तुकाराम महाराज पालखी सोहळा

  1. Ashadi Wari 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान
  2. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज ‛पालखी सोहळा 2023’
  3. Ashadhi Vaari: संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान


Download: तुकाराम महाराज पालखी सोहळा
Size: 2.44 MB

Ashadi Wari 2023 : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीचे देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान

या भावनेने संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेले लाखो भाविक शनिवारी (ता. १०) सहभागी झाले. ‘तुकोबाऽ तुकोबाऽऽ’ आणि ‘ज्ञानोबाऽ तुकारामऽऽ’ असे नामघोष आणि टाळ-मृदंगांच्या गजरात सर्व तल्लीन झाले होते. आषाढी वारीनिमित्त सावळ्या विठुरायाला भेटण्यासाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने देहूतून पंढरपूरकडे शनिवारी दुपारी अडीच वाजता प्रस्थान ठेवले. हातात भगव्या पताका घेऊन नामघोष करणाऱ्या वारकऱ्यांमुळे आणि टाळ-मृदंगाच्या गजराने देहूनगरी दुमदुमली. भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या वैष्णवांनी आनंदाने दिंड्यांमधून फेर धरला. संत तुकाराम महाराज मुख्य देऊळवाडा परिसरात ‘याची देही, याची डोळा’ सोहळा अनुभवला. पालखी प्रस्थान सोहळ्याचे पारंपरिक कार्यक्रम पहाटे साडेचारपासून सुरू झाले. पाच वाजता देऊळवाड्यातील संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात पालखी सोहळाप्रमुख भानुदास महाराज मोरे, संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी सपत्नीक महापूजा केली. पालखी सोहळा जनक तपोनिधी नारायण महाराज समाधी मंदिरात संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे, संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते महापूजा झाली. देऊळवाड्यातील भजनी मंडपात सकाळी दहा वाजता पुंडलिक महाराज मोरे यांचे काल्याचे कीर्तन झाले. ‘तुझिये संगती झाली आमुची निशकिंती। नाही देखियेले ते मिळे, भोग सुखाचे सोहळे।। या अभंगाचे निरूपण त्यांनी केले. सकाळी साडेदहा वाजता संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहूतील घोडेकर बंधू (सराफ) यांनी चकाकी देऊन इनामदारवाड्यात आणल्या. दिलीप महाराज गोसावी इनामदार यांच्या हस्ते पादुकांची पूजा झाली. मानकरी म्हसलेकर दिंडीतील सेव...

संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज ‛पालखी सोहळा 2023’

आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्त पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा प्रशासनाने स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आरोग्याच्यादृष्टीने जय्यत तयारी सुरू केली आहे. पालखीमध्ये १०६ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी दर दिवशी तब्बल २ हजार ७०० शौचालयांच्या व्यवस्थेचे नियोजन करण्यात आले आहे. श्री.संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा ११ जून रोजीचा मुक्काम दर्शन मंडप इमारत आळंदी संस्थान येथे, १२ व १३ जून रोजी पालखी विठोबा मंदीर भवानीपेठ पुणे येथे, १४ व १५ जून रोजी सासवड, १६ जून रोजी जेजुरी, १७ जून रोजी वाल्हे येथे मुक्काम असणार असून १८ रोजी नीरा येथून सातारा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. तर श्री संत तुकाराम महाराज यांची पालखीचा मुक्काम १० जून रोजी ईनामदार साहेब वाडा देहू येथे, ११ जून रोजी आकुर्डी, १२ व १३ जून रोजी नानापेठ, पुणे, १४ जून लोणी काळभोर, १५ जून यवत, १६ जून रोजी वरवंड, १७ जून रोजी उंडवडी गवळ्याची, १८ जून बारामती, १९ जून सणसर, २० जून आंथुर्णे, २१ जून निमगाव केतकी, २२ जून इंदापूर, २३ जून रोजी सराटी येथे मुक्काम असणार असून २४ जून रोजी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. उन्हाच्या कालावधीत पालखी सोहळा असल्यामुळे पुरेशा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी ५४ टँकर देण्यात येणार असून २९ टँकर भरणा ठिकाणे निश्चित केली आहेत. श्री संत तुकाराम महाराज पालखीसाठी ४५ टँकर आणि १६ टँकर भरणा ठिकाणे, श्री संत सोपानकाका महाराज पालखीसाठी ३ टँकर, श्री संत चैतन्य महाराज पालखी आणि श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखीसाठी प्रत्येकी २ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासोबतच पालख...

Ashadhi Vaari: संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान

श्री संत तुकाराम महाराज मंदिर, शाळा मंदिर, या ठिकाणची महापूजा पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या हस्ते करण्यात आली. मंदिरात पहाटे अडीच वाजले पासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. श्री संत तुकाराम महाराज मंदिर, मुख्यमंदिर, ज्या ठिकाणाहून पालखी सोहळ्याचे प्रस्थान ठेवले जाणार आहे अशा भजनी मंडपाला, हनुमान मंदिर गरुड मंदिराला, राममंदिर, महाद्वार या सर्व ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. मंदिर परिसरात आलेले भावीक महिला दर्शन झाल्यानंतर श्री राम मंदिरासमोरील मोकळ्या जागेत फुगड्यांचा खेळ खेळत होते. दरम्यानच्या काळात दर्शन बारी पालखी मार्गावरील श्री संत तुकाराम महाराजांच्या जन्मस्थानापर्यंत लांबच लांब रांगा लागलेल्या होत्या. पालखीचे प्रस्थान होण्यापूर्वी संत तुकाराम महारांजाच्या पादुकांना दुधाचा अभिषेख घालून पुजन करण्यात आले इंद्रायणी स्नान वारीसोबत चाल चालणाऱ्या दिंड्या सकाळ पासूनचाला प्रदक्षिणा घालण्यासाठी शिष्यबद्ध पद्धतीने मंदिराच्या आवारात येत होत्या टाळ- मृदंग आणि हरिनामाच्या गजरामध्ये आपली प्रदक्षिणा पूर्ण करून उत्तर दरवाजाने पुन्हा बाहेर जात होतो. पहाटे पासूनच इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता. आंघोळीनंतर पूजा पाठ करण्यात भाविक मग्न झाले होते. नगरपंचायतीने गेल्या काही दिवसांपासून इंद्रायणी नदीचे पात्र स्वच्छ केले होते‌ परंतु पाटबंधारे विभागाने सोडलेल्या पाण्यामुळे त्याबरोबर वाहून आलेली पानफुटी यामळे भाविकांनाताना आंघोळ करताना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. पहाटे पासूनच इंद्रायणी नदीचा काठ भाविकांनी फुलून गेला होता. संत तुकाराम महाराज यांच्या ३३८ वा पालखी सोहळ्याचे प्रस्थान मंदिर परिसरात गर्दी इंद्रायणी तीरावरील विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात...