बी न्यूज कोल्हापूर आजच्या बातम्या

  1. ठरलं! आता येणार 'दृश्यम ३', रिलीज डेटबाबत मोठी अपडेट समोर
  2. बँक मॅनेजरच्या पत्नीची 6व्या मजल्यावरून उडी, 2 वर्षांपूर्वी झालं लग्न, चिठ्ठीत लिहिलं...


Download: बी न्यूज कोल्हापूर आजच्या बातम्या
Size: 16.72 MB

ठरलं! आता येणार 'दृश्यम ३', रिलीज डेटबाबत मोठी अपडेट समोर

साऊथचे सुपरस्टार मोहनलाल आणि जीतू जोसेफ यांनी २०१३ मध्ये सर्वोत्तम क्राईम थ्रिलर चित्रपट ‘दृश्यम’ आणला होता. त्या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर हा चित्रपट बॉलिवूडमध्ये तयार झाला आणि त्यात अभिनेता अजय देवगणने प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाचे दोन्ही भाग तुफान हिट झाले. आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाबद्दल एक मोठी माहिती समोर आली आहे. ‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ या दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांच्या चांगलीच पसंती मिळाली. या चित्रपटाच्या कथेने प्रेक्षकांना खुर्चीत खिळवून ठेवलं. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर भरपूर गल्ला जमवला. वृत्तानुसार, या आगामी चित्रपटाची तयारी सुरू आहे. दाक्षिणात्य ‘दृश्यम’च्या निर्मात्यांनी तिसर्‍या भागासाठी हिंदी चित्रपटाच्या निर्मात्यांशी करार केला आहे. दिग्दर्शक अभिषेक पाठक आणि या चित्रपटाच्या लेखक टीमने ‘दृष्यम ३’साठी कथेतील ट्विस्ट्स तयार केले आहेत. ‘दृश्यम’ची हिंदी आणि मल्याळम टीम एकाच वेळी दोन्ही चित्रपटांचं शूटिंग करण्यासाठी आणि एकाच तारखेला संपूर्ण भारतात प्रदर्शित करण्यासाठी एकत्र काम करत आहे. त्यामुळे आता अभिनेते मोहनलाल पुन्हा मल्याळममधील गोर्ज कुट्टीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे, हेही वाचा : “त्याने आम्हाला…”, निशिकांत कामतच्या आठवणीत अजय देवगण आणि तब्बू भावूक याचबरोबर एकदा दोन्ही चित्रपटांची पटकथा फायनल झाल्यानंतर, तेलुगू, हिंदी आणि मल्याळम दृश्यमचे निर्माते तिन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाची एक तारीख ठरवून एकाच तारखेला हा चित्रपट प्रदर्शित करतील. हा चित्रपट २०२४ च्या अखेरीस प्रदर्शित होईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

बँक मॅनेजरच्या पत्नीची 6व्या मजल्यावरून उडी, 2 वर्षांपूर्वी झालं लग्न, चिठ्ठीत लिहिलं...

मुंबई, 14 जून : बँक मॅनेजरच्या पत्नीने सहाव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं आहे. महिलेचा आक्रोश ऐकून परिसरातले लोक इमारतीखाली जमा झाले, यानंतर त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये ही घटना घडली आहे. पोलिसांना घरामध्ये एक चिठ्ठीही सापडली आहे. आपल्यासाठी हे पाऊल उचलणं सोपं नव्हतं, असं तिने चिठ्ठीमध्ये लिहिलं आहे. सध्या पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. उज्जैनच्या नीलगंगा भागात मंगळवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या भागातली सगळ्यात उंच बिल्डिंग असलेल्या शिवांश एलिगेन्सच्या बी ब्लॉकच्या सहाव्या मजल्यावरून 30 वर्षांच्या महिलेने उडी मारली. महिला डोक्यावर पडल्यामुळे तिला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला. पडल्यानंतर महिलेचा आवाज ऐकताच बिल्डिंगचे रहिवासी खाली उतरले. बिल्डिंगचे रहिवासी आणि वॉचमनने महिलेला ऍम्ब्युलन्समध्ये टाकून हॉस्पिटलला घेऊन गेले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी तपास केला तेव्हा त्यांना घरात चिठ्ठी मिळाली. कौटुंबिक वादामुळे महिलेने आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. महिलेच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टनंतरच पुढची माहिती समोर येईल. मिळालेल्या माहितीनुसार महिलेचं माहेर इंदूरच्या देपालपूरमधील हातोद आहे. महिलेचा पती उज्जैन जिल्ह्याच्या घट्टिया भागातील युको बँकेत मॅनेजर आहे. सहाव्या मजल्यावरून उडी मारलेली शिल्पा खासगी नोकरी करत होती. घटनेनंतर महिलेच्या माहेरची माणसंही घटनास्थळी पोहोचली. महिलेच्या घरात एक चिठ्ठी सापडली आहे. 'माझ्यासाठी हे अजिबात सोपं नव्हतं. खूप प्रयत्न केला, तुम्हाला यामध्ये कुटुंबाला आणायची गरज नव्हती. माझी कोणाबद्दलही तक्रार नाही. तुम्हाला माझ्याबद्दल असेल तर मला माफ ...