ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ लिखित

  1. संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित
  2. संत ज्ञानेश्वर महाराज रचित "पसायदान"
  3. हरिपाठ – ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ – वारकरी संप्रदाय
  4. अभंग २७२.
  5. Ashadi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात कॅलिफोर्नियातील बारा वारकऱ्यांचा सहभाग ashadi wari 2023 twelve warkari from California participated in Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala
  6. हरिपाठ/श्री ज्ञानदेव हरिपाठ
  7. पाच संतांची नावे,महाराष्ट्रातील संत


Download: ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ लिखित
Size: 40.47 MB

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित

संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित आणि विडिओ सहित – sant dnyaneshwar maharaj haripath संत साहित्याच्या मध्यामातून आम्ही संत ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ अर्थासहित उपलब्ध करत आहोत, सर्व भाविक भक्तांनी याचा आनंद घ्यावा याबद्दलचे आपले मत कमेंट बॉक्स मध्येहरिपाठ टाका. १ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणें । द्वारकेचा राणा पांडवां घरीं ॥४॥ अर्थ: देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्यानें सलोकतादि चारी मुक्तींचा लाभ होतो. हे सकृद्दर्शनी असंभाव्य वाटतें, परंतु द्वारीं उभे असणें म्हणजे ‘सेवकाच्या नात्यानें तत्पर असणे’ असा अर्थ घेतला पाहिजे.श्रीतुकोबारायांनी (सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेद काम सांडोनिया ॥ ) परमप्रितीनें भगवन्नामोच्चार करणें हीच हरीची सेवा आहे असे सांगितलें आहे. श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत ‘हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा’ असें द्विरुक्तीनें सांगण्यांत हरीचे नामस्मरण हेंच देवाचें द्वार असे सुचविले आहे. ‘क्षणभर या पदाचा अर्थ ‘अति अल्पकाल’ असा घ्यावा. अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चारणरूप सेवा केली असतां चारी मुक्तीचा लाभ होतो, असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे. देवाचें मुख्य द्वार म्हणजे ज्ञान. त्या ज्ञानरूपी द्वाराचा क्षणभरही आश्रय करण्यात मुक्तता आहे; म्हणजे बाह्य पंचविषयांपासून अंतर आनंदमय कोशापर्यंत सर्व अनात्मा जड आहेत, असे विचाराने जाणून त्याचें तादात्म्य सोडणें व अंतर्मुख वृत्तीनें नित्य ज्ञानरूप आत्माकार क्षणभर वृत्ति करणें म्हणजेच मोक्ष. पण अशा सिद्धांता...

संत ज्ञानेश्वर महाराज रचित "पसायदान"

Pasaydan in Marathi Lyrics नमस्कार मित्रांनो, संत ज्ञानेश्वर महाराज रचित पसायदान तर आपण सर्वांना माहिती आहे. आपण आपल्या बालवयात शाळेत प्रार्थनेच्या वेळी गात होतो. असे, असलं तरी आपणास या पसायदानाचा फारसा अर्थ समजला नसेल. मित्रांनो, आम्ही खास आपल्यासाठी या लेखाच्या माध्यमातून पसायदानाचे संपूर्ण लिखाण केलं आहे. तरी आपण या लेखाचे वाचन करून संत ज्ञानेश्वर महाराज लिखित पसायदानाचा लाभ घ्या. संत ज्ञानेश्वर महाराज रचित “पसायदान”– Pasaydan in Marathi Pasaydan in Marathi आता विश्वात्मकें देवें । येणे वाग्यज्ञें तोषावें । तोषोनिं मज ज्ञावे । पसायदान हें ॥ जें खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी- रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो । जो जे वांच्छिल तो तें लाहो । प्राणिजात ॥ वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥ चलां कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचें गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥ चंद्र्मे जे अलांछ्न । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥ किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्हीं लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इयें । दृष्टादृष्ट विजयें । होआवे जी । येथ म्हणे श्री विश्वेशराओ । हा होईल दान पसावो । येणें वरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥ जे खळांची व्यंकटी सांडो | तयां सत्कर्मीं रती वाढो || भूतां परस्परें जडो | मैत्र जीवांचें || या ओवीचा अर्थ असा होतो की, जे व्यक्ती खळ आहेत त्यांच्यातील कुवृत्ती(वाईट) नष्ट होवो. इतकेच नाही तर त्यांची प्रवृत्ती सत्प्रवृत्ती परावर्तित व्हावी आणि ह्याची फलश्रुती म्हणजे सर्वच व्यक्ती सर्वांचे मित्र होवोत. इत...

