बालकवी यांच्या कविता

  1. निसर्गकवी बालकवी (Balkavi)
  2. बालकवींची औदुंबर कविता : अभिवाचन
  3. बालकवी
  4. त्र्यंबक बापूजी ठोंबरे
  5. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे Balkavi Information in Marathi इनमराठी


Download: बालकवी यांच्या कविता
Size: 41.70 MB

निसर्गकवी बालकवी (Balkavi)

बालकवी यांची शंभरावी पुण्यतिथी झाली. बालकवींचा मृत्यू तिशीच्या आत झाला. बालकवी यांचे अपघाती निधन 17 एप्रिल 1918 या दिवशी झाले. त्यांच्या पत्नी पार्वतीबाई यांच्या आत्मचरित्रात तशी नोंद आहे. काहींनी तो दिनांक 5 मे असा नोंदला आहे. तिथी मात्र चैत्र वद्य नवमी हीच आहे. बालकवी यांचे नाव त्र्यंबक बापूजी ठोमरे. त्यांचे मूळ आडनाव ठोंबरे असे होते. ते त्यांनी आणि त्यांच्या बंधूंनी उच्यारसौकर्यासाठी ठोमरे असे करून घेतले. त्यांचा जन्म खानदेशात धरणगाव येथे 13 ऑगस्ट 1890 या दिवशी झाला. त्यांच्या आईचे माहेर धरणगाव. ठोमरे कुटुंब मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे. बालकवी हे भावंडांतील मधील. त्यांची मोठी बहीण मनुताई (जिजी) आणि भाऊ अमृत. त्यांच्याहून धाकटी बहीण कोकिला, धाकटा भाऊ भास्कर. त्यांचे वडील पोलिस खात्यातील नोकरीसाठी खानदेशात गेले. वडिलांची बदली वारंवार होत असे आणि कुटुंब बदलीच्या गावी जात असे. बालकवी यांच्या आई गोदुताईयांना मराठी वाचता येत असे. त्या पोथ्या वाचत असत. गोदुताईंचीआई दळताना भक्तीपर ओव्या स्वत: रचून म्हणत असे. बालकवी यांच्या मोठ्या बहिणीने-जिजीनेही ‘पांडवप्रताप’, ‘रामविजय’, ‘भक्तलीलामृत’ हौसेने वाचून काढले होते. जिजीचे शिक्षक पती प्रल्हादपंत भावे यांनी तिला ‘नवनीत’ वाचण्यास दिले. ते तिला इतके आवडले, की तिने त्याची पारायणे केली. बालकवी यांनीही जिजीबरोबर नवनीत वाचले. मोरोपंतांचे ‘आर्याभारत’ वाचले. बालकवींनी जिजीबरोबर भेंड्या लावण्यासाठी कविता पाठ केल्या. त्यांना आद्य अक्षराच्या कविता न आठवल्यास ते स्वत: ऐनवेळी कविता रचून म्हणत. बालकवी कविता लहान वयात म्हणजे बाराव्या-तेराव्या वर्षी लिहू लागले. त्यांना लहानपणी विटीदांडू, आट्यापाट्या या खेळांची आवड नव्हती. त्यांना मित्रांबरोबर...

बालकवींची औदुंबर कविता : अभिवाचन

त्र्यंबक बापूजी ठोंबरे अर्थात बालकवी यांना निसर्गकवी असे म्हटले जाते. त्यांच्या बहुतांश रचना त्याची साक्ष देतात. अवघ्या आठ ओळींत आपल्यापुढे एक मनोहर निसर्गचित्र उभी करणारी आणि आपल्याला एका वेगळ्याच भावविश्वात घेऊन जाणारी कविता म्हणजे ‘ औदुंबर.’ मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या विशेष उपक्रमाचा एक भाग म्हणून ही कविता आपल्यापुढे सादर केली आहे पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार अन् लेखिका स्वाती महाळंक यांनी... बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश निसर्गाचं अत्यंत सुंदर वर्णन आपल्या कवितांमधून करणारे कवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे ऊर्फ बालकवी. अत्यंत प्रसन्न आणि टवटवीत लेखन करणाऱ्या लेखिका-कवयित्री म्हणजे शांता शेळके. बालकवींची ‘फुलराणी’ ही कविता आणि शांताबाईंची ‘पैठणी’ ही कविता म्हणजे एक वेगळीच अनुभूती देणाऱ्या साहित्यकृती. मराठी राजभाषा दिनानिमित्त ‘जीवनलहरी’ आणि ‘जाईचा कुंज’ यांनंतरचा ‘विशाखा’ हा कुसुमाग्रजांचा तिसरा काव्यसंग्रह. औचित्य, संयम, विलक्षण जीवन, निसर्ग, राष्ट्र यावरील प्रेम यांतून कुसुमाग्रजांच्या कवितेचा प्रवाह खळखळत, वेगाने वाहत राहतो, याचा प्रत्यय ‘विशाखा’तील कवितांमधून पुन:पुन्हा येतो. आज, २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो

बालकवी

सूर्यकिरण सोनेरी हे, कौमुदि ही हसते आहे खुलली संध्या प्रेमाने, आनंदे गाते गाणे मेघ रंगले, चित्त दंगले, गान स्फुरले इकडे, तिकडे, चोहिकडे नीलनभी नक्षत्र कसे, डोकावुनि हे पाहतसे कुणास बघते ? मोदाला; मोद भेटला का त्याला ? तयामधे तो, सदैव वसतो, सुखे विहरतो इकडे, तिकडे, चोहिकडे वाहति निर्झर मंदगती, डोलति लतिका वृक्षतती पक्षी मनोहर कूजित रे, कोणाला गातात बरे ? कमल विकसले, भ्रमर गुंगले, डोलत वदले इकडे, तिकडे, चोहिकडे स्वार्थाच्या बाजारात, किती पामरे रडतात त्यांना मोद कसा मिळतो, सोडुनि स्वार्था तो जातो द्वेष संपला, मत्सर गेला, आता उरला इकडे, तिकडे, चोहिकडे गीत – बालकवी संगीत – पं. हृदयनाथ मंगेशकर

