श्रीकांत शिंदे खासदार

  1. खासदार श्रीकांत शिंदे उद्या घाटकोपर दौऱ्यावर
  2. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची घेतली भेट
  3. शिवसेनेचा ज्या ठिकाणी खासदार, त्या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढविणार
  4. Shrikant Shinde: श्रीकांत शिंदेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर प्रतिक्रियांना सुरुवात; कवाडे
  5. ठाणे: आम्हाला आव्हाने देऊ नका; खासदार श्रीकांत शिंदे यांचा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना इशारा
  6. खासदार श्रीकांत शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत
  7. जाहिरातीवरून रणकंदन सुरू असताना खासदार श्रीकांत शिंदे दिल्ली दौऱ्यावर; भाजप श्रेष्ठींना भेटण्याची शक्यता
  8. श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले का? दिलं स्पष्टीकरण
  9. लोकसभेसाठी अनेक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना देखील हक्काचा मतदारसंघ सोडावा लागणार?
  10. जाहिरातीवरून रणकंदन सुरू असताना खासदार श्रीकांत शिंदे दिल्ली दौऱ्यावर; भाजप श्रेष्ठींना भेटण्याची शक्यता


Download: श्रीकांत शिंदे खासदार
Size: 2.67 MB

खासदार श्रीकांत शिंदे उद्या घाटकोपर दौऱ्यावर

खासदार श्रीकांत शिंदे आज घाटकोपर दौऱ्यावर घाटकोपर, ता. ३१ (बातमीदार) ः आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गट पक्षवाढीसाठी जोमाने कामाला लागला असून जूनमध्ये खासदार श्रीकांत शिंदे विभागवार दौरा सुरू करणार आहेत. त्याअंतर्गत १ जून रोजी संध्याकाळी सहा वाजता ते रमाबाई नगरमधील पक्षाच्या शाखेला भेट देणार आहेत. सात वाजता कामराज नगर आणि साडेआठ वाजता शिवाजी नगरमधील विभागातील कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत, अशी माहिती शिंदे गटाचे ईशान्य मुंबई विभागप्रमुख परमेश्वर कदम यांनी दिली. घाटकोपर ते शिवाजी नगरमधील विभागात शिंदे गट अधिक मजबूत करण्यासाठी श्रीकांत शिंदे स्थानिकांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यासाठी प्रयत्न करतील. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांचा दौरा असल्याचे कदम म्हणाले. शिंदे गटाचे ईशान्य मुंबई विभागप्रमुख परमेश्वर कदम यांनी रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर भागाचे नगरसेवक म्हणून तीन वेळा प्रतिनिधित्व केले आहे.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांची घेतली भेट

• या अंतर्गत कल्याण रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तसेच ट्रॅक सेग्रीगेशन करण्यात येणार आहे. • सद्यस्थितीत कल्याण पूर्व स्थानक परिसरात थेट कोणतीही वाहने जाऊ शकत नाहीत. नागरिकांना काही मीटर अंतर चालत येऊन स्थानक गाठावे लागते. यामुळे वाहनांना स्थानकात येण्यासाठी कोणते मार्ग उपलब्ध करून देण्यात येतील याबाबत चर्चा झाली. येत्या काही दिवसात त्याचा पूर्ण आराखडा तयार केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या पूर्णत्वानंतर नागरिकांना रेल्वे स्थानक परिसरात थेट वाहने घेऊन जाता येणार आहे. • दिवा स्थानकातून कोकणात जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना आपण थांबा दिला आहे. येत्या कालावधीत अधिक गाड्यांना थांबा देण्याचे नियोजन केले जात आहे. मात्र रेल्वे स्थानकातील फलाटांची लांबी कमी असल्याने एक्स्प्रेस गाड्यांना थांबण्यास मोठी अडचण होते. यासाठी दिवा स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबणाऱ्या फलाटाचे लांबी-रुंदीकरण करण्यात यावे. यासाठी लागणारी जमीन संपादित करून मोठया काम करावे लागणार आहे. यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नियोजन सुरू करण्यात आले आहे. • ऐरोली - कळवा उन्नत मार्गिका प्रकल्प रखडला असून त्याचे काम युद्धपातळीवर करण्याचे आदेश यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले. तर यामध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना योग्य तो मोबदला देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी दिल्या. • सकाळी ८ ते ८.३० च्या दरम्यान • ठाणे पुढील सर्व रेल्वे स्थानकातील शौचालयांची दुरवस्था थांबविण्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीप या तत्त्वावर ते चालविण्यासाठी देण्यात आले तर त्याची चांगल्या पद्धतीने देखभाल ठेवण्यात येईल. यामुळे नागरिकांना प्रामुख्याने महिलांना स्वच्छ शौचालये उपलब्ध होतील. • अमृत भारत स्टेशनमध्ये द...

