विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर

  1. Jaysingpur : आंबेडकर पुतळ्याचा वाद विकोपाला; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, 150 जणांवर गुन्हा
  2. लेख
  3. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर
  4. bhimrao ambedkar
  5. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक अष्टपैलू विचारवंत


Download: विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
Size: 27.17 MB

Jaysingpur : आंबेडकर पुतळ्याचा वाद विकोपाला; आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार, 150 जणांवर गुन्हा

जयसिंगपूर : शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा (Babasaheb Ambedkar Statue) उभारणीचा वाद विकोपाला गेला आहे. सि.स.नं. १२६६ ऐवजी १२५१ मध्ये पुतळ्याची कार्यवाही व्हावी, या मागणीसाठी सोमवारी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समन्वय समितीने पालिकेवर मोर्चा नेला. सक्षम अधिकारी नसल्याने संतप्त मोर्चेकऱ्यांनी पालिकेत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पोलिसांनी रोखला. यानंतरही सक्षम अधिकारी मोर्चासमोर येत नसल्याने आंदोलकांनी थेट कोल्हापूर-सांगली महामार्गावरील क्रांती चौकात रास्ता रोको करत ठिय्या मारला. तेथे बराच वेळ चर्चेचे गुऱ्हाळ सुरू होते; मात्र, अधिकारी नसल्याने पोलिसांचे प्रयत्न निष्पळ ठरले. मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी मोर्चेकरांसमोर आल्यानंतर सि.स.नं. १२६६ च्या प्रस्तावावरून आंदोलकांचे समाधान झाले नाही. त्याचवेळी मुख्याधिकाऱ्यांवर शाईफेक झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. त्यानंतर आंदोलकांची पांगापांग झाली. दरम्यान, शाईफेकप्रकरणी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती स्वाती सासणे यांच्यासह १५० जणांवर जयसिंगपूर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हे दाखल केले. यावरून पालिकेसमोर सुमारे दोन तास घोषणाबाजी सुरू होती. त्या दरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर वैंजणे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अचानक झालेल्या रास्ता रोकोमुळे चौकाच्या चारही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागून राहिल्या. कॉलेज विद्यार्थी, नोकरदार यांच्यासह प्रवासी वर्गाचे हाल झाले. मुख्याधिकाऱ्यांना बसविले रस्त्यावर सुमारे तीन ते चार तास आंदोलनकर्त्यांना हुलकावणी दिलेले मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी क्रांती चौकात आंदोलकांसमोर ...

लेख

सर्वप्रथम महामानव व विश्ववंदनीय डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त या देशातील प्रत्येक नागरिकाला अनंत शुभेच्छा ! भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे एक शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, न्यायशास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ, आणि समाजसुधारक. आधुनिक भारताच्या इतिहासातील एक अविभाज्य घटक म्हणुन डॉ.बाबासाहेबांचे कार्यकर्तृत्व आणि त्यांच्या सर्वव्यापी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देण्याचा हा एक छोटासा प्रयत्न. अस्पृश्य, दलित, शोषित समाजाला प्रवाहात आणून त्यांना न्यायहक्क प्रदान करणारे एक नेते, एवढीच डॉ.बाबासाहेबांची ओळख नसून या महामानवाच्या सर्वदर्शी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून घेत असताना डॉ. बाबासाहेबांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे येऊन विदेशातून शिक्षण घेण्यापर्यंतचा त्यांचा जीवन प्रवास म्हणजे फार मोठे दिव्यच. वर्गाबाहेर बसून शालेय शिक्षण घेणारा एक विद्यार्थी एका देशाचे संविधान निर्माण करतो यातूनच या महान प्रज्ञासूर्याच्या तेजाचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही. शिक्षणाच्या जोरावर वैयक्तिक अथवा सामाजिक क्रांती कशी करता येते, याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर. तब्बल ०२ वर्षे ११ महिने आणि १७ दिवस अहोरात्र प्रचंड अभ्यास करून भारतासारख्या विविध भाषा, प्रांत - प्रदेश आणि संस्कृती असणाऱ्या देशाला स्वातंत्र्य समता व बंधुता या तत्त्वावर आधारित एक आदर्श संविधान डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिले. २५ भाग, ४४८ कलमे, व१२ परिशिष्टे असणारी जगातील सर्वात मोठी राज्यघटना त्यांनी भारताला दिली. एक महान लोकशाही म्हणून भारताची संसदीय लोकशाही जगात ओळखली जाते. सर्वसामान्य जनतेला असलेल्या मतदानाच्या अधिकारामुळे दुर्लक्षित समाज ...

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना डॉ. बी.आर. आंबेडकर, भारतीय इतिहासातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आहे आणि त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक मानले जाते. भारतीय समाजासाठी त्यांचे योगदान खूप मोठे आहे आणि त्यांचा वारसा लाखो लोकांना प्रेरणा देत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत काही महत्त्वाच्या ठिकाणांची माहिती या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात झाला. त्यांचे जन्मस्थान आता त्यांच्या अनुयायांसाठी आणि प्रशंसकांसाठी एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे. ज्या घरात त्यांचा जन्म झाला ते घर संग्रहालयात रूपांतरित करण्यात आले आहे, ज्यामध्ये त्यांच्या जीवन आणि कार्याशी संबंधित अनेक कलाकृती आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान : राजगृह, मुंबई अमेरिका आणि युनायटेड किंग्डममध्ये शिक्षण पूर्ण केल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर भारतात परतले आणि मुंबईत स्थायिक झाले. दादरमधील राजगृह नावाच्या घरात ते राहत होते, जे आता त्यांचे जीवन आणि कार्य यांना समर्पित संग्रहालय आहे. संग्रहालयात छायाचित्रे, वैयक्तिक वस्तू आणि त्याच्या राजकीय आणि सामाजिक क्रियाकलापांशी संबंधित दस्तऐवजांसह अनेक प्रदर्शने आहेत. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अंतिम विश्राम स्थळ : चैत्यभूमी, मुंबई बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झाले आणि त्यांचे अंतिम विश्रामस्थान मुंबईतील चैत्यभूमी येथे आहे. चैत्यभूमी हे त्यांच्या सन्मानार्थ बांधलेले स्मारक आहे आणि ते दादर येथे आहे. त्यांच्या अनुयायांसाठी आणि प्रशंसकांसाठी हे एक लोकप्रिय तीर्थक्षेत्र आहे आणि दरवर्षी हजारो लोक त्यांच्या पुण्यतिथीला भेट देतात. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आं...

