आजच्या बातम्या लोकमत

  1. "शिवसेना आमचीच म्हणणाऱ्यांनी जाहिरातीत पंतप्रधान आणि स्वत:चा फोटो टाकला, पण...", अजित पवारांनी शिंदेंना डिवचलं
  2. ‘ये हाथ हमको दे दे ठाकूर’; शार्दुलची सलग तीन कसोटींत अर्धशतके
  3. "४० जणांनी १०५ आमदारांच्या नेत्याचं मातेरं...", संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, "आज कान दुखतोय, उद्या...!"


Download: आजच्या बातम्या लोकमत
Size: 34.7 MB

"शिवसेना आमचीच म्हणणाऱ्यांनी जाहिरातीत पंतप्रधान आणि स्वत:चा फोटो टाकला, पण...", अजित पवारांनी शिंदेंना डिवचलं

‘राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’ अशी जाहीरात शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रसिद्ध केली आहे. राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची आकडेवारी एका सर्वेक्षणाच्या आधारे जाहीर करून शिंदे यांनी फडणवीस यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असल्याचं बोललं जात आहे. या जाहिरातीवर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार म्हणाले, शिंदे साहेब किंवा हे जाहिरात देणारे इतक्या लवकर कसे काय बाळासाहेब ठाकरे यांना विसरले मला काय कळलं नाही. मुळातच हा पक्ष त्यांनी स्वतःकडे का घेतला? कारण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आहोत, आनंद दिघे यांच्या विचारांचे आहोत, असं म्हणत त्यांनी पक्ष स्वतःकडे खेचून घेतला. परंतु त्या जाहिरातीवर कुठे आनंद दिघेंचा फोटो दिसेना, कुठं बाळासाहेबांचा फोटो दिसेना. मसाबा गुप्ताशी घटस्फोटानंतर मधू मंटेनाने केलं दुसरं लग्न, पत्नीबरोबरचे फोटो पाहून नीना गुप्तांची कमेंट, म्हणाल्या… अजित पवार म्हणाले, अशा प्रकारच्या जाहिराती मी पाहिल्या आहेत. पण हा वेगळा प्रकार आहे. त्यांनी स्वतःच ठरवून सर्वेक्षण केलं आणि प्रसिद्ध केलं. कुणी सर्वेक्षण केलं, कुणी सांगितलं किती टक्के लोकांचा कौल आहे, याची कसलीच माहिती देण्यात आली नाही. साधारणपणे एक्झिट पोल येतात, परंतु ते कोणी केलेत ते सांगितलं जातं. तसा हा सर्व्हे कोणी केला आहे, याची माहिती दिली जाते. परंतु अशा प्रकाची सर्वेक्षणाची जाहिर...

‘ये हाथ हमको दे दे ठाकूर’; शार्दुलची सलग तीन कसोटींत अर्धशतके

आजच्या खेळीदरम्यान पॅट कमिन्सचा चेंडू दोनदा त्याच्या हातावर आदळला. त्यावर उपचार घेत त्याने आर्मपॅड बांधले. आग ओकणाऱ्या वेगवान चेंडूंचा सामना करीत त्याने अजिंक्यसोबत शतकी भागीदारी केली आणि भारताला फॉलोऑनच्या नामुष्कीतून बाहेर काढले. रहाणे बाद झाल्यानंतरही तो डगमगला नाही. त्याची फटकेबाजी पाहताना २०२१ ला इंग्लंडविरुद्ध खेळलेला शार्दुल पुन्हा दृष्टीस पडला. ब्रिस्बेन असो वा ओव्हल, शार्दुलच्या समर्पित वृत्तीत बदल झालेला नाही. ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज बाद केल्यानंतर ५१ धावांचे योगदान देणाऱ्या शार्दुलने सामन्यात स्वत:च्या कामगिरीचा ठसा उमटवीत आपली निवड सार्थ ठरविली. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाच्या तोंडून अलगद निघाले असावे- ‘ये हाथ हमको दे दे ठाकूर..!’ Web Title: shardul thakur innings in wtc final 2023 Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

"४० जणांनी १०५ आमदारांच्या नेत्याचं मातेरं...", संजय राऊतांचा खोचक टोला; म्हणाले, "आज कान दुखतोय, उद्या...!"

गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रात एका जाहिरातीमुळे राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त लोकांची पसंती असल्याचं एका सर्व्हेमधून समोर आल्याचा दावा करणारी जाहिरात प्रकाशित झाली होती. अनेक वर्तमानपत्रांमध्ये ही जाहिरात आल्यानंतर त्यावरून राजकीय दावे-प्रतिदावे सुरू झाले. या जाहिरातीशी शिंदे गटाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्टीकरण शंभूराज देसाई यांनी दिलं आहे. मात्र, दोन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचा तर्क यावरून मांडला जात आहे. डॅमेज कंट्रोल जाहिरात मंगळवारी ही जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आज शिंदे गटाकडून डॅमेज कंट्रोल जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही फोटो आहे. याशिवाय शिंदे गटातील सर्व मंत्र्यांचेही फोटो यात आहेत. त्याचबरोबर सर्वात वर एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो असून दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांचे फोटो आहेत. दरम्यान, या जाहिरातीत मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला स्वतंत्रपणे मिळालेला कौल न दर्शवता एकत्रितपणे २९ टक्के जनतेचा कौल मिळाल्याचं नमूद केलं आहे. “जो बूंद से गई, वो हौद से नहीं आएगी” दरम्यान, या जाहिरात नाट्यावर राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत असताना त्यासंदर्भार ठाकरे गटाचे प्रवक्ते आणि खासदार “देवेंद्र फडणवीसांच्या कानदुखीचं कारण खरं आहे. महाराष्ट्रात सध्या वाहत असलेलं वारं कुणाच्या कानात शिरलं तर कान दुखतो. १०५ आमदारांच्या नेत्याचं या ४० जणांनी मातेरं आणि पोतेरं केलं आहे. त्यामुळे आज कान दुखणार. उद्या बऱ्याच ...