स्वामी चरित्र सारामृत

  1. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा
  2. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा
  3. श्री स्वामी चरित्र सारामृत : Shri Swami Charitra Saramrut
  4. श्री स्वामी चरित्र सारामृत


Download: स्वामी चरित्र सारामृत
Size: 74.73 MB

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय विसावा

॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी करुणाकरा । जयजयाजी यतिवरा । भक्तजन संतापहरा । सर्वेश्वरा गुरुराया ॥१॥ लीलावेषधारी दत्ता । सर्वसाक्षी अनंता । विमलरुपा गुरुनाथा । परब्रह्म सनातना ॥२॥ तुझे चरित्र अगाध । केवी वर्णू मी मतिमंद । परी घेतला असे छंद । पूर्ण केला पाहिजे ॥३॥ तुझ्या गुणांचे वर्णन । करिता भागे सहस्त्रवदन । निगमागमासहि जाण । नसे पार लागला ॥४॥ तुझे वर्णावया चरित्र । तुजसम कवी पाहिजेत । तरी अल्पमतीने अत्यल्प । गुणानुवाद का न गावे ॥५॥ वर्णिता समर्थांचे गुण । नाना दोष होती दहन । सांगता ऐकता पावन । वक्ता श्रोता दोघेहि ॥६॥ अक्कलकोटी वास केला । जना दाखविल्या अनंत लिला । उद्धरिले कैक पाप्यांना । अद़्भुत चरित्र स्वामींचे ॥७॥ असो कोणे एके दिवशी । इच्छा धरोनी मानसी । गृहस्थ एक दर्शनासी । समर्थांच्या पातला ॥८॥ करोनियां श्रींची स्तुती । माथा ठेविला चरणावरती । तेव्हा समर्थ त्याते वदती । हास्यवदने करोनी ॥९॥ फकिराते देई खाना । तेणे पुरतील सर्व कामना । पक्वान्ने करोनी नाना । यथेच्छ भोजन देईजे ॥१०॥ गृहस्थे आज्ञा म्हणोन । केली नाना पक्वान्ने । फकीर बोलाविले पाच जण । जेवू घातले तयाते ॥११॥ फकीर तृप्त होवोन जाती । उच्छिष्ट उरले पात्रावरती । तेव्हा समर्थ आज्ञापिती । गृहस्थाचे सत्वर ॥१२॥ शेष अन्न करी ग्रहण । तुझे मनोरथ होतील पूर्ण । परी त्या गृहस्थाचे मन । साशंक झाले तेधवा ॥१३॥ म्हणे यवन याती अपवित्र । त्यांचे कैसे घेऊ उच्छिष्ट । यातीमध्ये पावेन कष्ट । कळता स्वजना गोष्ट हे ॥१४॥ आला मनी ऐसा विचार । तो समर्थांस कळला सत्वर । म्हणती हा अभाविक नर । विकल्प चित्ती याचिया ॥१५॥ इतक्यामाजी साहजिक । कोणी भ्रमिष्ट गृहस्थ एक । येवोन स्वामीसन्मुख । स्वस्थ उभा राहिला ॥१६॥ दारिद्र्ये ग्रस्त झाला म्हणोन । भ्रमिष्ट...

श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा

॥ श्री गणेशाय नमः ॥ कामना धरोनी जे भजती । होय त्यांची मनोरथपूर्ति । तैसेचि निष्काम भक्ताप्रती । कैवल्यप्राप्ती होतसे ॥१॥ नृसिंहसरस्वती प्रगट झाले । अगणित पापी तारिले । कर्दळीवनी गुप्त जहाले । गुरुचरित्री ती कथा ॥२॥ पुढे लोकोद्धाराकारणे । भाग पडले प्रगट होणे । धुंडिली बहुत पट्टणे । तेचि स्वामी यतिवर्य ॥३॥ स्वामींची जन्मपत्रिका । एका भक्ते केली देखा । परी तिजविषयी शंका । मनामाजी येतसे ॥४॥ गुरुराज गुप्त झाले । स्वामीरूपे प्रगटले । त्यांचे शकप्रमाण न मिळे । म्हणोनि शंका पत्रिकेची ॥५॥ ते केवळ अनादिसिद्ध । खुंटला तेथे पत्रिकावाद । लोकोद्धारासाठी प्रसिद्ध । मानवरूपे जाहले ॥६॥ अक्कलकोटा-माझारी । राचप्पा मोदी याचे घरी । बैसली समर्थांची स्वारी । भक्तमंडळी वेष्टित ॥७॥ साहेब कोणी कलकत्त्याचा । हेतू धरोनी दर्शनाचा । पातला त्याच दिवशी साचा । आदर तयाचा केला की ॥८॥ त्याजसवे एक पारसी । आला होता दर्शनासी । ते येण्यापूर्वी मंडळीसी । महाराजांनी सुचविले ॥९॥ तीन खुर्च्या आणोनी बाहेरी । मांडा म्हणती एके हारी । दोघांसी बैसवोनी दोहोवरी । तिसरीवरी बैसले आपण ॥१०॥ पाहोनी समर्थांचे तेज । उभयतांसी वाटले चोज । साहेबाने प्रश्न केला सहज । आपण आला कोठूनी ॥११॥ स्वामींनी हास्यमुख करोनी । उत्तर दिले तयालागोनी । आम्ही कर्दळीवनांतुनी । प्रथमारंभी निघालो ॥१२॥ मग पाहिले कलकत्ता शहर । दुसरी नगरे देखिली अपूर्व । बंगालदेश समग्र । आम्ही असे पाहिला ॥१३॥ घेतले कालीचे दर्शन । पाहिले गंगातटाक पावन । नाना तीर्थे हिंडोन । हरिद्वाराप्रती गेलो ॥१४॥ पुढे पाहिले केदारेश्वर । हिंडलो तीर्थे समग्र । ऐसी हजारो हजार । नगरे आम्ही देखिली ॥१५॥ मग तेथुनी सहज गती । पातलो गोदातटाकाप्रती । जियेची महाप्रख्याती । पुराणांतरी वर्णिली ॥१६॥ केल...