bhimrao ambedkar

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर १९५६), बाबासाहेब नावाने प्रसिद्ध, हे जागतिक दर्जाचे भारतीय अर्थशास्त्रज्ञ, कायदेपंडीत, राजनीतिज्ञ, लेखक, समाज सुधारक, तत्त्वज्ञ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, मानवी हक्कांचे कैवारी, स्वातंत्र्य भारताचे प्रथम कायदा मंत्री व बौद्ध धर्म पुनरुत्थानक होते. याशिवाय बहुआयामी व बहुश्रुत व्यक्तीमत्त्व असलेले डॉ. आंबेडकर हे समाजशास्त्रज्ञ, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, शिक्षणतज्ज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, प्राध्यापक, बॅरीस्टर, वक्ते, पत्रकार, जलतज्ज्ञ, संपादक, स्वातंत्र्य सेनानी, संसदपटू, स्त्रियांचे कैवारी, मजूरमंत्री आणि भारत देशातील कोट्यवधी शोषित पददलितांचे उद्धारक सुद्धा होते. देशाच्या सामाजिक, आर्थिक, राजनैतिक, कायदा, शैक्षणिक, संस्कृतिक, विद्युत, जल, कृषी, स्त्रीउद्धार, कामगार, शेतकरी, औद्योगिकीकरण, दलितोद्धार अशा अनेक क्षेत्रात अतुलनिय योगदानामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आधुनिक भारताचे जनक असेही संबोधिले जाते. इ.स. २०१२ मध्ये झालेल्या सर्वात महान भारतीय (The Greatest Indian) या भारताच्या आंतराराष्ट्रीय सर्वेक्षणात स्वातंत्र्यानंतर सर्वात महान भारतीय म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विजयी घोषित झालेले आहेत. कोलंबिया विद्यापीठाने जगातल्या शिर्ष १०० विद्वानांची यादी तयार तयार केली त्यात त्यांनी प्रथम स्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ठेवून त्यांना जगातला नंबर १ महाविद्वान म्हणून त्यांचा गौरव केला. इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठाने गेल्या १० हजार वर्षांमधील जगातल्या सर्वांत प्रभावशाली १०० विश्वमानवांची यादी प्रकाशित केली, त्यात चौथ्या स्थानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर तर प्रथम स्थानावर बुद्धांचे नाव होते. प्रचंड कुशाग्र बुद्धीमत्ता,...

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर : एक अष्टपैलू विचारवंत

दिनांक, १४ एप्रिल २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकरयांचे विचार आणि त्यांनी मांडलेली तत्त्वे कालातीत आहेत. त्यांनी केलेले चिंतन आणि त्यांची मूलभूत विचारदृष्टी आजही अवलंबण्यासारखी आहे. आज १४ एप्रिल रोजी त्यांची १३१ वी जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या विविध विषयांवरील चिंतनावर केलेला हा दृष्टिक्षेप... डॉ. बाबासाहेब आंबेडकर केवळ जातिव्यवस्थेच्या विरोधातच लढत होते असे नव्हे, किंवा ते केवळ विशिष्ट एका समाजाच्या विकासाचाच केवळ विचार करत होते असेही नव्हे. त्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्याचेही भान होते. बाबासाहेबांनी भारतातील सर्व समाजांचा आणि सर्वप्रथम देशहिताचाच विचार केलेला आहे. डॉ . बाबासाहेब आंबेडकरांनी कधीच‘ दलित’ या घटकापूरता मर्यादित आणि संकूचित विचार केला नाही. भारताच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि शैक्षणीक विकासाची‘ ब्लू प्रिंट ’ त्यांनी अ गोदरच तयार करुन ठेवली होती. डॉ . बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तीमत्व केवळ आजचा विचार करणारे नव्हते ते आजच्यासह उद्याचाही विचार करायचे. या दे शा ला एका वेगळया उंचीवर नेवून ठेवण्याचे सामर्थ्य त्यांच्यामध्ये होते . पण वेळोवेळी त्यांना हिंदू विरोधी विशेषणे लावून त्यांचा राजकीय पराभव केला गेला. यासाठी अडाणी आणि धर्मभोळया जनतेचा त्यांच्या विरोधात वापर केला गेला. भारतीय धार्मिक आणि सांस्कृतीक वैभवाचे डॉ . आंबेडकर हेच विरोधक आहेत असा भास कायम ठेवला गेला आणि त्यांच्या विकासाच्या‘ ब्लू प्रिंट’ ला सातत्याने विरोध होत गेला. आंबेडकरांनी महिला सबलीकरण, शिक्षण, अंधश्रद्धा , शेती आणि शेतीपूरक उद्योगधंदे, पाण्याचे नियोजन, विद्युत उर्जा, धरणे , राजकीय किंवा प्रशासकीय व्यवस्था आणि आर्थिक नियोजन यासारख्या विविध विषयांवर आपले विचार मांडून ठेवलेले आहेत. आजच्या या ले...