वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी अभंग lyrics

  1. प्रवचन : वाचावी ज्ञानेश्वरी
  2. भावार्थ दीपिका (Bhavarth Deepika)
  3. आळंदी : भाद्रपद कृष्ण षष्ठी


Download: वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी अभंग lyrics
Size: 71.48 MB

प्रवचन : वाचावी ज्ञानेश्वरी

या अभंगात संत जनाबाई ज्ञानेश्वरीचे महात्म्य सांगतात.त्या म्हणतात, मनुष्याने आयुष्यात एकदातरी ज्ञानेश्वरी वाचवी व पंढरी पहावी.अज्ञानी मनुष्यालाही ज्ञान होइल असा त्या टीकेस वर आहे.एवढेच नव्हे तर ही टीका वाचल्याने मूढ म्हणजेच जड बुद्धि असेल त्यालाही ज्ञान होते आणि जो मूर्ख असेल म्हणजे ज्ञान असूनही योग्यप्रकारे वापरत नाही त्यालाही योग्य ज्ञान होते. एवढेच नाही तर जनाबाई म्हणतात जो कोणी ज्ञानेश्वरी वाचेल त्याला मी लोटांगण घालते. असे प्रवचन करताना ह भ प चैतन्य महाराज देगलूरकर यांनी त्यांच्या वाकपुष्पातून पुढे बोलताना त्यांनी आपला वाक पुष्पातून सांगितले की, जन्माला येऊन माणसाने काय करावे ? जन्माला येण्याचा त्याचा हेतू काय ? तर राजकीय ,सामाजिक, धार्मिक, कौटुंबिक हेतू डोळ्यासमोर ठेवून आपल्या जीवनाची किती कर्तव्यता कोणत्या कारणाने होऊ शकते. याचा विचार करून माणसाने आपले जीवन अखीव- रेखीव अशा पद्धतीने स्वीकारावं माणसाच्या जीवनाला काही नियम असतात ते धर्माचे नियम असतील विचारांचे नियम असतील ते निष्ठेचे नियम असतील परंतु नियमांमध्ये बद्ध असणे हे मानवी जीवनाचे लक्षण आहे. मनुष्य सोडला तर कोणताही प्राणी नियमात राहताना दिसत नाही, जिकडे दिशा मिळेल तिकडे जाण ही त्याची गती असते. परंतु मानवी जीवन हे वेगळे असते, अलीकडे माणसाला नियमात राहणे नकोसे झालेले आहे कारण नियम म्हटले की बंधन आली. तर माणसाला बंधन नकोसे आहे. परंतु आपण माणसाने नियमात राहिलं पाहिजे बंधनातच राहिला पाहिजे. नाहीतर प्राण्यांप्रमाणे त्याच्या वागण्यात स्वैराचार असला तर मानवी जीवन आणि प्राण्यांचे जीवनात काय अंतर राहील तसेच आहार ,निद्रा ,भय ,मैथुनाच्या ,सामान्य, भयतात पशूभै नारायणम ! हे भरधारीच्या वाक्य आपल्याला हेच सुचवत असते की आहार , भय...

भावार्थ दीपिका (Bhavarth Deepika)

