सुवर्ण महोत्सव म्हणजे काय

  1. दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव
  2. भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव


Download: सुवर्ण महोत्सव म्हणजे काय
Size: 41.15 MB

दलित पँथरचा सुवर्ण महोत्सव

आंबेडकरी जनतेसाठी आजची स्थिती तेव्हा होती, त्याच्यापेक्षा भयानक आहे. मात्र, आज पँथरसारखी संघटना नाही. तरीही आशावादी असण्याला पर्याय नाही, अशा स्थितीत नामदेव ढसाळच्या ‘आत्ता’ या कवितेतील शेवटच्या दोन ओळी आठवतात, ‘सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षांनंतर लाभला, आत्ता सूर्यफुलासारखे सूर्योन्मुख झालेच पाहिजे...’ दि.९ जुलै रोजी ‘दलित पँथर’च्या स्थापनेला ५० वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने मुंबईत तसेच महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाले, भाषणं / परिसंवाद झाले. दि. १ मे, १९६० रोजी स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासात ‘दलित पँथर’चे खास स्थान आहे. पँथरबद्दल जसे अनेक वाद आहेत तसेच पँथरच्या स्थापना दिनाबद्दलही आहेत. या संदर्भात पँथरचा एक संस्थापक सदस्य नामदेव ढसाळने ‘माझ्या समाजवादी दीक्षेची गोष्ट’ या लेखाच्या सुरुवातीलाच लिहिले आहे. ‘दि. ९ जुलै, १९७२ रोजी चर्नीरोड, गिरगाव, मुंबई संयुक्त समाजवादी पक्षाच्या कार्यालयातून खाली उतरून मी व माझे कवी मित्र ज. वि. पवार, दोघांनी ‘दलित पँथर’ या संघटनेची स्थापना केली.’ तेव्हापासून ९ जुलै हा पंँथरच्या स्थापनेचा दिवस मानला जातो. त्यानुसार महाराष्ट्रात ठिकठिकाणी हा दिवस साजरा केला जातो. पँथरच्या निर्मितीच्या वेळची स्थिती काय होती हे समजून घेणे गरजेचे आहे. दि. २६ जानेवारी,१९५० रोजी स्वतंत्र भारताने प्रजासत्ताक लोकशाही मान्य करणारी राज्यघटना स्वीकारली. हा एक आगळाच प्रयोग होता. भारतीय समाजाची रचना गेली अनेक शतकं जातीव्यवस्थेवर आधारित आहे. जातीव्यवस्था केवळ एक व्यवस्था नसून त्यात उच्चनिचतेची, स्पृश्य-अपृश्यतेची भावना कार्यरत आहे. प्रजासत्ताक भारतात ही व्यवस्था कालबाह्य होईल आणि जातीच्या आधारे केले जात असलेले सर्वंकष अन्या...

भारतातील ट्रॅमचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव

भारतातील ट्रॅमचा ओझरता इतिहास तिच्या दीडशेव्या वाढदिवसानिमित्त देताना एकच गोष्ट मनात येते की, आता तरी ट्रॅमचं वाहतूक आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं असलेलं महत्त्व लहान-मोठ्या शहरांना नीटपणे कळावं आणि मोठमोठे रस्ते आणि मेट्रोवर मोठा खर्च न करता उपलब्ध चांगल्या रुंदीच्या रस्त्यांवरच एका बाजूला ट्रॅमचे रूळ ट्रॅममार्ग तयार करून तिथं ट्रॅम सुरू करण्याच्या योजना आखण्यात याव्या. यामुळे प्रवाशांनाही चांगली सुविधा मिळेल आणि तीही अगदी परवडण्याजोगी. ट्रॅम आज फारच थोड्या लोकांना आठवत असेल कारण भारतातील ज्या शहरांमध्ये ट्रॅम सुरू होती त्यातील कोलकाता वगळता बाकी सर्व शहरातील ट्रॅम केव्हाच बंद करण्यात आल्या आहेत. ट्रॅम विजेवर चालत असल्यानं प्रदूषण होतच नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ट्रॅम हे सार्वजनिक वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय आहे. आदर्श म्हणावा असा. कारण एकाच वेळी ट्रॅममधून तिच्या क्षमतेनुसार म्हणजे एका डब्यात साधारण 50 आणि दोन डबे असतील तर दुप्पट प्रवासी एकाच वेळी जाऊ शकतात. म्हणजेच साधारण कमीतकमी 20 मोटारी रस्त्यावर येत नाहीत. त्यामुळं वाहतूक सुलभ तर होतेच शिवाय मोटारींमुळे होणारं प्रदूषणही कमी होतं. आता पर्यावरण संरक्षणाच्या मोहिमेत ट्रॅमचं महत्त्व किती आहे हे यावरून कळतं. त्यामुळेच आता अनेक शहरांमध्ये ट्रॅम सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे. तसं पाहिलं तर भारतात ट्रॅम सर्वप्रथम कलकत्त्यात (आता कोलकाता) 24 फेब्रुवारी 1873 रोजी सुरू झाली, त्याला आज शुक्रवार, 24 फेब्रुवारीला दीडशे वर्षे पुरी होतील. त्यामुळंच ट्रॅमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं कोलकात्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रमही होणार आहेत. पाणी पुरवण्यासाठी आणि रस्ते धुण्यासाठी म्हणून ज्या घोडे जोडलेल्या ट्रॅमचा...