गुरुचरित्र पारायण

  1. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केव्हा करावी.?
  2. गुरूचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी या प्रकारे संकल्प घ्यावा
  3. गुरुचरित्र विषयी माहिती
  4. श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती.
  5. श्री गुरुचरित्र पारायण नियम संपूर्ण माहिती गुरुचरित्र पारायण उद्यापन कसे आणि कोणत्या दिवशी करावे
  6. गुरुचरित्र पारायण कधी वाचावे?


Download: गुरुचरित्र पारायण
Size: 30.32 MB

गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात केव्हा करावी.?

स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळ्या पेजवर.. . मित्रांनो, भारतीयांच्या आयुष्यामध्ये गुरुचं स्थान हे सर्वोच्च मानलं जातं. त्यामुळं गुरुपौर्णिमेला भारतात विशेष महत्व आहे. आषाढ महिन्याची सुरुवात या दिवसाने होते. आपल्या भारतीय संस्कृतीत आई-वडीलांनंतर गुरुला विशेष स्थान देण्यात आलं आहे. गुरु हा आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करत असतो. याच गुरुचे आभार मानन्यासाठी भारतात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. दरवर्षी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्यातील काही लोक या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी समर्थांच्या गुरुचरित्र पारायणाचे वाचन सुद्धा करत असतात. परंतु मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि त्यासंबंधीचे कोणकोणते नियम आहेत याबद्दल संपूर्ण माहिती नसते आणि त्यामुळे त्यांना असा प्रश्न पडतो की गुरुचरित्र पारायण कसे करावे? कोण कोणी करावे?आणि जर स्त्रियांनी जर गुरुचरित्र पारायण केले तर चालेल का? अशा अनेक प्रश्न आपल्यातील बऱ्याच जणांना पडलेले असतात. त्यामुळे आपल्यातील अनेक लोक गुरुचरित्र पारायण करत नाहीत. तर मित्रांनो या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. मित्रांनो त्यामधील सर्वात पहिली गोष्ट म्हणजे स्त्रियांनी गुरुचरित्र पारायण याचे वाचन करावे की नाही तर मित्रांनो घरामध्ये असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने गुरुचरित्राचे पारायण केले तरीही चालते. आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला सात दिवस हे गुरुचरित्र पारायण करायचे आहे. आपल्यातील अनेक जण असे म्हणतात की गुरुचरित्र पारायण याचे वाचन तीन दिवसांमध्ये आम्ही करतो. तर मित्रांनो आपल्या शास्त्रानुसार हे चुकीचं मानलं गेलेलं आ...

गुरूचरित्र पारायण सुरु करण्यापूर्वी या प्रकारे संकल्प घ्यावा

श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ वेदांइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. गुरूचरित्र परायण करण्यापूर्वी संकल्प-पूर्ती पद्धत जाणून घ्या- श्रीमद्‍भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मनो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जंबुद्विपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिण तीरे शालिवाहनशके अमुकनाम संवत्सरे अमुकायने अमुकऋतो अमुकमासे अमुकपक्षे अमुकतिथौ अमुकवासरे अमुकदिवसनक्षत्रे विष्णुयोगे विष्णुकरणे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथं राशिस्थानास्थितेषु सत्सु शुभनामयोगे शुभकरणे एवंगुणविशेषणविशिष्टाया शुभपुण्यतिथौ मम आत्मनः श्रुतिस्मृतिपुराणोक्तफलप्राप्त्यर्थम् । अखण्डलक्ष्मीप्राप्त्यर्थम् सकलारिष्टशान्त्यर्थम् । श्रीपरमेश्वरश्रीपादश्रीवल्लभ श्रीसद्गुरुश्रीदत्तात्रेयदेवताप्रीत्यर्थम् । अद्य अमुकदिनमारभ्य सप्तदिनपर्यंन्तम् श्रीगुरुचरित्रपाठाख्यं कर्म करिष्ये । तत्रादौ निर्विघ्नतासिद्‍द्ध्यर्थम् । महागणपतिस्मरणचं करिष्ये ।