हरिपाठ – ज्ञानेश्वर माउलींचा हरिपाठ – वारकरी संप्रदाय

श्री ज्ञानेश्वर महाराज लिखित हरिपाठामधे २७ अभंग असून त्याचे ३ गट आहेत. प्रत्येक गटात ९ अभंग आहेत. ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ हा हरिपाठातील पहिला अभंग असून या अभंगाचे धृवपद –‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा| पुण्याची गणना कोण करी ||’ हेच हरिपाठातील सर्व अभंगांचे धृवपद आहे. त्यामुळे हरिपाठातील प्रत्येक अभंगानंतर ‘हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा| पुण्याची गणना कोण करी ||’ ही ओळ म्हणतात. हरिपाठ म्हणण्याची पद्धत – भजन – जय जय राम कृष्ण हरी अभंग – सुंदर ते ध्यान उभे विटेवरी – संत तुकाराम महाराज कृत अभंग हरिपाठ अभंग गट पहिला – ९ अभंग भजन – राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरिपाठ अभंग गट दुसरा – ९ अभंग भजन – जय जय विठोबा रखुमाई हरिपाठ अभंग गट तिसरा – ९ अभंग तिस-या गटातील शेवटचा अभंग –‘सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी ‘ म्हणताना त्यातील शेवटचे चरण/कडवे –‘ ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान | समाधी संजीवन हरिपाठ || ‘ चाल लावून म्हणतात. समाधी संजीवन हरिपाठ म्हणताना जमिनीला स्पर्श करून नंतर स्वतःभोवती गोल फिरतात. यानंतर ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम’ गजर होतो. अभंग –‘नामसंकीर्तन साधन पै सोपे | जळतील पापे जन्मांतरीची ||’– संत तुकाराम महाराजकृत अभंग हरिपाठातील पहिला अभंग ‘ देवाचिये द्वारी उभा क्षणभरी | ‘ भजन- ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम’ हे भजन होते. इथे हरिपाठ संपतो. शक्यतो हरीपाठाच्या भजनात हरिपाठ झाल्यावर गुरुपरंपरेचे अभंग म्हणतात. गुरु परंपरेच्या अभंगांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या अभंग असले तरी मुख्यत्वे म्हटले जाणारे अभंग असून सुरुवातीला तुकाराम महाराजांचे चार अभंग, त्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांचा एक अभंग, ज्ञानेश्वर महाराजांचा एक अभंग, एकनाथ महाराजा...

अभंग २७२.