म्हणजेच , ग्रंथाची सुरवातच ज्ञानेश्वर माउलींनी ओंकार स्वरूप असलेल्या आणि वेदांमार्फत व्यक्त होणाऱ्या त्या परमेश्वराला नमन करून केली आहे . अती विनम्र भावाने सर्वांत विराजमान असणाऱ्या आत्मस्वरूप अशा परमेश्वराचा जयजयकार केला आहे . आरंभ समयी ज्ञानप्रकाशरूपी मति प्रदान करणाऱ्या साक्षात गणेशास वंदन करायला ज्ञानोबाराया विसरले नाहित . मग ग्रंथाचा संकल्प सिद्ध होण्यासाठी गुरू कृपा ही सर्वात महत्वाची असते . म्हणूनच ज्ञानेश्वर माउलींनी स्वतःला गुरू श्री निवृत्तिनाथ यांचा दास असल्याचे संबोधून नतमस्तक होताना देवाकडे उद्धार करण्याची विनंती केली आहे . ज्ञानेश्वरीच्या सुरवातीच्या चार ओळितच आपण ज्ञानी माणसांचे पहिले लक्षण हे विनम्रता असते हे शिकतो . म्हणजे जर साक्षात ज्ञानाचा राजा जर विनम्र असेल तर आपली काय बिशाद ? तसेच गुरू वंदना करून ज्याच्यामुळे आपल्याला ज्ञान मिळाले अशा गुरूचरणांची आठवण ही आरंभ करताना जरूर असावी हा जणू मंत्रच ज्ञानराजांनी दिला आहे . तसेच ज्ञान प्रदान करणाऱ्या ‘ गणेश ’ या परमेश्वराच्या रूपास प्रामुख्याने अभिवादन करून ज्ञानार्जनास महत्व दिल्याचे दिसते . ज्ञानेश्वरीचे निरूपण अनेक विद्वानांनी विवीध स्वरूपात केलेलेच आहे . अनेक भाविक माणसे भक्ती – भावाने ज्ञानेश्वरीचे वाचन आणि अध्ययन करत असतात तसेच आपण सर्वजण ज्ञानेश्वरी बाबत लहानपणापासून ऐकत आलो आहोत . पण शहरातल्या अधुनिक जीवनशैलीत राहणाऱ्या माणसाला धकाधकीच्या आयुष्यात कदाचित इतका वेळही नसतो की त्यांनी हे महाकाव्य स्वतः अनुभवावे . तसेच जर वयाने लहान असणा – यांना जर ज्ञानेश्वरीत रस निर्माण झाला तर या ज्ञानेश्वरी बाबत त्यांना थोडक्यात माहिती मिळावी जेणेकरून कोणी वाचक संपूर्ण ज्ञानेश्वरीचे वाचन करण्याची प्रेरणा घेईल असा उद्येश...

आळंदी : भाद्रपद कृष्ण षष्ठी

आळंदी : भाद्रपद कृष्ण षष्ठी – ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती बाबतीत विश्लेषण : ज्ञानेश्वर महाराज करंजीकर •भाव धरोनीया वाचे ज्ञानेश्वरी ॥ •वाचावी ज्ञानेश्वरी | डोळा पहावी पंढरी ॥ •गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी । ब्रह्मानंद लहरी प्रगट केली ॥ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ मानले जाणारे सर्वश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर यांनी गीतेवर रचिलेली टीका म्हणजे ज्ञानेश्वरी. भावार्थदीपिका, ज्ञानदेवी अशी या ग्रंथाची पर्यायी नावे आहेत. प्रत्यक्ष ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे नामकरण केलेले नाही. संत नामदेवांनी या ग्रंथाचा उल्लेख ज्ञानदेवी, ज्ञानेश्वरी आणि गीताटीका अशा तीन नावांनी केलेला आहे. त्यामुळे ज्ञानेश्वरांची ती ज्ञानेश्वरी वा ज्ञानदेवांची ती ज्ञानदेवी अशी नावे पुढीलांनी रूढ केली असावीत. आज या ज्ञानेश्वरीला तब्बल ७३० वर्षे पूर्ण झाली असून, भाद्रपद वद्य षष्टी ही ज्ञानेश्वरीची जयंती मानली जाते. शके १२१२ किंवा इ. स. १२९० मध्ये गोदावरीच्या काठी नेवासे येथे श्रीमहालसा मंदिरात एका खांबाला टेकून ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरीची एकनाथपूर्वकालीन विश्वसनीय प्रत अद्याप मिळालेली नाही. तिची जुन्यात जुनी प्रत मिळविण्याचे अनेक प्रयत्न झाले. ज्ञानेश्वरी ही गीतेवरील मराठीतील पहिली ओवीबद्ध टीका आहे. निवृत्तिनाथांच्या कृपादृष्टीखाली श्रोत्यांसमोर ज्ञानेश्वरांनी केलेले हे काव्यमय प्रवचन केले. ज्ञानेश्वरांच्या ठायी तत्त्वज्ञान, काव्य आणि आत्मानुभूती यांचा झालेला अद्भुत त्रिवेणीसंगम हेच त्यांच्या गीतेवरील भाष्याचे महान वैशिष्ट्य होय, असे मत अभ्यासकांनी मांडले आहे. मराठी भाषेतून विश्वात्मक देवाकडे जगत्कल्याणासाठी पसायदानाचे अमृतदान मागणाऱ्या ज्ञानेश्वरीच्या जयंतीनिमित्त.. गीतेवरील मराठीतील पहिली ओवीबद्ध टी...