रौंदळ

  1. Raundal
  2. Raundal Teaser: अॅक्शनचा भरणा असलेल्या 'रौंदळ'चा टीझर प्रदर्शित
  3. Raundal (2023)
  4. 'बबन' फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे दिसणार 'रौंदळ' चित्रपटात, पोस्टर झाले रिलीज
  5. रौंदळ चित्रपट : पहिल्या वीकेंडला ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला


Download: रौंदळ
Size: 65.32 MB

Raundal

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' चित्रपटात पैलवान साकारणारा भाऊसाहेब शिंदे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं असून, त्यासोबतच चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. या चित्रपटात भाऊनं अभिनयासोबतच निर्मितीचीही जबाबदारी सांभाळली आहे. संजय घावरे, मुंबई : विचार करायला लावणारं ‘शीर्षक’ ही नेहमीच मराठी सिनेमांची खासियत ठरली आहे. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यापासून सुरू असलेली अनोख्या शीर्षकांची परंपरा आज आधुनिक युगातही जपली जात असल्याचा अभिमान प्रत्येक मराठी रसिकाला आहे. असंच काहीसं अनोखेपण जपणारा ‘रौंदळ’ हा चित्रपट मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘ख्वाडा’ चित्रपटात पैलवान साकारणारा भाऊसाहेब शिंदे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचं पहिलं पोस्टर नुकतंच रिलीज करण्यात आलं असून, त्यासोबतच चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. या चित्रपटात भाऊनं अभिनयासोबतच निर्मितीचीही जबाबदारी सांभाळली आहे. ‘रौंदळ’चं औचित्य साधत भाऊसाहेबनं ‘नवराष्ट्र’शी संवाद साधत आपल्या दुहेरी भूमिकेबाबत सांगितलं. ‘ख्वाडा’ या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि भाऊसाहेब शिंदे हे नाव एका रात्रीत लाइमलाईटमध्ये आलं. या चित्रपटासाठी भाऊराव कऱ्हाडेनं जितके कष्ट उपसले तितकीच मेहनत भाऊसाहेब शिंदे आणि त्यांच्या टीममधील प्रत्येकानं घेतली आहे. अर्थकारणापासून चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यापर्यंत सर्वच पातळीवर अपार कष्ट घेण्यात आले. या सर्व ठिकाणी भाऊसाहेब अग्रस्थानी होता. ‘रौंदळ’ चित्रपटाबाबत भाऊ म्हणाला की, ‘रौंदळ’ हा म्युझिकल-ॲक्शन चित्रपट आहे. ‘रौंदळ’ या शब्दाचा अर्थ तुडवून नाश करणं असा आहे. हा शब्द आण...

Raundal Teaser: अॅक्शनचा भरणा असलेल्या 'रौंदळ'चा टीझर प्रदर्शित

आशयघन चित्रपटांसाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या मराठी सिनेसृष्टीमध्ये अॅक्शन चित्रपटांची तशी वानवाच आहे. आता मात्र ही उणीव भरून काढण्यासाठी एक धडाकेबाज अॅक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची घोषणा झाल्यापासून कुतूहल जागवणारा 'रौंदळ' हा अॅक्शनपट मराठीसह हिंदी प्रेक्षकांचंही मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच लाँच करण्यात आला आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'ख्वाडा' या चित्रपटानंतर 'बबन'मध्ये मुख्य भूमिकेत दिसलेल्या भाऊसाहेब शिंदेंचा रुद्रावतार 'रौंदळ' या चित्रपटात पहायला मिळणार आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदीमध्ये संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार आहे. बाळासाहेब शिंदे, डॉ. पुरुषोत्तम भापकर, प्रमोद चौधरी आणि भाऊ शिंदे यांनी 'रौंदळ' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. 'रौंदळ' चित्रपटाच्या रावडी पोस्टरनं प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण करण्याचं काम केल्यानंतर आता याचा लक्षवेधी टीझर रिलीज करण्यात आला आहे. गजानन पडोळ यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कोणताही संवाद नसलेला 'रौंदळ'चा टीझर लक्ष वेधून घेणारा आहे. 'रौंदळ'मध्ये धडाकेबाज अॅक्शन पहायला मिळणार असल्याचे संकेत रिलीज करण्यात आलेला टीझर देतो. पोस्टरवर दिसलेल्या भाऊसाहेबचं रौद्र रूप टीझरमध्येही दिसतं. गुंडांचा धुव्वा उडवणारा भाऊ यात दिसणार असून, तो टाळ्या-शिट्ट्यांचा वर्षावसाठी पात्र ठरणार आहे. भाऊसाहेबच्या या चित्रपटानं फर्स्ट लुक रिलीज झाल्यापासूनच उत्सुकता वाढवली आहे. यात आता टीझरचीही भर पडली आहे. 'रौंदळ'चा थरारक टीझर प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचवणारा आहे. या चित्रपटात काहीतरी थरारक पहायला मिळणार याची चाहूल टीझर पाहिल्यावर लागते. या चित्रपटात भाऊसाहेबची जोडी कोणत्या अभिनेत्रीसोबत जमली ...