सप्रेम रामकृष्णहरि,इंटरनेट वापरणाऱ्या सर्व बांधवांना माऊली ज्ञानोबारायांच्या अभंग वाणीचा लाभ व्हावा या हेतूने या ब्लॉगची निर्मिती करण्यात आली आहे.माऊलींची भरपूर प्रमाणात वाड्म़य रचना आहेत.साहित्यसोनियांचिया खाणी,भावार्थ दिपीका म्हणजेच ज्ञानेश्वरी,अमृतानुभव, योगवासिष्ठ परंतु दुर्दैवाने ते उपलब्ध नाही ,अभंग परंतु माऊलींचे अभंग सोशल मीडियावर फार कमी प्रमाणात पहायला मिळतात,आणि मिळालेच तर त्याचा भावार्थ मिळत नाही त्यामुळेच हे संत वाड्म़य सहजरित्या उपलब्ध व्हावे याच उद्देशाने हा अट्टहास. या मनुष्यदेहाच्या बाजारांत आलेल्या मनुष्याने भगवान शारंगधर याच्या भक्तिकडे वळावे.असे न करता केवळ संसाराच्या नादी लागला तर मनुष्य देह फुकट जाईल रे बाबा.१.अरे संसारामध्ये आईबाप, बायको मुलगा वगैरे गणगोत माझे आहे असे तुला वाटते.परंतु यामध्ये कोणाचा कोणाशी संबंध नसतो. ही सर्व आपल्या डोळ्या देखत पाहाता पाहाता मृगजळाप्रमाणे नाहीशी होतील.२.तसेच तुला विषयाचे सुख नित्य वाटते पण बेगडाच्या बाहुलीचा रंग जसा लवकर नाहीसा होतो.किंवा आभाळ आल्यामुळे आलेली सावली जसी क्षणमात्रच असते. त्याप्रमाणे हे विषयसौख्य पाहाता पाहाता नष्ट होईल.३.ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,विचार करुन पाहिले असता स्वप्नातून जागे झालेल्या मनुष्याचे स्वपात पाहिलेले ऐश्वर्य जसे एका क्षणात नष्ट होऊन जाते. त्याप्रमाणे हे आप्तेष्ट किंवा त्यापासून वाटणारे सुख क्षणमात्रातच नष्ट होईल रे बाबा.४. रूप पाहता लोचनी। सुख झालें वो साजणी॥१॥ तो हा विठ्ठल बरवा। तो हा माधव बरवा॥२॥ बहुता सुकृताची जोडी। म्हणुनी विठ्ठली आवडी॥३॥ सर्व सुखाचे आगर। बापरखुमादेवीवर॥४॥★भावपराग★ हे सखे,म्हणण्यात वृत्तीत्वावच्छेदाने बुद्धी रुपी सखींस माऊली अनुवाद करीत आहे.त्या श्रीहरिचे रूप डोळ...

Ashadi Wari 2023 : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात कॅलिफोर्नियातील बारा वारकऱ्यांचा सहभाग ashadi wari 2023 twelve warkari from California participated in Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi sohala

पुणे : ते मूळचे महाराष्ट्रातील. पण, उद्योग-व्यवसायानिमित्त अमेरिकेतील कॅलिफोर्नियात स्थायिक झालेले. भौतिक प्रगती साधताना आस मात्र अध्यात्माचीही होती. त्यातून स्फूर्ती घ्यायची होती. देहू व आळंदीहून पंढरपूरला आषाढी वारीनिमित्त पायी जाणाऱ्या वारकऱ्यांसारखी. चालण्याची सवय होण्यासाठी त्यांनी ‘सेतू वारी’ सुरू केली. दररोज चालण्याचा सराव केला. वारीसाठी मानसिक व शारीरिक साधना केली आणि त्यांची पावले आळंदीकडे वळली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासोबत पुण्यापर्यंतचा पहिला टप्पा त्यांनी पूर्ण केला. विज्ञानातून भौतिक प्रगती साधल्यानंतर आध्यात्मिक स्फूर्तीचा शोध घेण्यासाठी त्यांनी आता विठ्ठलभेटीचा ध्यास घेतला आहे. पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी आषाढीवारीला निघाले आहेत. त्यात कॅलिफोर्नियामध्ये उद्योग व्यवसायात स्थिरस्थावर झालेले बारा जणांचा समावेश आहे. त्यातील सहा जणांची स्वतःची कंपनी आहे. काही उच्चपदस्थ अधिकारी आहेत. यात सहा महिलाही आहेत. पंढरीच्या वारीसाठी पायी चालण्यासाठीची मानसिक व शारीरिक साधना पूर्ण करून भक्तीची गोडी चाखण्यासाठी त्यांनी थेट पंढरीची वाट धरली आहे. आळंदी ते पुणे वाटचालीत त्यांना भक्तीच्या शक्तीची प्रचीती आली आहे. वारीसाठी मानसिक तयारी विजय उत्तरवार आणि स्मिता उत्तरवार, नितीन पाटील आणि वृषाली पाटील हे दांपत्य सहा वर्षांपूर्वी आळंदी ते पुणे वारीत चालले. उत्तरवार यांचे बंधू उद्योजक मोहन उत्तरवार यांचीही तेव्हापासूनची इच्छा होती. ती आता पूर्ण होत आहे. त्यासाठी त्यांचा जानेवारी महिन्यात वारीत सहभागी होण्याचा निर्णय झाला. त्यांना मित्र परिवारातील बारा जणांची साथ मिळाली. त्यांनी ‘सेतू वारी’ नावाने गट तयार केला. ‘आयुष्यातील सर्व गोष्टी विठ्ठलावर सोप...

