तुकाराम महाराजांचे अभंग

  1. तुकाराम बीज : ३० मार्च तुकाराम बीज
  2. ४०५. अभंग क्र. २४९७ मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ।।१।।तैसा भक्तिवाद काय । रंगबेगडीचा न्याय ।।धृ।।वेठी धरिल्या दावी भाव । मागे पळायचा पाव ।।२।।काजव्यांच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ।।३।। – गाथा परिवार


Download: तुकाराम महाराजांचे अभंग
Size: 8.31 MB

तुकाराम बीज : ३० मार्च तुकाराम बीज

स्थैर्य, सातारा, दि. ३०: तुकाराम बीज, म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठ गमनाचा दिवस. फाल्गुन वद्य द्वितीयेला संत तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठ गमन केले. यावर्षी हा दिवस ३० मार्च या दिवशी आहे. हा दिवस म्हणजे म्हणजेच या संतश्रेष्ठाच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. या निमित्ताने संतश्रेष्ठ, भक्तशिरोमणी, कृपेचा सागर असणार्‍या, तसेच आपल्या अभंगातून सार्‍या ब्रह्मांडाला उद्धरण्याचे सामर्थ्य असणार्‍या संत तुकारामांची महती तसेच संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठ गमन याविषयी माहिती सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखात थोडक्यात देत आहे. संत तुकाराम महाराज (तुकोबा) हे इ.स.च्या सतराव्या शतकातील एक वारकरी संत होते. संत तुकाराम महाराजांचे मूळ नाव तुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे). त्यांचा जन्म वसंत पंचमीला (माघ शुद्ध पंचमीला) महाराष्ट्रातील देहू या गावी झाला. तुकारामांचे वडील बोल्होबा व आई कनकाई होत. पंढरपूरचा विठ्ठल वा विठोबा हे संत तुकाराम महाराजांचे आराध्यदैवत होते. जे का रंजले गांजले ! त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा ! देव तेथेची जाणावा ! अशा प्रकारचे अभंग संत तुकाराम महाराजांनी जनसामान्यांना सांगून ईश्वर भक्तीचा सुगम असा मार्ग दाखवला. तुकाराम महाराज यांचे सद्गुरू बाबाजी चैतन्य यांनी महाराजांना बीजमंत्र दिला. त्यांच्या कृपाशीर्वादाने महाराजांना ज्ञान प्राप्त झाले. संत तुकाराम हे अभंग वाणी कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण देणारे या काळातील महत्त्वाचे संत ठरले. संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमन : जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचे सदेह वैकुंठगमनच झाले. स्वतः भगवंत त्यांना नेण्याकरिता वैकुंठाहून आले आणि त्यांना सदेह वैकुंठात घेऊन...

४०५. अभंग क्र. २४९७ मोलें घातलें रडाया । नाहीं असुं आणि माया ।।१।।तैसा भक्तिवाद काय । रंगबेगडीचा न्याय ।।धृ।।वेठी धरिल्या दावी भाव । मागे पळायचा पाव ।।२।।काजव्यांच्या ज्योती । तुका म्हणे न लगे वाती ।।३।। – गाथा परिवार

मोल देऊन रडायला बसवलं, पण त्यांना ना आसू ना माया. तसा बेगडी भक्तीवाद काय कामाचा ? वेठीला धरुन कामाला लावलेला माणूस काम करण्याचा आव आणतो पण प्रत्यक्षात कामावरुन पळून जायची संधी शोधत असतो. तुकाराम महाराज म्हणतात, “काजव्यांच्या प्रकाशाने वाती पेटत नाही.” या अभंगाची पहिली ओळ मराठी भाषेत अतिशय मोठ्या प्रमाणात दैनंदिन व्यवहारात वापरली जाते. प्रसिद्ध लेखिका महाश्वेता देवी यांची एक गाजलेली कादंबरी रुदाली आहे. या कादंबरीवर त्याच नावाने निघालेला चित्रपटही खूप गाजला होता. या कथानकाला राजस्थानची पार्श्वभूमी आहे. जिथे पुरुषांनी रडणे नामर्दपणाचं लक्षण असं लहानपणापासून मुलांच्या मनावर ठसवलं जातं. त्यामुळे घरातली जवळची व्यक्ती जरी गेली तरी पुरुषांना रडू येतच नाही. आणि हे पुरुष स्त्रीयांना इतकं वाईट वागवतात की स्त्रीयांनाहु रडू येत नाही. माणूस मेल्यावर जर कोणी रडलं नाही तर त्याला सद्गती प्राप्त होत नाही अशी समजूत आहे. म्हणून अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एक वेगळाच मार्ग तिथे अवलंबण्यात येतो. तो म्हणजे एखादा मृत्यू झाला तर रडण्यासाठी भाड्याने स्त्रीया आणायच्या. त्यांनी कोणी मेलं की त्या घरी जायचं आणि रडायचं, त्या बदल्यात पैसे घ्यायचे. अशा स्त्रियांना रुदाली म्हणतात. या स्त्रीयांच्या रडण्यामागे त्या मृत व्यक्तीबद्दल कोणतंही प्रेम नसतं. त्यांचं रडणं हा त्यांच्या उदरनिर्वाहाचा व्यवसाय असतो. अशाप्रकारे पैसे वा मोल देवून कोणाला तरी सक्तीने रडायला लावणं हे हास्यास्पद वाटत असलं तरी समाजात अशाही चालीरीती असतात. खरं तर दुसऱ्याचा आनंद पाहून आनंदी होणं आणि दुसऱ्याचं दु:ख पाहून दु:खी होणं हे सुंदर, संवेदनाशील मनाचं चिन्ह असतं. दोन माणसं एकमेकांवर जेंव्हा जीवापाड प्रेम करतात तेंव्हा त्यांना अशी भाव...