गुरुचरित्र माहिती , संकल्प व पारायण नियम गुरूचरित्र हे मराठीतील एक प्रभावशाली धार्मिक पुस्तक आहे. १५ व्या- १६ व्या शतकात श्री. सरस्वती गंगाधर स्वामींनी हे पुस्तक लिहीले. या पुस्तकात स्वामी नरसिंह सरस्वती यांचे चरीत्र, त्यांचे तत्वज्ञान, आणि त्यांच्याबद्दलच्या पौराणिक कथा आहेत। ग्रंथाची भाषा म्हणजे साधारणतः चौदाव्या शतकातील मराठी असावी. या पुस्तकात उर्दु आणि पर्शियन शब्द टाळून संस्कृत शब्द वापरलेले आहेत. गुरुचरित्र हिंदू लोकांत फार पवित्र ग्रंथ मानतात. सर्व दत्त भक्त या ग्रंथाचे मार्गशीर्ष महिन्यात येणार्‍या पौर्णिमेच्या आठ दिवस आधी पारायण करतात, आणि पौर्णिमेच्या दिवशी, उद्यापन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा दत्तजयंती मानली जाते. ह्या ग्रंथाला दत्त संप्रदायातील लोक पवित्र वेद समजतात, म्हणून या ग्रंथाचे पारायण कठोर नियमाने करावे. याचे नियम या ग्रंथातच दिलेले आहेत. हा ग्रंथ सात दिवसांच्या सप्ताहातच किंवा तीन दिवसातच पूर्ण करावा असा नियम आहे. गुरुचरित्रात एकूण ५२ अध्याय आहेत. शेवटचा अध्याय 'अवतरणिका' म्हणजे पहिल्या ५१ अध्यायांचे सार. सात दिवस पारायण पद्धत ७-१८-२८-३४-३७-४३-५१ तीन दिवस पारायण पद्धत २४-३७-५१ गुरुचरित्र - पारायण कसे करावे ? श्रीनृसिंह सरस्वतींचे अलौकिक चमत्कार सांगणारा हा विलक्षण प्रभावी ग्रंथ आहे. श्रीगुरूंच्या चरित्रासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्रीगुरुकृपासंपन्न, सिद्धानुभवी लेखक, असा योग जुळून आल्यामुळे या समग्र ग्रंथास सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्प-पूर्तीसाठी श्रीगुरुचरित्र-वाचनाची विवक्षित पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन, पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. "अंतःकरण असता पवित्र ...

गुरुचरित्र विषयी माहिती

सिद्ध व नामधारक याच्या संवादातून ‘गुरुचरित्र’ ग्रंथ उलगडत जातो. सिद्ध म्हणजे ‘श्रीनृसिंहसरस्वती’ व नामधारक म्हणजे ‘सरस्वती गंगाधर’, सांप्रदायाची दृढ श्रद्धा आहे. या संदर्भात एक पुरावा असा की, गंगाधराचा पुत्र सरस्वती प्रपंचाच त्याग करून मन:शांतीच्या शोधासाठी गाणगापूरच्या दिशेने निघाला. पाय थकल्यावर तो एका वृक्षाखाली निद्राधीन झाला, तेव्हा त्याला एका दिव्य तेजोमूर्तीचे दर्शन स्वप्नात घडले. तो जागा झाला व स्वप्नातील मूर्तीचे ध्यान करीत पुढे जाऊ लागला. सिद्धनाळ नामक जी मूर्ती त्याने स्वप्नात पाहिली होती तीच प्रत्यक्ष भेटली. नंतर तिने त्याला भीमा-अमरजा संगमावर आणून कथा सांगण्यास सुरुवात केली, ही घटना शके १४९०मध्ये घडली. याचाच अर्थ, तब्बल ११० वर्षांनी महाराज पुन्हा सिद्धाच्या रूपात अवतीर्ण झाले. भीमा-अमरजा संगमावरील एक महिन्याच्या वास्तव्यात सिद्ध व नामधारकांच्या संवादातून गुरुचरित्र लिहिले गेले. गुरुचरित्राचे एकुण ५२ तसेच काही ग्रंथात ५३ अध्यायात एकुण ७४९१ ओव्या आहेत. त्यांची विभागणी ‘ज्ञानकांड’, ‘कर्मकांड’ आणि ‘भक्तिकांड’ अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान-कर्म-भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरूचे मार्गदर्शनच कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केले आहे. दत्तावतार श्रीनृसिंहसरस्वती यांच्या प्रेरणेनेच ‘गुरुचरित्र’ लिहिले गेले. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो ‘वरदग्रंथ’ असून त्याला श्रीगुरूंनी ‘भक्तकामकल्पद्रुम’ असा वर देऊन ठेवलेला आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे याचे मौलिक मार्गदर्शन ‘गुरुचरित्रा’च्या माध्यमातून केले असल्याने या...