शिवसेनेचा ज्या ठिकाणी खासदार, त्या ठिकाणी शिवसेनाच निवडणूक लढविणार

"कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार उभा करणार असे कोण म्हणाले त्याचे नाव घ्या. भाजप नेत्यांचे जे लोकसभा निहाय दौरे होत आहेत. ते केंद्राकडून देण्यात आले आहेत, त्यापासून आम्हाला काही त्रास नाही. प्रत्येक पक्षाला आपली पक्ष संघटना बांधण्याचा अधिकार आहे. भाजप त्यांची पक्ष संघटना बांधत आहे. जिथे जिथे शिवसेनेचे खासदार आहेत त्या ठिकाणी शिवसेनेचेच खासदार निवडणूक लढणार. हे केंद्राच्या आणि राज्याच्या नेतृत्वाकडून स्पष्ट करण्यात आले. कल्याण लोकसभा मतदारसंघात दौरा करणारे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर हे माझे मित्र आहेत ते जेव्हा जेव्हा दौऱ्यावर आले तेव्हा मी त्यांचे स्वागत केले. त्यामुळे कोणीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये," असे शिंदे यांनी स्पष्ट केले. डोंबिवलीतील पाटीदार भवन येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला होता. या प्रसंगी खासदार शिंदे हे उपस्थित होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे देताना उपरोक्त स्पष्टीकरण त्यांनी केले आहे. बॅनर लावल्याने कोणी खासदार होत नाही कल्याण लोकसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे संपर्क प्रमख माजी आमदार सुभाष भोईर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार असे बॅनर लावले. ठाकरे गटाकडून सुभाष भोईर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता त्यातून अधोरेखीत झाली आहे. शिवाय राष्ट्रवादीने कल्याणची जागा ठाकरे गटाला सोडली आहे. यावर खासदार शिंदे यांनी सांगितले की, बॅनर लावून कोणी खासदार होत नाही. प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. विरोधकांशिवाय निवडणूक होऊ शकत नाही. २०१४ साली खासदारकीची निवडणूकीत मी अडीच लाखाच्या फरकाने तर २०१९ सालच्या निवडणूकीत साडे तीन लाख मतांच्या फरकाने निवडून आलो. मतदार संघाच्या विकासाकरीता हजारो कोटी रुपयांच...

Shrikant Shinde: श्रीकांत शिंदेंच्या राजीनाम्याच्या चर्चेवर प्रतिक्रियांना सुरुवात; कवाडे

मुंबई : कल्याण लोकसभा मतदारसंघातील वादावर आणि त्यातून खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या राजीनाम्याच्या विधानावर आता राजकीय प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कवाडे आणि आठवले गटाकडून यावर पहिल्यांदा प्रतिक्रिया आली आहे. या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणावर काही अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. (reactions comming out about Shrikant Shinde resignation statement Jogendra Kawade Ramdas Athawale expressed) पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे म्हणाले, श्रीकांत शिंदे आणि भाजपचा जो वाद होता तो पाण्यावर काठी मारल्या सारखा आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाची आघाडी झालेली आहे. आम्ही आघाडीचे घटक पक्ष असल्यामुळं कोणत्याही प्रकारचा वाद आम्हाला परवडण्यासारखा नाही. आव्हानं फार मोठी आहेत चॅलेंज फार मोठी आहेत यातून जर तारुन जायचं असेल तर अशा प्रकारचे क्षुल्लक वाद होता कामा नयेत. या वादावर पडदा पडला पाहिजे आणि तो पडेल अशी आम्हाला आशा आहे. हा स्थानिक वाद क्षणापुरताच आहे त्याचं रूपांतर मोठ्या वादात होऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे. नेमकं प्रकरण काय? एका पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीचं राजकारण करून भाजपनं घेतलेल्या असहकार ठरावामुळं खुद्द मुख्यमंत्री यांचं सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना राजीनामा द्यायची वेळ आली आहे. शिवसेना भाजपा युतीत मिठाचा खडा अस म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपच्या मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. आम्ही केलेल्या विकास कामामुळं जर कोणाला पोटदुखी होत असेल. याने युतीत विघ्न निर्माण होत असेल तर मी माझ्या पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असं खासदार शिंदे यांनी म्हटले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघातील भाजप शिवसेना शिंदे ...

ठाणे: आम्हाला आव्हाने देऊ नका; खासदार श्रीकांत शिंदे यांचा भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना इशारा

ठाणे : युतीचे काम चांगल्याप्रकारे सुरू असताना केवळ क्षुल्लक कारणावरून एखाद्या वरिष्ठ पोलिस निरिक्षकावर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेनेला मदत करायची नाही आणि कल्याण लोकसभेचा उमेदवार आम्हीच ठरवू अशा स्वरुपाचा ठराव केला जातो. अशी आव्हाने देण्यापुर्वी विचार करायला हवा आणि अशी आव्हाने आम्हाला देऊ नका, असा इशारा मुख्यमंत्री पुत्र व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी कल्याणमधील भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिला आहे. दहा महिन्यांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाऊले उचलली नसती तर काय परिणाम झाले असते, याचाही विचार भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी करायला हवा, असेही त्यांनी म्हटले आहे. कल्याण लोकसभा मतदार संघात भाजप कायकर्ते सांगतील, तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही, अशी भुमिका भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. त्यावर आता खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. केंद्रात पुन्हा भाजप- शिवसेना युती आणि मित्र पक्षाचे सरकार स्थापन करणे हेच आमचे ध्येय आहे. त्या दिशेने आम्ही करत असलेल्या कामांना जर कुणाचा विरोध असेल, कुणाला पोटदूखी होत असेल आणि युतीमध्ये जर विघ्न निर्माण होत असेल तर माझी पदाचा राजीनामा देण्याची तयारी आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान करण्याचा आमचा आणि देशातील तमाम जनतेचा निर्धार आहे. त्यासाठी आम्ही प्राणपणाने प्रयत्न करू. परंतु, काही क्षुल्लक कारणांसाठी शिवसेना – भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे स्वार्थी राजकारण डोंबिवलीतल्या काही नेत्यांक...

खासदार श्रीकांत शिंदे राजीनामा देण्याच्या तयारीत

Home Page • प्रीमियम • ताज्या • मुख्य • पुणे • मुंबई • महाराष्ट्र • • • • • • • • • • • • • • • • • • • देश • ग्लोबल • मनोरंजन • सप्तरंग • YIN युवा • फोटो स्टोरी • व्हिडिओ स्टोरी • सकाळ मनी • क्रीडा • आणखी.. • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • • Advertise With Us • About Us डोंबिवली, ता. ९ : कल्याण लोकसभा मतदार संघातील भाजप-शिवसेना वाद विकोपाला गेला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याच्या बदलीचे राजकारण करून भाजपने घेतलेल्या असहकार भूमिकेमुळे खुद्द मुख्यमंत्री यांचे सुपूत्र तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.‘आम्ही केलेल्या विकासकामांमुळे कोणाला पोटदुखी होत असेल, त्याने युतीत विघ्न निर्माण होत असेल तर मी पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, असे खासदार शिंद म्हणाले आहेत. कल्याण पूर्वेत नुकताच पार पडलेल्या बैठकीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला सहकार्य न करण्याचा तसेच शिवसेनेच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला. मंत्री चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांसमोर कठोर भूमिका घेत ‘आता भिडायचे’ असे सांगितले. यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद चिघळला आहे. भाजपच्या या असहकार भूमिकेमुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. शिवसेना-भाजप युतीत मिठाचा खडा, असे म्हणत त्यांनी नाव न घेता भाजपच्या मंत्र्यांवर निशाणा साधला आहे. काही क्षुल्लक कारणांसाठी शिवसेना-भाजप युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम डोंबिवलीतील काही नेत्यांकडून सुरू आहे. मला व्यक्तीशः कोणत्याही पदाची लालसा नाही. येत्या लोकसभेच्या निवडणूकीत कुणाला उमेदवा...

