बाबासाहेब आंबेडकर फोटो 2023

  1. Ambedkar Jayanti 2023 : तब्बल 10,132 फोटो वापरून घटनाकाराला केलं अभिवादन, पाहा Video
  2. Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या कामाला आजची पिढीही करेल सलाम, त्यांचे 9 महत्वाचे निर्णय
  3. गुणरत्न सदावर्तेंना झालंय काय? नथुराम गोडसे यांचा फोटो आंबेडकर, शिवरायांसोबत लावला
  4. Bhim Jayanti 2023 Marathi Wishes: भीम जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस
  5. Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 10 अनमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य
  6. मुर्टी ग्रामपंचायतीत लटकवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पूजन


Download: बाबासाहेब आंबेडकर फोटो 2023
Size: 58.13 MB

Ambedkar Jayanti 2023 : तब्बल 10,132 फोटो वापरून घटनाकाराला केलं अभिवादन, पाहा Video

अनुराग सुतकर, प्रतिनिधी सोलापूर 14 एप्रिल : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार स्पर्श रंग कला परिवाराचा नावाजलेला कलाकार विपुल मिरजकर यांनी सुद्धा महामानवाला अनोख्या पद्धतीची आदरांजली वाहिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात जास्त वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर अशी विपूलची ओळख आहे. महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीला अनोख्या पद्धतीनं तो आदरांजली वाहतो. त्यानं यंदा बाबासाहेबांचे 10, 132 फोटो वापरून बाबासाहेबांचे पोट्रेट बनवलं आहे. • Solapur News: गोळ्या बिस्कीटं विकून मुलांना इंजिनिअर, पोलीस बनवलं, आता 'आम्मा' निघाली हजला VIDEO • Siddheshwar Sugar Factory : अवघ्या 6 सेकंदात 'सिद्धेश्वर'ची चिमणी जमीनदोस्त, सोलापूरमधल्या वादावर अखेर 'माती' VIDEO • Solapur News : सोलापुरात भाजप-शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; शिंदे गटाचा इशारा • Solapur News: आता बिनधास्त प्या समुद्राचं पाणी, सोलापूरच्या संशोधकांनी बनवलं अनोखं यंत्र, Video • महाराष्ट्रात या ठिकाणी आहे पाकिस्तानातील देवीचे मंदिर, 126 वर्षांपूर्वी झाली होती प्रतिष्ठापना, PHOTOS • BJP Shivsena : वर्षभरातच भाजप-शिवसेनेत खटके, कल्याणनंतर आता नव्या वादाचा खडा! • Siddheshwar chimney : 'सिद्धेश्वर'ची चिमणी का पाडली? 7 वर्षांचा आहे राजकीय इतिहास; पाहा PHOTO • Ashadhi Wari 2023: माऊलींच्या पालखीत 2000 आयटी वारकरी, दरवर्षी येतात, कारण ऐकून तुम्हीही व्हाल सहभागी, Video • Solapur News: सोलापूरहून अजमेर प्रवास झाला सोपा, रेल्वेकडून विशेष गाडी • Solapur News : वारीला जाऊया लालपरीने, इतक्या गाड्या आहेत सज्ज, संपूर्ण वेळापत्रक VIDEO • Solapur News : घरात पेस्ट कंट्रोल करताना काय काळजी घ्यावी? तज्ज्ञांनी दिल्या महत्त्वाच्या टिप्स, Video स्पर्श रंग कला परिवा...

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या या कामाला आजची पिढीही करेल सलाम, त्यांचे 9 महत्वाचे निर्णय