श्री स्वामी चरित्र सारामृत : Shri Swami Charitra Saramrut

श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय ॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥ श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥ ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥ एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥ जयजय श्री जगरक्षका । जयजयाजी भक्तपालका । जयजय कलिमलनाशका । अनादिसिद्धा जगद्गुरु ॥१॥ जयजय क्षीरसागर विलासा । मायाचक्रचालका अविनाशा । शेषशयना अनंतवेषा । अनामातीता अनंता ॥२॥ जयजयाजी गरुडवाहना । जयजयाजी कमललोचना । जयजयाची पतितपावना । रमारमणा विश्वेशा ॥३॥ मेघवर्ण आकार शांत । मस्तकी किरीट विराजित । तोच स्वयंभू आदित्य । तेज वर्णिले न जाय ॥४॥ विशाळ भाळ आकर्ण नयन । सरळ नासिका सुहास्य वदन । दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान । शुभ्रवर्ण विराजती ॥५॥ रत्नमाला हृदयावरी । जे कोटी सूर्यांचे ते हरी । हेममय भूषणे साजिरी । कौस्तुभमणि विशेष ॥६॥ वत्सलांच्छनाचे भूषण । चेति प्रेमळ भक्तिची खूण । उदरी त्रिवळी शोभायमान । त्रिवेणीसंगमासारखी ॥७॥ नाभिकमल सुंदर अति । जेथे विधात्याची उत्पत्ती । की चराचरा जन्मदाती । मूळ चननी तेचि पै ॥८॥ जानूपर्यंत कर शोभति । मनगटी कंकणे विराजती । करकमलांची आकृति । रक्तपंकजासमान ॥९॥ भक्ता द्यावया अभय वर । सिद्ध सर्वदा सव्य कर । गदा पद्म शंख चक्र । चार हस्ती आयुधे ॥१०॥ कांसे कसिला पीतांबर । विद्युल्लतेसम तेज अपार । कर्दळीस्तंभापरी सुंदर । उभय जंघा दिसताती ॥११॥ जेथे भक्तजन सुखावती । ज्याच्या दर्शने पतीत तरती । ज्याते अहोरात्र ध्याती । नारदादि ऋषिवर्य ॥१२॥ ज्याते कमला करे चुरीत । संध्यारागा समान रक्त । तळवे योग्य चिन्हे मंडित । वर्णित वेद शीणले ॥१३॥...

श्री स्वामी चरित्र सारामृत

श्री स्वामी चरित्र सारामृत श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय ॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नमः ॥ श्री गुरुभ्यो नमः ॥ श्री कुलदेवतायै नमः ॥ श्री अक्कलकोट निवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबर-यतिवर्य स्वामिराजाय नमः ॥ ब्रम्हानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं । द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ॥ एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं । भावातीतं त्रिगुणरहितं सद़्गुरुं तं नमामि ॥ जयजय श्री जगरक्षका । जयजयाजी भक्तपालका । जयजय कलिमलनाशका । अनादिसिद्धा जगद्गुरु ॥१॥ जयजय क्षीरसागर विलासा । मायाचक्रचालका अविनाशा । शेषशयना अनंतवेषा । अनामातीता अनंता ॥२॥ जयजयाजी गरुडवाहना । जयजयाजी कमललोचना । जयजयाची पतितपावना । रमारमणा विश्वेशा ॥३॥ मेघवर्ण आकार शांत । मस्तकी किरीट विराजित । तोच स्वयंभू आदित्य । तेज वर्णिले न जाय ॥४॥ विशाळ भाळ आकर्ण नयन । सरळ नासिका सुहास्य वदन । दंतपंक्ति कुंदकळ्यांसमान । शुभ्रवर्ण विराजती ॥५॥ रत्नमाला हृदयावरी । जे कोटी सूर्यांचे ते हरी । हेममय भूषणे साजिरी । कौस्तुभमणि विशेष ॥६॥ वत्सलांच्छनाचे भूषण । चेति प्रेमळ भक्तिची खूण । उदरी त्रिवळी शोभायमान । त्रिवेणीसंगमासारखी ॥७॥ नाभिकमल सुंदर अति । जेथे विधात्याची उत्पत्ती । की चराचरा जन्मदाती । मूळ चननी तेचि पै ॥८॥ जानूपर्यंत कर शोभति । मनगटी कंकणे विराजती । करकमलांची आकृति । रक्तपंकजासमान ॥९॥ भक्ता द्यावया अभय वर । सिद्ध सर्वदा सव्य कर । गदा पद्म शंख चक्र । चार हस्ती आयुधे ॥१०॥ कांसे कसिला पीतांबर । विद्युल्लतेसम तेज अपार । कर्दळीस्तंभापरी सुंदर । उभय जंघा दिसताती ॥११॥ जेथे भक्तजन सुखावती । ज्याच्या दर्शने पतीत तरती । ज्याते अहोरात्र ध्याती । नारदादि ऋषिवर्य ॥१२॥ ज्याते कमला करे चुरीत । संध्यारागा समान रक्त । ...