Sant dnyaneshwar palkhi sohala 2022

  1. माऊलींच्या पादुकांना पवित्र निरा स्रान; पुण्याचा निरोप घेत साताऱ्याला प्रयाण
  2. भेटी लागे जीवा! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज होणार प्रस्थान; तयारी पूर्ण
  3. Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan 2022 Today Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Depart


Download: Sant dnyaneshwar palkhi sohala 2022
Size: 38.49 MB

माऊलींच्या पादुकांना पवित्र निरा स्रान; पुण्याचा निरोप घेत साताऱ्याला प्रयाण

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Sohala 2022 नीराभिवरा पडता दृष्टी !स्नानकरिता शुद्ध सृष्टी! अंती तो वैकुंठप्राप्ती ! ऐसे परमेष्ठी बोलिला !! वाल्हे येथील मुक्काम आटोपून संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा नीरा येथे आला. यावेळी माऊली नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजरात दुपारी पवित्र नीरा नदीत माऊलींच्या पादुकांचा स्नानाचा सोहळा पार पडला. हा सोहळा अनुभवण्यासाठी हजारो वारकरी नीरा नदीच्या किनारी उपस्थित होते. स्रान सोहळ्यानंतर आपल्या वैभवी लवाजम्यासह माऊलींचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्याचा निरोप घेऊन हैबतबाबांच्या जन्मभुमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद येथे मुक्कामासाठी विसावला. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याने सकाळी साडेसहा वाजता वल्हे येथील मुक्काम आटोपून लोणंद मुक्कामी मार्गस्थ झाला. सकाळी नऊ वाजता न्याहरीसाठी पिंपरे (खुर्द) येथील अहिल्याबाई होळकर विहिरीच्या समोर विसावा घेतला. पिंपरे ग्रामस्थांनी सोहळ्याचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. ग्रामीण भागातील लोक झुणका-भाकर, वेगवेगळ्या चटण्या, ताज्या रानभाज्या अशी शिदोरी घेऊन आले होते. अर्धा तासाच्या विश्रांतीनंतर पालखी सोहळा दुपारच्या भोजनासाठी व विश्रांतीसाठी नीरेकडे मार्गस्थ झाला. नीरानगरीत माऊलींचा पालखी सोहळा अकरा वाजता दाखल झाला. ग्रामपंचायत कार्यालया समोरील छत्रपती शिवाजी चौकात पालखी सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांनी केले. सव्वा अकरा वाजता पालखी सोहळा नीरा नदिच्या काठी विसावला. नीरानदीवरील जुन्या ब्रिटिशकलीन पुलावरून सर्वात पढे तुतारी वादक सलामी देत होते. मानाचे दोन अश्व, भगव्या पताका व विणा घेतलेले वारकरी आणि माऊलींचा फुलांनी सजवलेला रथनीरा स्नानासाठी वैभवी लवाजम्यासह चालत होता. पैल तीरावर पालखीतील पादुका सोहळ्याचे मालक र...

भेटी लागे जीवा! संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आज होणार प्रस्थान; तयारी पूर्ण

sant dnyaneshwar maharaj palkhi sohala 2022 संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. पहाटे चार पासून मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. सायंकाळी ४ वाजता हा सोहळा तीर्थक्षेत्र आळंदीतून माऊलींची पालखी पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी पाच लाखाहून अधिक भाविक येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट व प्रशासन भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. आषाढी वारीच्या निमित्ताने संपूर्ण आळंदीनगरी भक्तिमय झाली आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक हे अलंकापुरीत दाखल झाले आहेत. माऊलींच्या आषाढी पायीवारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. आळंदीत दाखल झालेल्या वारक-यांकडून अखंड हरिनामासह सुरू आहे. ‘ज्ञानोबा तुकारामांचा’अखंड जयघोष सुरू आहे. येथील इंद्रायणी घाट, हैबतबाबा पायरी, पुंडलिक मंदिर, नृसिंह सरस्वती महाराज मंदिर, संत जलाराम मंदिर, ज्ञानेश्वर भिंत, साईबाबा मंदिर, गजानन महाराज मंदिर, पद्मावती मंदिर, गोपाळपुरा, विश्रांतवड आदी ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Prasthan 2022 Today Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Depart

Dnyaneshwar maharaj Palkhi Prasthan 2022 : संत संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त राज्यातील विविध ठिकाणांहून वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. आळंदीत किमान 4 लाखांहून अधिक भाविक दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान व प्रशासनाच्या वतीने पायी वारी प्रस्थान सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. कोविड काळानंतर दोन वर्षांनी आषाढी पायी वारी प्रस्थान सोहळा विना अटींमध्ये साजरा केला जाणार आहे. त्यामुळं वारकऱ्यांमध्ये वारीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पालखी प्रस्थान यापूर्वी पहाटे चार वाजता घंटानाद काकड आरती व अभिषेक झाला. त्यानंतर सकाळी नऊ ते अकरा या वेळेत विना मंडपामध्ये किर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात दुपारी बारा वाजता समाधीचा पाणी घालण्यात येईल. गुरु हैबतबाबा आणि संस्थानातर्फे माऊलींची आरती करण्यात येईल. त्यानंतर प्रमुख मानकऱ्यांना नारळ प्रसाद वाटप करुन या मंडपात माऊलींच्या पादुका आणल्या जातील. यावेळी संस्थानातर्फे मानकऱ्यांना मनाची पाळा गतीचा देखील वाटप करण्यात येणार आहे. त्यानंतर चार वाजता माऊलींच्या पालखीचं प्रस्थान होईल आणि हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल झाले आहेत. संत तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वरमाऊलींच्या पालखीचे प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने होत असल्याने पालखी सोहळा आणि वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी तगडा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मार्फत ठिकठिकाणी मुख्य मंदिरासह गोपाळपूर नंदी घाट पहिला मुक्काम आणि महत्त्वाचे चौक या ठिकाणी पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यासाठी तीन पोलीस उपायुक्त आठ सहाय्यक आयुक्त 48 पोलीस निरीक्षक 128 सहाय्यक निरीक्षक ...