ठरलं तर मग सिरीयल कास्ट

  1. Tharla Tar Mag: ‘ठरलं तर मग’च्या सेटवर जुई गडकरीने दिग्दर्शकाला दिलं खास सरप्राईज!
  2. Tharla Tar Mag Lyrics In Marathi And English
  3. ‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीला सेटवर मिळाली अनोखी भेट
  4. वलय
  5. ठरलं तर मग : सायली
  6. Holi 2023: 'ठरलं तर मग' आणि 'मुरांबा' मालिकेत पाहायला मिळणार रंगाची उधळण


Download: ठरलं तर मग सिरीयल कास्ट
Size: 49.42 MB

Tharla Tar Mag: ‘ठरलं तर मग’च्या सेटवर जुई गडकरीने दिग्दर्शकाला दिलं खास सरप्राईज!

एक मालिका तयार करण्यासाठी पडद्यामागे अनेक हात राबत असतात. प्रेक्षकांना केवळ कलाकारांचा अभिनय दिसतो. मात्र, त्यामागे अनेक लोक मेहनत घेत असतात. मालिका रुपी जहाजाची कमान अलगदपणे संभाळणारा कॅप्टन म्हणजे मालिकेचा दिग्दर्शक. याच ‘कॅप्टन ऑफ द शिप’ असणाऱ्या मालिकेच्या दिग्दर्शकाला अभिनेत्री जुई गडकरी हिने खास सरप्राईज दिलं आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेचे दिग्दर्शन सचिन गोखले करत आहेत. जुईने सचिन यांना एक जादुई डबा दिला आहे. यामागे देखील एक खास कारण आहे. कलाकारांना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात तंत्रज्ञांसोबतच महत्त्वाची व्यक्ती असते आणि ती म्हणजे दिग्दर्शक. पडद्यामागे राहून सारी सूत्र हलवणारा हा अवलिया क्वचितच प्रेक्षकांसमोर येतो. मालिकेला खऱ्या अर्थाने दिशा देणाऱ्या या दिग्दर्शकाविषयी वाटणारी आपुलकी आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अभिनेत्री जुई गडकरीने एक अनोखा मार्ग शोधला. ‘ठरलं तर मग’ मालिकेचे दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी जुईने सेटवर एक खास खाऊचा डबा आणला आहे. या खाऊच्या डब्याला ‘डिरेक्टर्स बॉक्स’ असं हटके नावही तिने दिलं आहे. सेटवर जुई दररोज नवनवे पदार्थ खाण्यासाठी घेऊन येत असते. दिग्दर्शक सचिन गोखले यांच्यासाठी आणलेल्या या खाऊच्या डब्यातील खाऊ संपणार नाही याकडे जुईचं आवर्जून लक्ष असतं. कलाकार मंडळी दिवसाचे बारा-तेरा तास शूटिंग करत असतात. मालिकेचा सेट आणि सहकलाकार हेच त्यांचं नवं कुटुंब होऊन जातं. जुईच्या या अनोख्या उपक्रमाचं दिग्दर्शक सचिन गोखले यांनीही कौतुक केलं आहे. ‘ठरलं तर मग’ ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, यातील अर्जुन आणि सायली ही नवी जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे.

Tharla Tar Mag Lyrics In Marathi And English

Tharla Tar Mag Lyrics In Marathi जवळ राहुनी दूर दूर तू तुझ्यावाचुनी उदास हे ऋतु कळेल केव्हा तुला हि व्यथा माझ्या नजरेने बघ तुलाच तू दोन किनारे आपण दोघे भेट अचानक होईल का मग श्वास असे श्वासात गुंतले नकळतच बघ झालो जिवलग कसले काहूर कुठली हुरहूर मनात आता व्याकुळ तगमग वळण घेता निरोप घ्यायचा दूर व्हायचे ठरलं तर मग… ठरलं तर मग… ठरलं तर मग… Recent Lyrics • Butterfly Lyrics In Marathi And English • Man Masoli Lyrics In Marathi And English • Datale Reshmi Lyrics In Marathi And English • Anand Harpla Lyrics In Marathi And English • Kam Dya Calm Down Parody Lyrics In Marathi And English • Pirmachi Odh Ga Lyrics In Marathi And English • Koral Naav Lyrics In Marathi And English • Halu Halu Lyrics In Marathi And English • Tuch Majhi Premika Lyrics In Marathi And English • Tuzya Sobatiche Lyrics In Marathi And English

‘ठरलं तर मग’ मालिकेतील सायली म्हणजेच अभिनेत्री जुई गडकरीला सेटवर मिळाली अनोखी भेट

कलाकार मंडळी दिवसाचे बारा-तेरा तास शूटिंग करत असतात. मालिकेचा सेट आणि सहकलाकार हेच त्यांचं नवं कुटुंब होऊन जातं. जुईच्या या अनोख्या उपक्रमाचं दिग्दर्शक सचिन गोखले यांनीही कौतुक केलं आहे. पडद्यामागची अशीच धमाल आणि मालिकेतलं नवं वळण हे आपल्याला लवकरच कळेल. Web Title: Actress Jui Gadkari got gift on set of tharla tar mag serial Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