त्र्यंबक बापूजी ठोंबरे

बालकवींची ‘ फुलराणी ‘ ही नितांतसुंदर कविता मराठी भाषेतील काव्यसौंदर्याचे एक मनोहर शब्दशिल्प आहे. या कवितेतील कल्पकता, तिचे भाषावैभव, भावलाघव हे सगळे इतके मोहक आहे की, बालकवी म्हटल्यावर फुलराणीचीच आठवण व्हावी. हिरव्या हिरव्या गवताच्या मखमालीच्या गार गालिच्यावर फुलराणी खेळत होती. आईबरोबर झोपाळ्यावर बसून गाणी गावीत आणि आनंदात रमावे, हेच त्या अल्लड, अवखळ आणि अजाण मुलीचे जीवन होते. या तिच्या जीवनक्रमात एकदा खट्याळ वाऱ्याची एक झुळूक आली. फुलराणीच्या अजाण, अबोध मनात त्या वाऱ्याने एक विचाराची लहर सोडून दिली. संध्यासमयीचा रविकिरण फुलराणीला आवडला का? असे त्या वाऱ्याने मिश्कीलपणे हसत विचारल्यावर फुलराणीच्या मनात जणू प्रेमाचा कोमल अंकुर उमलला आणि ती लाजून चूर झाली. त्या संध्याकाळनंतरच्या रात्रीत सगळे जग झोपी गेले, पण बेचैन झालेली फुलराणी मात्र जागीच राहिली. रात्री रानातल्या वनदेवता प्रकट झाल्या, हासू-नाचू-बागडू लागल्या. सगळे रान वनदेवतांच्या आगमनामुळे प्रफुल्लित झाले. फुलराणी मात्र आपल्याच प्रेमस्वप्नात दंग होती. आकाशात कुणी कुणाशी प्रेमाचे चाळे करीत होते. आभाळातल्या प्रेमदेवता अवखळ वाऱ्याच्या संगतीत फिरत-फिरत अवनीवर आल्या आणि त्या देवतांनी म्हटले, हीच आमची फुलराणी! रात्र संपली, पहाट झाली. अनादि काळापासून अनंतापर्यंत चाललेली आकाशातील ग्रहताऱ्यांची शर्यत सूर्याच्या आगमनाची चाहूल लागताच दृष्टीआड झाली. पृथ्वी जणू धुक्याचे धूसर वस्त्र लेऊन प्रातःकालीन आनंदात रमली होती. फुलराणी मात्र आपल्याच विश्वात विहरत होती. तेवढ्यात उभ्या आकाशाचा जणू विवाहमंडप झाला. नित्य नवा भासणारा सूर्यप्रकाशाचा रुपेरी झोत दाही दिशांमधून आकार घेऊ लागला. प्रातःगान करणारे पक्षी रंगीबेरंगी पिसाऱ्यांचे अंगरखे घालून आकाश...

बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे Balkavi Information in Marathi इनमराठी

balkavi information in marathi बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे माहिती, आज आपण या लेखामध्ये बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांच्याविषयी संपूर्ण माहिती घेणार आहोत. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांना “बालकवी” म्हणून ओळखले जात होते आणि त्यांचा जन्म तसेच त्यांनी त्या वर्गामध्ये असतानाच श्रीधर महीपत यांच्या कविता देखील वाचल्या. महान निसर्ग आणि बालकवी म्हणून ओळखले जाणारे त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांनी आपल्या कवितेतून आनंद आणि निराशा या दोन्हीही गोष्टी नेहमीन व्यक्त केले आणि त्यांच्या काही लोकप्रिय कावितामधील त्यांचे नाव घेता तोंडामध्ये येणारी कविता म्हणजे ‘ आनंदी आनंद गडे इकडे तिकडे चोहीकडे. अश्या प्रकारे त्यांनी त्यांच्या कारकीर्दीमध्ये अनेक कविता लिहिल्या. balkavi information in marathi बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे – Balkavi Information in Marathi नाव त्र्यंबक बापुजी ठोंबरे टोपणनाव बालकवी जन्म १३ ऑगस्ट १८९० जन्म ठिकाण वडिलाचे नाव बापूराव देवराव ठोंबरे बालकवी यांच्याविषयी महत्वाची माहिती – balkavi thombare information in marathi बालकवी यांचा जन्म हा महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्यामधील धरणगाव या ठिकाणी १३ ऑगस्ट १८९० मध्ये झाला आणि त्यांच्या वडिलांचे नाव बापूराव देवराव ठोमरे असे होते आणि ते पोलीस खात्यामध्ये होते त्यामुळे त्याची बदली सतत होत होती परंतु त्यांची बदली जळगाव जिल्ह्यामध्येच होत असल्यामुळे बालकवी यांचे शिक्षण हे वेगवेगळ्या ठिकाणी झाले त्याच बरोबर त्यांचे लहानपण देखील वेगवेगळ्या ठिकाणी गेले. त्यांच्या वडिलांच्या बदल्या ह्या जळगाव जिल्ह्यातील बेटावद, जामनेर, एनडोल आणि काही इतर भागामध्ये झाल्या आणि म्हणून बालकवींना आपले लहानपण हे या गावांच्यामध्ये घालवावे लागले. त्र्यंबक...