अभंग वाणी

  1. तुकयाची अभंग वाणी. मच्छिंद्र माळी औरंगाबाद . – mali9437net समर्थ दर्शन .
  2. अमंगळ वाणी
  3. रामदासांचे अभंग
  4. वदवावी वाणी माझी


Download: अभंग वाणी
Size: 13.79 MB

तुकयाची अभंग वाणी. मच्छिंद्र माळी औरंगाबाद . – mali9437net समर्थ दर्शन .

*🙏रामकृष्णहरी🐚🚩* *🚩🐚अभंगचिंतन🐚🚩* *चाले हें शरीर कोणाचिये सत्ते !* *कोण बोलवितें हरीविण !!१!!* *देखवी ऐकवी एक नारायण !* *तयाचें भजन चुकों नये !!ध्रु!!* *मानसाची देव चालवी अहंता !* *मी चि एक कर्त्ता म्हणों नये !!2!!* *वृक्षाचीं हीं पानें हाले त्याची सत्ता !* *राहिली अहंता मग कोठें !!3!!* *तुका म्हणे विठो भरला सबाहीं !* *तया उणें कांहीं चराचरीं!!4!!* 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 *श्रीमंत जगदगुरु तुकोबाराय* 🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸 *🌸निरुपण 🙏🌹🌹🌹* प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला *जगद्गुरू तुकोबाराय* यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे ! *या अभंगात तुकोबाराय म्हणतात ,* *चाले हे शरीर कोणाचिया सत्ते!* *कोण बोलाविते हरी विण!!* *हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते? वृक्षाचेही पाने हाले ज्यांची!* सत्ता देवाच्या सत्ते शिवाय काहीही चालत नाही चालणारा बोलावणारा तोच भगवान परमात्मा विठ्ठल आहे. देव सर्व ठिकाणी भरलेला आहे. *तुज आहे तुज पाशी! परी तु जागा विसरलासी!!* तुझ्या हदय मंदिरी देव ठासून भरलेला आहे. त्यांची जाणिव आपल्याला झाली नाही . म्हणून *हरी या हो आता मंदिरी! दुसरे नाही येथे कोणी!!* हदयात देव आहे पण त्या देवाला आपलेसे करून घेण्यासाठी घर रिकामे झाले पाहिजे. कारण आपुला देह मलीन आहे . *काम क्रोध बंदिखानी! तुका म्हणे दिले दोन्ही!!* मी माझ्या चित्तातून ठरवले आहे कि पंढरपूर हे माझे माहेर आहे . पांडूरंग माझा मायबाप कृपावंत आहे .त्याला मी हदयात कोंडून घेतले आहे हदयात कोंडून घेण्यासाठी आपण काम क्रोध मद मत्सर अहंकार दूर करून देवाला हदयात स्थान दिले पाहिजे! कारण त्यांच्या शिवाय आपल्याला कोणी नाही . तो आहे म्हणून आपण आहोत त्यांच्या सत्तेवर हे सारे जग चालले आहे! *तो भगवान परमात्मा आपल्याला तारणारा आहे त...

अमंगळ वाणी

अमंगळ वाणी – अमंगळ वाणी । नये ऐकों ते कानी ॥१॥ जो हे दूषी हरीची कथा । त्यासि क्षयरोगव्यथा ॥ध्रु.॥ याति वर्ण श्रेष्ठ । परि तो चांडाळ पापिष्ठ ॥२॥ तुका म्हणे पाप । माय नावडे ज्या बाप ॥३॥ अर्थ अमंगळ वाणी कानानि कधीही एकु नये .जो हरिकथेचा द्वेष करतो, त्याला क्षयरोगाची व्याधि होते .असा पुरुष उच्च जातीचा असला तरी तो पापी चांडाळ समजावा .तुकाराम महाराज म्हणतात, तो मनुष्य म्हणजे साक्षात पाप आहे, त्याला स्वतःचे मायबापही आवडत नाही . अभंग विडिओ स्वरूपात पहा . अमंगळ वाणी – संत तुकाराम अभंग संत ज्ञानेश्वर अँप डाउनलोड Post navigation