हरिपाठ/श्री ज्ञानदेव हरिपाठ

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटेवरी ठेवून या ॥१॥ तुळशी हार गळा कासे पितांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२॥ मकर कुंडले तळपती श्रवणी । कंठी कौस्तुभमणी विराजीत ॥३॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीने ॥४॥ ॥ श्री ज्ञानदेव हरिपाठ ॥ ॥ एक ॥ देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा।पुंण्याची गणना कोण् करी ॥२॥ असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥ ॥ दोन ॥ चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥ मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥ एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न घाली मन ॥३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥ ॥ तिन ॥ त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥ सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥ अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजें ॥३॥ ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥ ॥ चार ॥ भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलु नये ॥१॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥ सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥ ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥ ॥ पाच ॥ योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥ भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥ तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥ ॥ सहा ॥ सा...

पाच संतांची नावे,महाराष्ट्रातील संत

पाच संतांची नावे -महाराष्ट्र हा संताचा पुरातन परंपरेने आपल्याला महाराष्ट्र राज्याला संत पुरातन परंपरा तसेच संत साहित्यिक यांची मराठी भाषेला खूप मोठा संत साहित्यिक वारसा बहाल केलेला आढळून आलेला आहे आपण खूप वेळा निवांत वेळी भगवन्ता च्या चरणी अर्पण होतं असतो. पर्यावरण संदेश अभंगातं तुकाराम महाराजांनी दिले आहे. गिता ओव्या लिहल्या गेल्या असे अनेक संत होऊन गेलेले आहेत. संतमेळा साकारला यमाई तुकाई तलावाच्या काठावरती खूप मोठा नमामी चंद्रभागा योजनेअंतर्गत ला चित्रमय संतमेळा साकारला गेला आहे. Table of Contents • • • • • • पाच संतांची नावे माहिती 1)संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराज हे सण १३ व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी होते. भागवत संप्रदायाचे प्रवर्तक,मोठे योगी व खूप मोठे तत्त्वज्ञ होयं. जन्म -आपेगाव येथे पैठण औरंगाबाद मधील ठिकाणी झालेला आहे.श्रावण कृष्ण अष्टमीला १२७५ साली झाला आहे. महाराज यांच्या कुटूंबातील व्यक्ती आई वडील बहीण भाऊ असे होते. त्यांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी होय तर त्यांच्या आई रुक्मिणीबाई या होय. महाराज यांचे बंधु निवृत्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे थोरले बंधू व सोपानदेव व मुक्ताबाई ही धाकटी भावंडे होय. ज्ञानेश्वरांनी लिहिलेले ग्रंथ. •अमृतानुभव •चांगदेव पासष्टी •भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) •स्फुटकाव्ये -अभंग, विराण्या •हरिपाठ. •ज्ञानसूर्य ज्ञानदेवांनी घेतली संजीवन समाधी -संतवर्य ज्ञानदेवांनी वयवर्षे अवघ्या २१ व्या वर्षी, आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी संजीवन समाधी घेतली गेली.(कार्तिक वद्य त्रयोदशी, शके १२१८, दुर्मुखनाम संवत्सर, इ.स.१२९६, गुरुवार) 2) संत एकनाथ महाराज – नाथ म्हणून संत एकनाथ महाराज ओळखले जातं. जन्म 1533 साली पैठण येथे झाला. एकनाथ महा...