संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे

  1. Ashadhi wari 2023 : संत तुकाराम महाराजांची पालखी आज ठेवणार प्रस्थान
  2. जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थानासाठी सज्ज; वारकऱ्यांच्या वेशात पोलीस ठेवणार चोरट्यांवर नजर!
  3. Ashadi Wari 2023 Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Processions Start From Today Know About Time Table In Details


Download: संत तुकाराम महाराजांची समाधी कोठे आहे
Size: 21.12 MB

Ashadhi wari 2023 : संत तुकाराम महाराजांची पालखी आज ठेवणार प्रस्थान

तुकोबाराय आज पंढरीच्या ओढीनं आज मार्गक्रमण करणार आहेत. दुपारी दोनच्या सुमारास हा सोहळा पार पडेल. शुक्रवारपासूनच देहू नगरी वारकऱ्यांच्या आगमनाने दुमदुमून गेली आहे. आज मानाच्या दिंड्या सकाळपासूनच तुकोबारायांच्या चरणी आपली सेवा अर्पण करतील. आज टाळ आणि मृदुंगाच्या नादघोषात आणि मुखी तुकोबाराय, ज्ञानोबाराय आणि पंढरीच्या पांडुरंगाचा नामघोष देहू नगरीला दुमदुमून टाकणार आहे. वारीची शिस्त सालाबादाप्रमाणेच अबाधित राहील. शिस्तीत वारकरी येतील, तुकोबारायांच्या चरणी आपली सेवा अर्पण करतील आणि हरिनामाच्या गजरात ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय' या नामघोषात आज संत तुकाराम महाराजांची पालखी देहूच्या मंदिराबाहेर येईल. त्यानंतर ही पालखी देहूत फिरवली जाईल आणि इथल्याच इनामदार वाड्यात परंपरेनुसार ही पालखी आपला आजचा मुक्काम ठेवेल. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुणे मार्गे दिवेघाट पार करत जेजुरीहून पुढे पंढरपूर इथं रवाना होते तर संत तुकाराम महाराजांची पालखी रोटीघाटाचा अवघड टप्पा पार करत पंढरपूरच्या दिशेने रवाना होते.१९ ते २० दिवसांचा पायी वारी सोहळा आता रंगायला सुरूवात होणार आहे. या सोहळ्यादरम्यान उभं रिंगण,गोल रिंगण, धावा असे अनेक पारंपारीक वारकरी सोहळे पाहायला मिळणार आहेत. या सोहळ्यात शिस्त आणि योग्य नियोजन पाहायला मिळतं.२९ जून रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूर लाखो वारकऱ्यांनी दुमदुमणार आहे.

जगदगुरु संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थानासाठी सज्ज; वारकऱ्यांच्या वेशात पोलीस ठेवणार चोरट्यांवर नजर!

आषाढी वारीच्या (Ashadhi wari) प्रस्थानासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी (sant Tukaram Maharaj Palkhi) सज्ज झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी मुख्य मंदिर, पालखी आणि रथ फुलांनी सजविण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर पंढरपूर वारी होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. संत नामदेवांची […] आषाढी वारीच्या (Ashadhi wari) प्रस्थानासाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ( sant Tukaram Maharaj Palkhi) सज्ज झाली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज दुपारी 2 वाजता प्रस्थान सोहळा पार पडेल. या सोहळ्यासाठी मुख्य मंदिर, पालखी आणि रथ फुलांनी सजविण्यात आले आहे. तब्बल दोन वर्षांनंतर पंढरपूर वारी होणार असल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतोय. संत नामदेवांची पालखी काल रविवारी पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेली आहे. या पालख्यांना कडेकोट बंदोबस्त पुरविण्यात येणार आहे. पुण्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरक्षेसाठी पालखी मार्गावर सुमारे 1800 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये एसआरपीएफ च्या दोन तुकड्या आणि होमगार्ड देखील तैनात राहतील. वारीच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांची कामे, प्रसाधनगृह, वारकऱ्यांसाठी सोयी-सुविधा याचा देखील आढावा घेण्यात आलेला आहे. चोरीच्या घटना रोखण्यासाठी वारीमध्ये साध्य वेशात पोलीस असणार आहेत. संत तुकोबांच्या वारीचे यंदाचे 337 वे वर्ष आहे. या निमित्त्याने देवस्थानतर्फे जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. प्रस्थानांतर पहिला मुक्काम हा मंदिरामागे असणाऱ्या इनामदार वाड्यात असेल. तिथून पालखी आकुर्डी, पुणे, लोणी, बारामती मार्गे 2 जुलैला इंद...

Ashadi Wari 2023 Shri Sant Tukaram Maharaj Palkhi Processions Start From Today Know About Time Table In Details

Ashadhi Wari: पालखीसाठी देहूनगरी सज्ज! आज होणार संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान, कसा आहे दिनक्रम अन् कुठे आहे मुक्काम? Ashadhi wari: विठू नामाचा जयघोष करत आज संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. या वारीसाठी हजारोंच्या संख्येने वारकरी, भक्तांची गर्दी देहूत उसळली आहे. Ashadhi wari 2023 : पालखी प्रस्थान सोहळ्यात होणारे धार्मिक कार्यक्रम पुढीलप्रमाणे पहाटे 5 वाजता – श्री’ची संत तुकाराम शिळा मंदीर, श्री विठ्ठल-रखुमाई महापूजा पहाटे 5:30 वाजता – तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा सकाळी 9 ते 11वाजता – श्री संत तुकाराम महाराज पादुका पूजन, इनामदार वाडा. सकाळी 10 ते 12वाजता – पालखी प्रस्थान सोहळा काला कीर्तन दुपारी 2 वाजता – पालखी प्रस्थान सोहळा , अश्व व दिंड्यांचे देउळवाड्यात आगमन सायंकाळी 5 वाजता – पालखी प्रदक्षिणा सायंकाळी 6:30 वाजता – पालखी सोहळा मुक्काम, इनामदार वाडा, मुख्य आरती. रात्री 9 वाजता कीर्तन, जागर कुठे असेल पालखीचा मुक्काम? जेष्ठ वद्य सप्तमी शनिवार दि. 10 जूनला पालखी प्रस्थान दुपारी 2 वाजता होणार असून पालखीचा पहिला मुक्काम येथील इनामदार वाड्यात होणार आहे. रविवार 11 जूनला पालखी सकाळी 10.30 वाजता येथील इनामदार वाड्यातून निघून औद्योगिक नगरीकडे आकुर्डी येथील दुसऱ्या मुक्कामासाठी रवाना होईल. सोमवार 12 जूनला नानारपेठ श्री निवडुंगा विठ्ठल मंदिरात मुक्काम करेल. मंगळवार 13 जूनला पालखी येथे दिवसभर भाविकांना दर्शनासाठी मुक्कामी असेल. बुधवार 14 जून लोणीकाळभोर, गुरूवार 15 जूनला यवत, शुक्रवार 16 जून वरवंड, शनिवार 17 जून उंडवडी गवळ्याची, रविवार 18 जून बारामती, सोमवार 19 जून सणसर, मंगळवार 20 जून आंथुर्णे येथे पहिले गोल रिंगण आणि मुक्काम, बुधवार 21...