BR Ambedkar Birth Anniversary 2023 : डॉ. बाबासाहेब यांची जयंती 14 एप्रिलला जगभर मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यांनी अस्पृशांना त्यांचे हक्क देण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांनी सामाजिक आणि राजकीय निर्णय घेतल्याने आज आपण आपल्या हक्कांविषयी जागरूक आहोत. स्वातंत्र्य, समता आणि बंधूत्व या तीन महत्वाच्या मुल्यांचा देशाची घटना लिहीताना विचार केला. हजारो वर्षांपासून अज्ञान आणि अंधारात आयुष्य जगणाऱ्या पददलितांना मानसिक आणि आर्थिक गुलामगिरी मुक्त केले. या महामानवाने देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळात कायदामंत्री असताना घेतलेल्या निर्णयाचे आपल्यावर काय परिणाम झाले आहेत ते पाहूया… 1 ) भारतीय श्रम संमेलनाच्या 7 व्या सत्रात डॉ. बाबासाहेब यांनी कामाच्या तासांची संख्या 14 तासांवरून 8 तासांवर केली. जर ते नसते तर आपला कामाचे तास सकाळी 9 ते रात्री 11 पर्यंत असते. 2 ) साल 1955 मध्ये डॉ.आंबेडकर यांनी योग्य प्रशासन चालण्यासाठी मध्य प्रदेश आणि बिहार या दोन राज्यांचे विभाजन करण्याची शिफरस केली. त्यानंतर 45 वर्षांनी दोन राज्यांचे विभाजन झाले. ज्यामुळे पुढे झारखंड, छत्तीसगड ही छोटी राज्य निर्माण झाली. 3 ) साल 1935 मध्ये भारतीय रिझर्व्ह बॅंकेची स्थापना होण्यात आंबडेकर यांचे योगदान आणि दूरदृष्टी होती. त्यांनी ‘दि प्रॉब्लेम ऑफ रूपी – ईट्स ओरिजिन एंड सॉल्यूशन’ या ग्रंथात आरबीआयच्या स्थापने संदर्भात सखोल विवेचन केले आहे. 4 ) डॉ. आंबेडकर यांनी भारतात विशाल धरणे बांधण्यासाठी तंत्रज्ञान यावे यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्यामुळे दामोदर, हिराकुंड आणि सोन नदी बंधारा प्रकल्पाची स्थापना झाली. 5 ) कामगार किंवा नोकरी करणाऱ्या स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ. बाबासाह...

गुणरत्न सदावर्तेंना झालंय काय? नथुराम गोडसे यांचा फोटो आंबेडकर, शिवरायांसोबत लावला

Gunratna Sadavarte Controversy : एसटी कामगारांचे नेते गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte)आपल्या वादग्रस्त विधानं आणि कृतींसाठी प्रसिद्ध आहेत. गुणरत्न सदावर्ते आता पुन्हा एकदा त्यांच्या अशाच एका वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत आले आहेत. गुणरत्न सदावर्ते यांनी नथुराम गोडसे यांचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांच्यासोबत लावला आहे. सदावर्तेंनी चक्क नथुराम गोडसेच्या (nathuram godse) फोटोला पुष्पहार अर्पण केला आहे. नथुरामच्या फोटोला हार, अखंड भारताच्या घोषणा गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महापुरुषांच्या फोटोंसोबत महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे याचा फोटो लावल्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या शेजारी नथुराम गोडसे यांचा फोटो लावून पुष्पहार अर्पण केला. नथुरामच्या फोटोला हार घालून त्यांनी अखंड भारताचा विजय असो अशी घोषणाबाजीही केली. ही स्टंटबाजी झाल्यानंतर सदावर्तेंनी नथुराम गोडसेचा फोटो लावण्याचं समर्थन केले. नथुराम पळून गेले नाहीत - गुणरत्न सदावर्ते नथुराम गोडसे यांच्यासोबत फाशीची ट्रायल झाली होती. नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता असं म्हणत मला मत मांडण्याचा अधिकार असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले. मी संविधानाचा अभ्यासक आहे. नथुराम गोडसे यांची जी ट्रायल झाली होती त्यामध्ये नथुराम यांच्यासोबत न्याय झाला नव्हता. नथुराम पळून गेले नाहीत. त्यांनी ट्रायलचा समना केला. पण नथुराम यांना त्यावेळेस न्याय मिळाला नाही”, अशी भूमिका सदावर्ते यांनी मांडली. मी संविधानामध्ये PhD के...