जाहिरातीवरून रणकंदन सुरू असताना खासदार श्रीकांत शिंदे दिल्ली दौऱ्यावर; भाजप श्रेष्ठींना भेटण्याची शक्यता

शिवसेनेचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झालेत. शिंदे यांच्या या अचूक टायमिंगवरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एकीकडे जाहिरातीवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे शिंदे यांच्या या दिल्लीवारीमुळे मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेने मंगळवारी राज्यातील सर्व वृत्तपत्रात जाहिरात दिली. या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचे एका सर्व्हेच्या हवाल्याने दाखवण्यात आले आहे. नाराजीत शिंदेची दिल्लीवारी राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे, असे या जाहिरातीत म्हटले आहे. या जाहिरातीमुळे भाजप नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, फडणवीसांनी तो दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे या राज्यात जोरदार चर्चा झाली. ही चर्चा सुरु असतानाच श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरेकरांचा खोचक टोला दरम्यान, भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले, एखाद्या सर्व्हेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली असले तर आम्हाला आनंदच आहे. ते आमच्या युतीचे मुख्यमंत्री आहेत. जाहिरात करण्यात देण्यातही आमची अडचण नाही. मात्र, यामध्ये एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती दाखवली आहे आणि देवेंद्र फडणवीसांना कमी दाखवण्याची गरज नव्हती. त्यात जर शिंदे यांच्या संदर्भातील आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते. अशी जाहिरात देणे युतीसाठी योग्...

श्रीकांत शिंदे, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले का? दिलं स्पष्टीकरण

ठाणे : खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या खुर्चीत बसल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते यांनी केला होता. हा दावा फेटाळून लावत श्रीकांत शिंदेंनी पत्रकार परिषद घेत याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. "हा फोटो मंत्रालयातील मुख्यमंत्री दालनातील नाही. मुख्यमंत्र्यांच्या खासगी निवासस्थानातील बाजूला असलेल्या एका कॉन्फरन्स हॉलमधील आहे, अशी माहिती खासदार शिंदेंनी यावेळी दिली. राष्ट्रवादीतर्फे दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. श्रीकांत शिंदे म्हणाले, "खुर्चीच्या मुद्द्यावरून जी टिका करण्यात आली ती हास्यास्पद आहे. आज काही जणांनी मी ज्या खुर्चीत बसलो ती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची असल्याचा दावा केला. त्यांच्या गैरहजेरीत काम पाहतो, असे उल्लेख करून समाजमाध्यमांवर पसरवण्यात आले. मुळात मी जेथे बसलो होतो ते आमचे खासगी निवासस्थान आहे आणि ती जी खुर्ची आहे ती ना मंत्रालयातील आहे, ना वर्षा या शासकीय निवासस्थानातील. या आमच्या खासगी निवासस्थानातून साहेब आणि मी दररोज शेकडो नागरिकांना भेटून त्यांच्या समस्या सोडवत असतो." "एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्यापूर्वीपासूनच शेकडो लोक दररोज येथे येत असतात. मी दोन वेळा निवडून आलेलो खासदार आहे, त्यामुळे कुठे बसायचं आणि कुठे नाही याचे भान मला आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेब दिवसातून १८ ते २० तास काम करत असतात. जनतेच्या समस्या सोडवत असतात. मुख्यमंत्री जिथे जातात तिथे नागरिकांच्या समस्या सोडवत असतात. राज्याचा कारभार चालवण्यासाठी ते सक्षम आहेत. त्यांच्या जागी काम करण्याची कोणालाच गरज नाही. ज्या खुर्चीवरून गदारोळ चालवला ती खुर्ची खासगी निवासस्थानातील होती.", अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. "ज्या लोगोवरून ...