श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती.

श्रीगुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्रीगुरुचरित्राची महती, महत्त्व आणि पारायणासंबंधी सविस्तर माहिती. By December 16, 2020 06:36 PM 2020-12-16T18:36:28+5:30 2020-12-16T18:37:06+5:30 प.पू. टेंबेस्वामी महाराज सांगत असत, की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही, तरी गुरुचरित्रातील किमान पाच ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. केशवतनय लिहितात, दत्तगोरक्ष संवाद, सह्याद्री वर्णन, सह्याद्री महात्म्य, दत्तभार्गव संवाद इ. दत्त संप्रदायाचे मान्यताप्राप्त ग्रंथ असून या शिवाय दिव्य व दैवी परंपरेने चालत आलेल्या मूळ ग्रंथाचा शके १४८० च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच श्रीगुरुचरित्र. हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्तसांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिली आहे. वारकऱ्यांना जसे ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा हे ग्रंथ प्रिय, रामदासी पंथीयांना जसा दासबोध प्रिय, तसा दत्तभक्तांना श्रीगुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतीव प्रिय आहे. या ग्रंथाचे ५२ अध्याय असून ओवीसंख्या ७,४९१ इतकी आहे. काही ग्रंथात ५३ अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकाण्ड, कर्मकाण्ड, भक्तिकाण्ड यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे, याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपादश्रीवल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतिपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे. इतकेच नव्हे तर श्रीगुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरुपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे. याशिवाय व्रत वैकल्येही सांगितली आहेत. यात्रांची वर्णने केली आहेत. आचारधर्म शिकवला आहे. मूल्यांची रुजवण केली आहे....

श्री गुरुचरित्र पारायण नियम संपूर्ण माहिती गुरुचरित्र पारायण उद्यापन कसे आणि कोणत्या दिवशी करावे

नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपण दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण जर दत्तजयंतीनिमित्त असलेल्या सप्ता हाचे सात दिवसांत जर गुरुचरित्र पारायण करणार असेल श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे बावन्न अध्याय असून त्यातली ओवी संख्या सात हजार चारशे एक्क्यानव इतकी आहे काही ग्रंथांमध्ये त्रेपन्न अध्याय देखील आहे त्यांचे विभागणी केली आहे ज्ञानकांड कर्मकांड भक्तीकांड या तीन भागांमध्ये त्यांचे विभागणी केली आहे या तिन्ही उपासणांसाठी गुरूंचे मार्गदर्शन तर आवश्यकच आहे आणि याचे अतिशय सुंदर भाषित समजेल अशा भाषेतमध्ये गुरुचरित्र मध्ये वर्णन केलेले आहे या ग्रंथामध्ये पाचवी वल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कार देखील रसाळपणे सांगितले आहे इतकेच नव्हे तर श्रीगुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथा तर अतिशय सुबोध आणि प्रासादिक पणे या गुरुचरित्र ग्रंथांमध्ये सांगितले आहे याशिवाय व्रतवैकल्य ही कसे करावे हे सांगितले आहे आचारधर्म ही शिकवला आहे मूल्यांची रुजवण कशी करायची हेच सांगितले गेले आहे सर्व सामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्या साठी कसे आचरण ठेवायला हवे छान मार्गदर्शन या गुरुचरित्र मध्ये केलेले आहे हिरो का तुम्हाला कोणती उपासना जमले नाही तरी या गुरुचरित्रातील किमान पाच ओळी वाचल्या गेल्या पाहिजे याचा तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो तीन दिवसात दिवस यांचे पारायण हे देखील केली जाते तर यासाठी काही नियमांचे पालन करणे खूप गरजेचे आहे कारण या ग्रंथाचे वाचन करताना या ग्रंथाचे पावित्र्य जपणे हे खूप महत्त्वाचे आहे तर पावित्र्य जपण्यासाठी नक्की कोणते नियम आहेत हे आपण जाणून घेणार आहोत दत्तजयंतीनिमित्त जो सप्ताह साजरा केला जातो तर त्या सप्ताहामध्ये सात दिवसांचे पारायण जे आहे ते कशा प्रकारे करा...

गुरुचरित्र पारायण कधी वाचावे?

श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दल चरित्रग्रंथ म्हणजे श्री गुरुचरित्र. सरस्वती गंगाधर रचित हा ग्रंथ दत्त संप्रदायाच्या कथा सांगणारा आहे. स्वतः श्रीनृसिंहसरस्वतींनी सरस्वती गंगाधर यांना चरित्र लिहिण्याचा आदेश दिल्याची माहिती श्री गुरुचरित्रात दिली आहे तर तशी श्रद्धा दत्त संप्रदायात आहे. इ. स. १४८० च्या सुमारास या ग्रंथाची रचना झाली असल्याचे मानले जाते. गुरुचरित्रास दत्तसंप्रदायाचा उपासना ग्रंथ मानतात. गुरुचरित्र या ग्रंथात एकूण ५२ अध्याय असून त्यात ७४९१ ओव्या आहेत. मंगलाचरण, गुरुभक्ती आणि गुरुप्रसाद हे या ग्रंथाचे प्रमुख विषय आहेत. गुरुची कृपा प्राप्त करणे तर ऐहिक आणि पारमार्थिक जीवनातील यश मिळविणे याचे मार्गदर्शन करणारा हा ग्रंथ आहे. श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती ही दोघेही दत्तात्रेय यांचा अवतार मानले गेले आहेत त्यामुळे त्यांच्या विषयी या ग्रंथात विशेष वर्णन आलेले दिसून येते. गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण हा दत्त संप्रदायातील महत्त्वाचा घटक मानला गेला असून ७/ १८/ २८/ ३४/ ३७/ ४३/ ५१ दिवस असा ग्रंथाचा पारायण काल सांगितला आहे. श्री गुरु चरित्राचे वाचन पहाटे ०३ ते सायंकाळी ०४ या दरम्यान करावे. दुपारी १२ ते १२.३० ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्या वेळेस पारायण वाचन करु नये. दररोज अंघोळ, संध्या करून संकल्प करावा. वाचन करण्यासाठी कायम एकच आसन वापरावे. पारायण करणार्‍याने हलका आहार घ्यावा. इतर कुणाच्याही घरचे अन्न स्वीकार करु नये. उपवास करु नये मात्र दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा. दिवसभर ईशचिंतन करावे तसेच या काळात घोंगडी पसरून जमिनीवर झोपावे. पारायण काळात शरीर, मन आणि बुद्धी यांची शुद्धता पाळावी. या दरम्यान पुरुषांनी...