Bhim Jayanti 2023 Marathi Wishes: भीम जयंतीच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस

भारतामध्ये दलित बौद्ध चळवळीचे प्रेरणाकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्मदिवस भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 एप्रिल दिवशी आंबेडकर जयंती साजरी केली जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे घटनातज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक होते. यंदा त्याच्या जन्मदिनाचं औचित्य साधत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासोबतच त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली भीम जयंतीच्या शुभेच्छा देणारी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, Quotes सोशल मीडीयामध्ये WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. आंबेडकर जयंती दिवशी भीम अनुयायी दीक्षाभूमी आणि चैत्यभूमी वर एकत्र जमतात. प्रार्थना करतात. या दिवसाच्या निमित्ताने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते. त्याच्या माध्यमातून बाबासाहेबांचे विचार समाजात रूजवले जातात. नक्की वाचा: आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा भीम जयंती । File Image आयुष्य छान आहे, थोडे लहान आहे. पण जयभीम म्हणून जन्म घेतला यातच माझी शान आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दलित समाजाच्या राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्यासोबतच आंबेडकरांनी आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन बाबासाहेबांचा गौरव करण्यात आला आहे.

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे हे 10 अनमोल विचार बदलतील तुमचं आयुष्य

मुंबई, 12 एप्रिल : येत्या 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती आहे. आंबेडकर जयंती देशातील सरकारी कार्यालयांमध्ये आणि सर्वसामान्य लोक आपापल्या पद्धतीने साजरी करतात. बाबासाहेबांना प्राथमिक शिक्षण मिळवण्यातही अडचणी आल्या, पण या सर्व परिस्थितीला न जुमानता आंबेडकरांनी केवळ उच्च शिक्षण घेतले नाही तर ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्रीही झाले. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी वेचले होते. डॉ. भीमराव आंबेडकरांनी समाजातील दीनदलितांना समानता मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. आंबेडकरांच्या विचारांनी लाखो तरुणांना प्रेरणा दिली आणि त्यांच्या विचारांचे अनुसरण केल्याने बाबासाहेब आंबेडकर यांचे 10 अमूल्य विचार 1. मला तो धर्म आवडतो जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता शिकवतो. 2. मी एखाद्या समाजाच्या प्रगतीचे मापन त्यानुसार करतो जितकी तिथल्या महिलांनी प्रगती केली असेल. 3. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत. 4. शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि उत्साही व्हा. 5. धर्म माणसासाठी आहे आणि माणूस धर्मासाठी नाही. 6. माणूस नश्वर आहे, त्याचप्रमाणे विचार देखील नश्वर आहेत. एखाद्या कल्पनेच्या प्रसाराची गरज असते, जसे वनस्पतीला पाण्याची गरज असते, अन्यथा कोमेजून मरते. 7. महापुरुष हा प्रतिष्ठित माणसापेक्षा वेगळा असा असतो की, तो समाजाचा सेवक होण्यास तयार असतो. 8. समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ती एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारली पाहिजे. 9. बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम ध्येय असले पाहिजे. 10. समानता ही काल्पनिक गोष्ट असू शकते, परंतु तरीही ते एक नियमन तत्त्व म्हणून स्वीकारले पाहिजे.

मुर्टी ग्रामपंचायतीत लटकवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोचे पूजन

बारामती, 17 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल 2023 रोजी देशभरासर जगात 132 वी जयंती साजरी करण्यात आली. आंबेडकर जयंतीनिमित्त कोणी पुतळ्यां पुढे नतमस्तक झाले, तर कोणी फोटो पुढे. मात्र बारामती तालुक्यातील मुर्टी ग्रामपंचायतीमध्ये 14 एप्रिल 2023 रोजी वेगळेच चित्र पहायला मिळाले. मुर्टी ग्रामपंचायत कार्यालयात विविध महापुरुषांची फोटो अडकवलेले आहेत. ग्रामपंचायत कार्यलयाच्या भिंती वरच लटकवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोलाच ग्रामपंचायतीच्या वतीने पूजन केल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी गावातील महिला देखील उपस्थित होत्या. त्या महिलांनी तर चक्क टेबलचीच पुजा केली. गावचे उपसरपंच आणि समस्त गावातील प्रतिष्ठीत ग्रामस्थांनी देखिल टेबलवर चडून पुजा केल्याने, नक्की जयंती टेबलची की डॉ. बाबासाहेबांची? याचा संभ्रम मुर्टी ग्रामस्थांमध्ये निर्माण झाला.