लोकसभेसाठी अनेक जागांची अदलाबदल होण्याची शक्यता; श्रीकांत शिंदेंना देखील हक्काचा मतदारसंघ सोडावा लागणार?

ठाकरे गट देखील मुंबईतील लोकसभा निवडणुकीसाठी 6 पैकी 4 जागा लढण्यासाठी आग्रही आहे. यामध्ये उत्तर मुंबई (महाविकास आघाडी मित्र पक्ष), उत्तर पश्चिम (ठाकरे गट), उत्तर मध्य (महाविकास आघाडी मित्र पक्ष), दक्षिण मध्य मुंबई (ठाकरे गट (वंचित)), दक्षिण मुंबई (ठाकरे गट), ईशान्य मुंबई (ठाकरे गट) या जागांचा समावेश असू शकतो. ( उत्तर पश्चिममध्ये गजानन कीर्तिकर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून अमोल कीर्तिकर यांच नाव निश्चित झालं आहे. अमोल कीर्तीकरांसाठी कार्यकर्ते तयारीला सुद्धा लागले आहेत. त्यामुळे सुनील प्रभू यांचा विचार केला याची शक्यता फारच कमी आहे. ( दक्षिण मध्य मुंबईत सध्या खासदार राहुल शेवाळे शिंदे गटात आहेत. त्यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीला जागा दिली जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. अमरावती मतदारसंघ अमरावती लोकसभा निवडणुकीत अमरावतीची जागा काँग्रेस मागण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडे असलेल्या अमरावती लोकसभेवर काँग्रेस व ठाकरे गटाचा दावा आहे. काँग्रेसकडून आमदार बळवंत वानखडे तर ठाकरे गटाकडून ज.मो.अभ्यंकर व दिनेश बुब यांच्या नावाची चर्चा सध्या आहे. विद्यमान खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात माविआ आक्रमक असून विचारधारा सोडल्याने अल्पसंख्याक व दलित मतदारांची खासदार नवनीत राणा विरोधात नाराजी आहे. अमरावतीत लोकसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अमरावती मतदारसंघ काँग्रेस मागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

जाहिरातीवरून रणकंदन सुरू असताना खासदार श्रीकांत शिंदे दिल्ली दौऱ्यावर; भाजप श्रेष्ठींना भेटण्याची शक्यता

शिवसेनेचे खासदार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झालेत. शिंदे यांच्या या अचूक टायमिंगवरून राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. एकीकडे जाहिरातीवरून राज्यातील राजकारण तापलेले असताना दुसरीकडे शिंदे यांच्या या दिल्लीवारीमुळे मोठ्या घडामोडीची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेनेने मंगळवारी राज्यातील सर्व वृत्तपत्रात जाहिरात दिली. या जाहिरातीवरून भाजप नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा जास्त लोकप्रिय असल्याचे एका सर्व्हेच्या हवाल्याने दाखवण्यात आले आहे. नाराजीत शिंदेची दिल्लीवारी राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे, असे या जाहिरातीत म्हटले आहे. या जाहिरातीमुळे भाजप नेत्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. मात्र, फडणवीसांनी तो दौरा अचानक रद्द केला. त्यामुळे या राज्यात जोरदार चर्चा झाली. ही चर्चा सुरु असतानाच श्रीकांत शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडू शकतात अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरेकरांचा खोचक टोला दरम्यान, भाजपचे नेते प्रवीण दरेकर म्हणाले, एखाद्या सर्व्हेच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पसंती दर्शवली असले तर आम्हाला आनंदच आहे. ते आमच्या युतीचे मुख्यमंत्री आहेत. जाहिरात करण्यात देण्यातही आमची अडचण नाही. मात्र, यामध्ये एकनाथ शिंदे यांना जास्त पसंती दाखवली आहे आणि देवेंद्र फडणवीसांना कमी दाखवण्याची गरज नव्हती. त्यात जर शिंदे यांच्या संदर्भातील आकडेवारी दिली असती तर बरे झाले असते. अशी जाहिरात देणे युतीसाठी योग्...