Raundal (2023)

The story of a farmer from Maharashtra who knows to how to grow agricultural produce but finds it difficult to sell it. The story of a farmer from Maharashtra who knows to how to grow agricultural produce but finds it difficult to sell it. The story of a farmer from Maharashtra who knows to how to grow agricultural produce but finds it difficult to sell it.

'बबन' फेम अभिनेता भाऊसाहेब शिंदे दिसणार 'रौंदळ' चित्रपटात, पोस्टर झाले रिलीज

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारा अभिनेता भाऊसाहेब शिंदे पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रकाशझोतामध्ये आला आहे. पदार्पणातच ‘ख्वाडा’सारख्या बहुचर्चित चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्यानंतर ‘बबन’ चित्रपटातील भूमिकेमुळे चर्चेत आलेल्या भाऊसाहेब शिंदेने ‘रौंदळ’ या आपल्या आगामी मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणा-या गुढी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर पोस्टर रिलीज करून सोशल मीडियाद्वारे ‘रौंदळ’ या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘रौंदळ’चं मुख्य वैशिष्टय म्हणजे भाऊ शिंदे फिल्म्स या बॅनरखाली बाळासाहेब शिंदे यांच्या साथीने स्वतः भाऊसाहेब या चित्रपटाची निर्मिती करीत आहे. अर्थातच या चित्रपटात भाऊसाहेबच मुख्य भूमिकेत आहे. रिलीज केलेल्या ‘रौंदळ’च्या पोस्टरवर एक रांगडा गडी पहायला मिळतो. पांढ-या रंगाचा चेक्स शर्ट, डाव्या हातात कडं, खांद्यावर गाडीचा टायर काढण्यासाठी वापरली जाणारी रक्तानं माखलेली टॉमी, वाढलेली दाढी आणि चेह-यावर जखम झालेल्या अवस्थेतील भाऊसाहेब पोस्टरवर आहे. यावरून या चित्रपटात धडाकेबाज अॅक्शनही पहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहे. यावरून भाऊसाहेब पुन्हा एकदा काहीशा हटके भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाला असल्याची जाणीव होते. पोस्टर रिलीज केल्यानंतर काहीशा रावडी लूकमधील भाऊसाहेब ‘रौंदळ’मध्ये नेमकं कशाप्रकारचं कॅरेक्टर साकारणार आहे याबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटातील इतर कलाकारांची माहिती सध्या तरी गुलदस्त्यातच ठेवण्यात आली आहे. गजानन पडोळ हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. लवकरच ‘रौंदळ’च्या चित्रीकरणाला प्रारंभ करण्यात येणार आहे. Web Title: 'Baban' fame actor Bhausaheb Shinde...

रौंदळ चित्रपट : पहिल्या वीकेंडला ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला

पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील बऱ्याच दिवसांपासून चर्चेत असलेला ‘रौंदळ’ हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट अखेर रसिकांच्या भेटीला आला आहे. लक्षवेधी टिझर आणि ट्रेलरसोबतच या चित्रपटातील सुमधूर गीतरचनांनी ‘रौंदळ’ येण्यापूर्वीच सर्वांच्या मनात कुतूहल जागवलं होतं. त्यामुळे तिकिटबारीवर गर्दी केलेल्या प्रेक्षकांनी फर्स्ट डे फर्स्ट शोपासूनच ‘रौंदळ’ पाहण्यासाठी गर्दी केली. शुक्रवारी चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच झालेलं अॅडव्हान्स बुकिंग आणि नंतर झालेल्या करंट बुकींगच्या बळावर या चित्रपटानं पहिल्या वीकेंडला चांगला गल्ला जमवत मागील काही दिवसांपासून मराठी चित्रपटांची सुरू असलेली यशस्वी घोडदौड अबाधित राखण्याच्या कामी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील प्रेक्षक ‘रौंदळ’वर अक्षरशः फिदा झाले आहेत. रवींद्र औटी, संतोष औटी, कैलाश गुंजाळ आणि संजय कुंजीर या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. ‘रौंदळ’चं दिग्दर्शन गजानन नाना पडोळ यांनी केलं आहे. भाऊसाहेब शिंदे आणि नेहा सोनावणे या नव्या कोऱ्या जोडीनं प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आहे. संजय लाकडे, यशराज डिंबाळे, सुरेखा डिंबाळे, शिवराज वाळवेकर, गणेश देशमुख, सागर लोखंडे या कलाकारांनी ‘रौंदळ’मध्ये अभिनय केला आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवारी या चित्रपटाने ५ कोटींहून अधिक गल्ला जमवला आहे. एकूण ३२० चित्रपटगृहांमध्ये रिलीज झालेला ‘रौंदळ’ ८९० शोजसह सुरू आहे. हर्षित अभिराज यांचे संगीत आहे. ‘मन बहरलं…’, ‘ढगानं आभाळ…’ या गाण्यासोबतच ‘भलरी…’ हे शेतीवरील गाणं रुंजी घालतं.