ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण हरिपाठ

  1. ॥ हरिपाठ ॥
  2. Haripath


Download: ज्ञानेश्वर महाराजांचा संपूर्ण हरिपाठ
Size: 21.67 MB

॥ हरिपाठ ॥

१.सुंदर ते ध्यान उभे विटेवरी। कर कटावरी ठेवूनियां॥ १ ॥ तुळसीहार गळां कांसेपीतांबर । आवडे निरंतर हेचि ध्यान ॥२ ॥ मकर कुंडले तळपतिश्रवणीं। कंठी कौस्तुभमणि विराजित ॥ ३ ॥ तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें॥ ४ ॥ २. देवाचिये द्वारी क्षणभरीं। तेणें मुक्ति चारी साधियेल्या॥ १ ॥ हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा। पुण्याची गणना कोण करी॥२ ॥ असोनि संसारी जिव्हे वेग करी। वेदशास्त्र उभारी बाह्या सदा॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा। व्दारकेचा राणा पांडवा घरी॥४ ॥ ३. चहूं वेदी जाण साहि शास्त्रींकारण । अठराहि पुराणे हरिसी गाती॥ १ ॥ मंथुनी नवनीता तैसे घे अनंता। वायां व्यर्थ कथा सांडी मार्गे॥ २ ॥ एक हरि आत्मा जीवशिवसमा। वाया तूं दुर्गम न घाली मन ॥ ३॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे॥४ ॥ ४. त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥ सगुण निर्गुण गुणाचे अगुण । हरिवीण मन व्यर्थ जाय ॥२ ॥ अव्यक्त निराकार नाही ज्या आकार । जेथोनि चराचरहरिसी भजे॥ ३ ॥ ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनीं। अनंत जन्मोनि पुण्य होय ॥ ४ ॥५. भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति। बळेवीण शक्ति बोलू॥ १ ॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वाया॥ २ ॥ सायासे करिसी प्रपंच दिननिशी हरिसी न भजसी कोण्या गुणें॥ ३॥ ज्ञानदेव म्हणे हरि जप करणें। तुटेल धरणे प्रपंचाचें॥४ ॥ ६. योगयाग विधी येणे नव्हे सिद्धी। वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१ ॥ भावेवीण देव न कळे निःसंदेह । गुरूवीण अनुभव कैसा कळे॥२ ॥ तपेंवीण दैवत दिधल्यावीण प्राप्त । गुजेंवीण हि॥३ ॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूंचे संगति तरणोपायत कोण सांग।।४। ७. साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला। ठायींच मुराला अनुभव || १ || कापुराच्या वाती उज...

Haripath

१. देवाचिये द्वारी उभा क्षणभरी देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ती चारी साधियेल्या ॥ १ ॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ २ ॥ असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिये खुणे । द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ४ ॥ २. चहू वेदी जाण साही(षट्‍)शास्त्री कारण चहू वेदी जाण साही(षट्‍)शास्त्री कारण । अठराही पुराणे हरिसी गाती ॥ १ ॥ मंथुनी नवनीता तैसे घे अनंता । वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग ॥ २ ॥ एक हरि आत्मा जीवशिवसमा । वाया तू दुर्गमा न घाली मन ॥ ३ ॥ ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥ ४ ॥ ३. त्रिगुण असार निर्गुण हे सार त्रिगुण असार निर्गुण हे सार । सारासार विचार हरिपाठ ॥ १ ॥ सगुण निर्गुण गुणाचे अगुण । हरिविण मन व्यर्थ जाय ॥ २ ॥ अव्यक्‍त निराकार नाही ज्या आकार । जेथुनि चराचर हरिसी भजे ॥ ३ ॥ ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी । अनंत जन्मानी पुण्य होय ॥ ४ ॥ ४. भावेविण भक्‍ति भक्‍तिविण मुक्‍ति भावेविण भक्‍ति भक्‍तिविण मुक्‍ति । बळेविण शक्‍ति बोलू नये ॥ १ ॥ कैसेनि दैवत प्रसन्न त्वरीत । उगा राहे निवांत शिणसी वाया ॥ २ ॥ सायासे करिसी प्रपंच दिननिशी । हरिसी न भजसी कोण्या गुणे ॥ ३ ॥ ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे । तुटेल धरणे प्रपंचाचे ॥ ४ ॥ ५. योगयागविधी येणे नोहे सिद्धी योगयागविधी येणे नोहे सिद्धी । वायाची उपाधी दंभ धर्म ॥ १ ॥ भावेविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥ २ ॥ तपेविण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेविण हित कोण सांगे ॥ ३ ॥ ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥ ४ ॥ ६. साधुबोध झाला नुरोनिया ठेला साधुबोध झाला नुरोनिया ठेला । ठायीच मुराला अनुभवे ॥ १ ॥ कापुराची वाती उजळली ज्योति । ...