रामदासांचे अभंग

अभंग [ ] अभंग १ समुदाय काय सांगों श्रीरामाचा l ‌अंतरी कामाचा लेश नाही लेश नाही तया बंधु भरतासी l‌ सर्वही राज्यासी त्यागियेले त्यागियेले अन्न केले उपोषण ‌‌l धन्य लक्ष्मण ब्रह्मचारी ब्रह्मचारी धन्य मारुती सेवक‌ lश्रीरामी सार्थक जन्म केला जन्म केला धन्य वाल्मीकी ऋषीने lधन्य ती वचने भविष्याची भविष्य पाहता धन्य बिभीषण राघवी शरण सर्व भावे सर्व भावे सर्व शरण वानर‌‌ धन्य ते अवतार विबुधांचे विबुधां मंडण राम सर्व गुण‌‌ ‍‌‌अनन्य शरण रामदास भावार्थ-- या अभंगात संत रामदास श्रीरामांच्या निकटवर्तीय समुदाया विषयी बोलत आहेत.राम जेष्ठ पुत्र असूनही त्यांना राज्याधिकार नाकारला जातो हा मोठा अन्याय आहे असे भरताला वाटते.व तो राज्य पदाचा त्याग करतो. असा निष्काम भरत, राजवाड्यातील सर्व सुखांचा ,पत्नीचा त्याग करुन रामांबरोबर वनवासात जाणारा व १४वर्षे अन्नत्याग करून उपोषण करणारा लक्ष्मण,सेवेसाठी सदैव तत्पर असणारा व जन्म सार्थकी लावणारा मारुती, भविष्याचा वेध घेऊन रामचरित्र रचणारे प्रतिभाशाली कवी वाल्मिकी ,भविष्यावर श्रध्दा ठेवून राघवाला शरण जाणारा रावणबंधू बिभिषण,सर्वभावे रामाला शरण जाणारी वानरसेना,ह्या सर्व ईश्र्वराच्या विभुती असून मी त्यांना अनन्य भावे शरण जातो असे संत रामदास म्हणतात. अभंग २ . काळ जातो क्षणक्षणा ‌ मूळ येईल मरणा‌ कांहीं धावाधाव करी ,जंव तो आहे काळ दूरी ‌ मायाजाळी गूंतले मन, परि हे दुःखासी कारण सत्य वाटते सकळ, परि हे जाता नाही वेळ रामीरामदास म्हणे, आता सावधान होणें. भावार्थ ---काळ प्रत्येक क्षणी पुढे जात आ मूळ केंव्हा येईल हे सांगता येत नाही.जोवर काळ दूर आहे तोवरच प्रयत्न केले पाहिजेत.संसाराचे मायाजाल हेच दुःखाचे कारण आहे.संसार सत्य वाटत असला तरी तो क्षणभंगूर आहे.रामदास संसाराच्या अनित...

वदवावी वाणी माझी

वदवावी वाणी माझी – वदवावी वाणी माझी कृपावंता । वागपुष्पे संतां समर्पीशी ॥१॥ सर्वसंकटाचा तुम्हां परिहार । घालावा म्यां भार पांडुरंगा ॥ध्रु.॥ एकसरें चिंत्त ठेवूनियां पायीं । जालों उतराई होतों तेणें ॥२॥ तुका म्हणे येथें जालें अवसान । काया वाचा मन वेचूनियां ॥३॥ अर्थ देवा तुम्ही माझी वाणी अशी वदावा म्हणजे माझ्या वाणीतून असे शब्द बाहेर यावे की जेणेकरून तुमचे स्तुती रुपी शब्दपुष्पे संतांच्या चरणांवर समर्पित व्हावी .हे पांडुरंगा माझ्या सर्व संकटाचा भार मी तुमच्यावर घालावा आणि तुम्ही त्याचा परिहार करावा. देवा तुमच्या पायी मी माझे चित्त ठेवून निवांत झालो आणि तुम्ही केलेल्या कृपाशीर्वादातून मी उतराई झालो .तुकाराम महाराज म्हणतात हे देवा काय वाचा मन मी तुमच्या चरणी ठेवले व आता माझे कर्तव्य संपले आहे. अभंग विडिओ स्वरूपात पहा .