तुमची मुलगी काय करते

  1. Complete 200 Episodes Of Tumchi Mulgi Kay Karte Serial
  2. ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची 'तुमची मुलगी काय करते?' मध्ये एण्ट्री
  3. सोनी मराठी


Download: तुमची मुलगी काय करते
Size: 21.76 MB

Complete 200 Episodes Of Tumchi Mulgi Kay Karte Serial

Tumchi Mulgi Kay Karte : वेगळ्या धाटणीची अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे मागील 200 भागांमध्ये 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेत सावनी मिरजकर नावाची तरुणी बेपत्ता होते. त्यानंतर सुरू होते श्रद्धा मिरजकर म्हणजे तिच्या आईच्या शोधाची गोष्ट. श्रद्धा जिवाचं रान करत सावनीला शोधून काढते. अनेक वेळा तिच्या आवाक्याबाहेर जाऊन ती गोष्टी करते. ड्रग डील करते, बंदूक हातात घेते अशा अनेक गोष्टी सावनीला शोधण्यासाठी श्रद्धा करते. अखेर अथक प्रयत्नांनंतर सावनीला शोधून काढण्यात श्रद्धा यशस्वी होते. सावनी घरी अली, तरी तिच्या मनावर झालेले आघात अजूनही पुसलेले नाहीत. अशातच इन्स्पेक्टर विजय भोसलेला किलवर जिवंत असल्याचे समजते. त्यामुळे आता सगळे किलवरला शोधताहेत. सावनीही या कामात पोलिसांना मदत करते आहे. त्यामुळे येत्या भागांत अनेक रहस्यं उलगडली जातील. तसेच चारू किलवर असेल का, सावनीला तिचा भूतकाळ आठवेल का, मिरजकर कुटुंबाची या सगळ्यातून सुटका होईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे येत्या भागांमध्ये मिळतील. संबंधित बातम्या Published at : 01 Aug 2022 11:13 PM (IST) Tags:

ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची 'तुमची मुलगी काय करते?' मध्ये एण्ट्री

सोनी मराठी वाहिनीवरील 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेला सध्या रंजक वळण मिळाले आहे. श्रद्धा आणि अभय मिरजकर यांची मुलगी सावनी बेपत्ता झाली असून श्रद्धा आपल्या मुलीला शोधण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न करते आहे. पोलिसांकडून श्रद्धावर कडक नजर ठेवण्यात येते आहे. त्यातच या शोधात श्रद्धाला भेटलेली 'ताई' श्रद्धाच्या जिवावर उठली आहे. त्यामुळे आता श्रद्धा आपल्या मुलीला शोधू शकेल का? सावनी खरंच गुन्हेगार असेल का? अशा प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागांमधून पाहणं प्रेक्षकांसाठी उत्कंठावर्धक ठरणार आहे. त्यातच ज्येष्ठ अभिनेते संजय मोने यांची एण्ट्री आता मालिकेत झालेली असल्याने मालिकेत आणखीनच रंजकता येणार आहे. 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेत श्रद्धा आपल्या मुलीच्या, सावनीच्या शोधासाठी अनेक प्रकारे प्रयत्न करतेय. या सगळ्या शोधात ती ताई नावाच्या एका कुख्यात स्त्रीकडे जाऊन पोहोचली, पण ताईला पकडून देण्यासाठी तिने पोलिसांना मदत केली. त्यामुळे ताईच्या विरोधात गेल्याने ताई श्रद्धाच्या जिवावर उठली आहे आणि तिच्या मदतीला आता 'व्यंकट सावंत' आला आहे. 'तुमची मुलगी काय करते' या मालिकेत ज्येष्ठ अभिनेते संजय मोने 'व्यंकट सावंत' नावाचे पात्र साकारत आहेत. संजय मोने यांचे 'तुमची मुलगी काय करते?' या मालिकेमधून अनेक वर्षांनी छोट्या पडद्यावर पुनरागमन झाले आहे. श्रद्धाचा जीव घेण्यासाठी आलेल्या ताईच्या माणसांपासून व्यंकट सावंत श्रद्धाला वाचवतात. व्यंकट सावंत या पात्राचा उल्लेख आत्तापर्यंत श्रद्धाचे वडील म्हणून आला आहे. संजय मोने यांचा दर्जेदार अभिनय आणि वेगळा ठसका प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. मधुरा वेलणकर, संजय मोने यांसारखी तगडी कलाकार मंडळी मालिकेत असल्याने या मालिकेची रंगत आणखीनच वाढणार आहे. श्र...

सोनी मराठी

२० डिसेंबर पासुन सोनी मराठीवर नुकतीच नवीन मालिका सुरू झाली. " तुमची मुलगी काय करते?" असं त्या मालिकेचं नाव. ही थरारक वाटावी अशी मालिका असावी असं प्रोमो वरून लक्षात आलंच होतं ते आता मालिका सुरू झाल्यापासुन जाणवत आहे. मधुरा वेलणकर ही या सिरियल मधील प्रमुख पात्र असावी असं सद्ध्या तरी वाटतंय. हरीश दुधाडे हा पोलिस इन्पेक्टरच्या भुमिकेत चांगला वाटतोय. या मालिकेचे लेखक अन पटकथालेखक चिन्मय मांडलेकर आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले यांनी केलं आहे. विषेश म्हणजे मालिकेची निर्माती मनवा नाईक यांची आहे. या मालिकेवरील चर्चेसाठी हा धागा..!! मी ही बिग बॉस बघते. ओटीटी वर धावत धावत बघितले हे, के के उगाच जातेय परत. नवरात्रात कसं देवी दुष्ट प्रवृत्तीचा संहार करते, इथे मात्र दुष्ट भारी ठरले . ती लोखंडे पळाली एवढ्या पोलिस फोर्सला गुंगारा देऊन, त्या कोयत्यावाल्या बायका पळाल्या, एक मेली त्यातली तरी काय झालं. एकच चांगलं की के के ला मुलगी झाली. माय लेक सुखरूप. त्यांना परत पाठवा किलवर केसवर. कोयत्यावाल्या बायकांकडे अजून बऱ्याच मदतनीस बायका आहेत हे व्यंकट आणि भोसलेला माहिती होतं की पुर्वानुभवावरुन तरी माती खाल्ली तिथे. सिरियलने सध्या तरी वेग पकडला आहे.रेंगाळत नाही. अखेर पोलीस कस्टडीत असलेल्या निलांजनाकडून हिंमतच स्केच करून घेतल आणि साऊने ओळखल हिंमतला. वंदना अजूनही बाहेरच आहे.निलांजनाला मारण्यासाठी कील्वरने जेलमध्ये पाठवलेल्या बाईला निलांजनाचा घोंगडीने गळा दाबताना चक्क वेळेवर पोचून जमदाडेने छातीत गोळी घातली.निलांजना आय सी यूत आहे. श्रध्दाला पिस्तूल मिळाल वाटत.कधी वापरणार आहे काय माहीत. संपली एकदाची.पण सिक्वेलची सोय करून जो लवकरच येणार आहे भोसले आणि जमदाडेसोबत.ः असो. तर किल्वर कोण,हे ठरल एकदाच. वेंगसरकर...