्या निसर्गाचे एखाद्या वस्तूची कृपे खूप चित्र रेखाटतो तसेच आपल्याला देखील ही चित्र काढायचे पण ते शब्दात काढायचे आहे त्याला वर्णनात्मक निबंध आपण म्हणू शकतो. आपले शब्द असे असले पाहिजे निबंध की ते वाचकांसमोर हुबेहूब समोर उभे राहिले पाहिजे. वर्णनात्मक निबंध मराठी | Varnatmak Nibandh In Marathi वर्णनात्मक निबंध मराठी | Varnatmak Nibandh In Marathi वर्णनात्मक निबंध म्हणजे काय? आपण जे पाहिले अनुभवले त्याचे चांगली वर्णन अशा प्रकारच्या निबंधात अपेक्षित असते. एखादे दृश्य, सहल, घटना सन ,ऋतू ,प्रवास स्थळ यांचे खरे तर शब्दचित्र रेखाटायचे असते. लेखन करताना त्यात लालीत्य आणि कलात्मकता असावी लागते . आपल्याला जे लेखन करायचे आहे ते अतिशय सुंदर असले पाहिजे. वर्णनाला भाषिक अलंकारांचे पाठबळ तर असतेच शिवाय भाषा ओघवती ही असते. त्यामध्ये भावनांचे,कल्पनांचे,विचारांची गहिरे रंग भरणे ही तितकेच महत्त्वाचे असते. निबंध लिहीत असताना अधून मधून भाषिक सौंदर्य कणाची उधळण हवीच. थोडक्यात काय वर्णनात्मक नि...