वलय

प्रकरण २९ ते ३३ ची लिंक: प्रकरण 34 शेवटी राजेश मोहिनीला सोबत स्वतःच्या गाडीत घेऊन निघाला. ती अर्धवट धुंदीत राजेशच्या बाजूला बसली होती. मोहिनीने "यंग गर्ल" हा परफ्यूम लावला होता. त्याचा सुवास अगदी छान, मस्त आणि मादक होता. अगदी फक्त लेडीजला शोभेल असा! थोडी कमी शुद्धीत असल्याने ती त्याला जास्त चिकटून बसली होती आणि त्यामुळे तिच्या शरीराचा गंध राजेशच्या शरिराला हळूहळू लागत होता. घरी जायला आधीच उशीर झाला होता त्यात अजून आता मोहिनीला सोडून आल्यानंतर आणखी वेळ होणार होता. त्याने आतापर्यंत अनेक कथांमधून असे प्रसंग चितारले होते की रात्री कारमध्ये एक सुंदर तरुणी असतांना कार खराब होते, मग ते दोघेजण रात्र एका अज्ञात बंगल्यात घालवतात, मग पाऊस येतो, विजांचा कडकडाट होतो, मग ती तरुणी तरुणाला बिलगते आणि मग "ते" घडते किंवा मग रात्री तरुणी तरुणाच्या फ्लॅट वर थांबते आणि मग "ते" घडते अशा प्रकारचे अनेक प्रसंग लिहिले होते. मनातल्या मनात तो ते प्रसंग आठवून हसत होता. खऱ्या जीवनात असे घडत नाही! विशेषत: एक चांगली मैत्रीण सोबत असतांना?? मग एका लेखकाच्या दृष्टीकोनातून तो विचार करू लागला: तरुण तरुणी योगायोगाने कारमध्ये एकत्र आल्यावर खऱ्या जीवनात नेमके काय घडते किंवा घडू शकते? असा विचार करत असतांनाच त्याने एका शॉर्टकट मार्गाने गाडी वळवली कारण शॉर्टकट मारूनसुद्धा अजून अर्धा तास मोहिनीच्या फ्लॅटवर जायला लागणार होता आणि मग तेथून निघून अंदाजे रात्री अडीच वाजेपर्यंत तो घरी पोहोचणार होता... बराच वेळ गाडी चालवत चालवत आता एक निर्जन रस्ता लागला होता. उद्या रत्नाकरचा माग काढायचा आणि काय काय करायचे याचा तो गाडी चालवतांना विचार करत होता. रत्नाकारला त्याने जाब विचारायचे ठरवले की "मित्रा माझी कथा का चोरलीस? चोरलीस ते ए...

ठरलं तर मग : सायली

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहवर ५ डिसेंबरपासून ‘ठरलं तर मग’ ही नवी मालिका सामील होणार आहे. मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली असून सायली आणि अर्जुन या नव्या जोडीला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. जुई गडकरी आणि अमित भानुशालीसोबत ज्योती चांदेकर, सागर तळाशीकर, माधव अभ्यंकर, मीरा जगन्नाथ, प्रियांका तेंडोलकर, प्राजक्ता दिघे, ज्ञानेश वाडेकर, नारायण जाधव अशी दिग्गज कलाकारांची फौज या मालिकेत आहे. आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने या मालिकेची निर्मिती केली आहे. सचिन गोखले या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. • या नव्या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘ठरलं तर मग ही एक प्रेम कथा आहे. प्रेम वेगवेगळ्या कारणांमुळे वेगवेगळ्या परिस्थितीत घडतं. स्टार प्रवाह वाहिनी नेहमीच नाते संबंधांबद्दल गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असते. या मालिकेतूनही रसिकांना ब्रॅण्ड स्टार प्रवाहचा अनुभव येईल. ठरलं तर मग हे मालिकेचं शीर्षकच सांगतं की हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. हा निर्णय नेमका काय आहे? कशामुळे आहे? याची उत्सुकता प्रेक्षकांना नक्की लागून राहिल याची खात्री आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत या मालिकेला सुद्धा भरभरुन प्रेम मिळेल अशी आशा आहे.’ • ठरलं तर मग मालिकेतील भूमिकेविषयी सांगताना जुई म्हणाली, ‘ही मालिका करताना मला अतिशय आनंद होत आहे. माहेरी आल्याची भावना आहे. सायली ही अतिशय समजूतदार आणि स्वतंत्र विचारांची मुलगी आहे. नात्यांचं महत्व जाणणारी, अन्याय सहन न करणारी मात्र प्रचंड वेंधळी. सायलीच्या वेंधळेपणामुळेच मालिकेत मजेशीर प्रसंगही पाहायला मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालिकेची कथा ही मालिक...

Holi 2023: 'ठरलं तर मग' आणि 'मुरांबा' मालिकेत पाहायला मिळणार रंगाची उधळण

ठरलं तर मग मालिकेत सायली आणि अर्जुनचा लग्नानंतरचा हा पहिलाच होळी सण. सुभेदार कुटुंबात रितीरिवाजाप्रमाणे होळीची पारंपरिक पूजा होणार आहे. यासोबतच धुलिवंदनाला रंगांची उधळणही होणार आहे. सगळीकडे जल्लोषाचं वातावरण असलं तरी सायली आणि अर्जुन मात्र आपल्याला कुणी रंग लावणार नाही याची खबरदारी घेताना दिसणार आहेत. इतकी काळजी घेऊनही या दोघांवर अक्षरश: रंगांची बरसात होते. अर्जुन आणि सायली रंगात कसे रंगून गेलेत हे मालिकेच्या येत्या होळी स्पेशल भागांमध्ये पाहायला मिळेल. मुरांबा मालिकेतही होळीचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. पहिल्या होळीचा पहिला रंग अक्षयला रमाला लावायचा आहे. रमासोबत रंग खेळण्याची स्वप्न पाहणारा अक्षय योगायोगाने रेवाला पहिला रंग लावतो. रेवा मनातून खुष होते खरी. मात्र माझ्या प्रेमावर फक्त रमाचा हक्क आहे असं अक्षय तिला ठणकावून सांगतो. त्यामुळे मुरांबा मालिकेतला धुलिवंदनाचा सण खऱ्या अर्थाने रमा आणि अक्षयसाठी खास ठरणार आहे.