बातम्या मराठी आजच्या

  1. वर्तमानपत्र वर मराठी निबंध


Download: बातम्या मराठी आजच्या
Size: 77.41 MB

वर्तमानपत्र वर मराठी निबंध

• • • • • वृत्तपत्रे म्हणजे लोकशाहीचा चौथा खांब आहे असे म्हटले जाते. आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे वृत्तपत्रांना महत्व फार आहे. देशात काय घडामोडी चालल्या आहेत, राजकारणात, सीमेवर काय घडते आहे, देशातील वेगवेगळ्या राज्यात काय काय घटना घडत आहेत, ह्याची घरबसल्या माहिती नागरिकांना वृत्तपत्रांमुळेच मिळते. वृत्तपत्रांचे संपादक निःपक्षपातीपणे आपले दृष्टिकोन मांडत असतात. त्यामुळे नागरिकांना एकुणच काय चालले आहे ह्याविषयी मत बनवणे सोपे जाते. माणूस हा समाजात राहाणारा प्राणी आहे. आसपास घडणा-या घटनांचा आपल्या जीवनावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, मध्यंतरी देवनार येथील कचराभूमीला आग लागली होती. त्यामुळे मुंबईच्या हवेचे प्रदूषण धोक्याच्या पातळीच्या वर गेले होते. तसेच २००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. अशा बातम्या मुंबईत राहाणा-या लोकांच्या जीवनावर थेट परिणाम करणा-या होत्या. मात्र दूर ठिकाणी ज्या गोष्टी घडतात त्यांचा आपल्या जीवनावर थेट परिणाम झाला नाही तरी काहीतरी परिणाम नक्कीच होतो. कारण आज जग वाहतुकीच्या जलद मार्गांनी तसेच इंटरनेट, मोबाईल इत्यादी साधनांमुळे पूर्वीपेक्षा खूप जवळ आले आहे. शिवाय जगाला काही फक्त राजकीय बातम्याच नको असतात. वृत्तपत्रामध्ये सांस्कृतिक घडामोडी, नैसर्गिक आपत्तीविषयक आणि पर्यावरणविषयक बातम्या येतात. चित्रपट, नाटके आणि पुस्तकांची परीक्षणे येतात. त्यामुळे काय पहावे किंवा काय वाचावे ह्या विषयी वाचकांना ज्ञान मिळते. तसेच जाहिराती हा वृत्तपत्रांचा खूप मोठा हिस्सा आहे. त्यातून वाचकांना शिक्षण, नोकरी, जागांची खरेदी-विक्री ह्याविषयी बरीच माहिती मिळते. तसेच त्यांचा उपयोग करून त्यांना आपल्या गरजा भागवताही येतात. आजकाल टीव्हीवर चोवीस तास ब...