ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी pdf

  1. पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०
  2. [PDF] श्री ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ
  3. ज्ञानेश्वरी नित्यपाठ


Download: ज्ञानेश्वरी ग्रंथ मराठी pdf
Size: 54.6 MB

पान:सार्थ ज्ञानेश्वरी.pdf/२०

________________ 涼 ज्ञानदेवीचे शुद्धीकरण २१ राहिला नाही, अशी स्थिति उत्पन्न झाली. तरी अशा स्थितीतही लोकांनी ज्ञानदेवीच्या प्रती आदराने बाळगून ठेवल्या, व तिर्चे नित्यपठण करण्याचा क्रमही पुष्कळांनी चालू ठेवेला. ज्ञानदेवांच्या काळानंतर सुमारे तीनशे वर्षांनी म्हणजे शा. श. १५०६ मध्ये एकनाथमहाराजांनी ज्ञानदेवीचे संस्करण केलें. एकनाथांचे गुरु जनार्दनस्वामी है ज्ञानदेवीचा नित्यपाठ करीत असत, आणि एकनाथांचे या ग्रंथावर लहानपणापासूनच प्रेम जडलें. त्यांनी या ग्रंथाच्या पुष्कळ प्रती पाहिल्या, पण अपपाठांमुळे मूळच्या शुद्ध ग्रंथाची फार घाण झाली आहे, असें त्यांच्या ध्यानीं आलें. तेव्हां एकनाथांनी अनेक प्रती जुळवून ज्ञानदेवीची एक शुद्ध प्रत तयार केली. एकनाथस्वामी सांगतात- श्रीशके पंधराशें साहोत्तरी, तारणनामसंवत्सरीं, एका जनार्दनें अत्यादरीं, गीता - ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परि पाठांतरीं शुद्ध अबद्ध, शोधूनियां एवंविध, प्रतिशुद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. यावरून एकनाथांच्या पूर्वीच ज्ञानदेवी ग्रंथाचा प्रसार पुष्कळ झाला होता व त्यांत लेखकांच्या चुकीनें, निष्काळजीपणानें, किंवा धाष्टर्थ्यानें, अनेक अपपाठ घुसून अर्थाचा खेळखंडोबा उडाला होता, हें उघड आहे. एकनाथांनी ज्ञानदेवीचा जीर्णोद्धार केला, याचा अर्थ ज्ञानदेवी ग्रंथ कोठें कोनाकोपऱ्यांत अंधारांत गुडूप झाला होता, तो पुन्हा एकनाथांनी लोकांच्या नजरेस आणला असा नव्हे, तर लोकांत प्रचलित असलेल्या प्रतीतील अपपाठ त्यांच्या लक्षांत आल्यावरून त्यांनी त्या ग्रंथांची एक शुद्ध प्रत तयार केली, व तिचा वारकरी पंथांत प्रसार केला, इतकाच आहे. एकनार्थानीं ज्ञानदेवांच्या समाधीचा शोध लाविला, व आळंदीच्या यात्रेची प्रथा सुरू केली, ती अद्याप चालू आहे...

[PDF] श्री ज्ञानेश्वरी पारायण ग्रंथ

अध्याय पहिला श्रीगणेशाय नमः ॐ नमोजी आद्या । वेदप्रतिपाद्या । जय जय स्वसंवेद्या । आत्मरूपा ॥ १ ॥ देवा तूंचि गणेशु । सकलार्थमतिप्रकाशु । म्हणे निवृत्तिदासु। अवधारिजो जी ॥ २ ॥ हें शब्दब्रह्म अशेष। तेचि मूर्ति सुवेष । जेथ वर्णवपु निर्दोष मिरवत असे ॥ ३॥ स्मृति तेचि अवयव देखा आंगीक भाव । तेथ लावण्याची ठेव । अर्थशोभा ॥ ४ ॥ अष्टादश पुराणें तींचि मणिभूषणें । पदपद्धति खेवणें। प्रमेयरत्नांचीं ॥ ५ ॥ पदबंध नागर। तेंचि रंगाथिलें अंबर। जेथ साहित्य वाणें सपूर उजाळाचें ॥ ६ ॥ देखा काव्यनाटका। जे निर्धारितां सकौतुका। त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका। अर्थध्वनि ॥ ७ ॥ नाना प्रमेयांची परी। निपुणपणे पाहतां कुसरी। दिसती उचित पदें माझारीं। रत्नें भलीं ॥ ८॥ तेथ व्यासादिकांच्या मती। तेचि मेखळा मिरवती। चोखाळपणें झळकती। पल्लवसडका ॥ ९॥ देखा षड्दर्शनें म्हणिपती । तेचि भुजांची आकृति । म्हणौनि विसंवादें धरिती आयुधे हातीं ॥ १०॥ तरी तर्क तोचि फरशु । नीतिभेदु अंकुशु । वेदान्तु तो महारसु। मोदकु मिरवे ॥ ११ ॥ एके हातीं दंतु । जो स्वभावता खंडितु। तो बौद्धमतसंकेतु। वार्तिकांचा ॥ १२ ॥ मग सहजें सत्कारवादु । तो पद्मकरु वरदु धर्मप्रतिष्ठा तो सिद्ध । अभयहस्तु ॥ १३ ॥ देखा विवेकवंतु सुविमळु । तोचि शुंडादंडु सरळु। जेथ परमानंदु केवळु । महासुखाचा ॥ १४॥ तरी संवादु तोचि दशनु। जो समता शुभ्रवर्णु। देवो उन्मेषसूक्ष्मेक्षणु । विघ्नराजु ॥ १५ ॥ मज अवगमलिया दोनी। मीमांसा श्रवणस्थानीं। बोधमदामृत मुनी-। अली सेविती ॥ १६ ॥

ज्ञानेश्वरी नित्यपाठ

ज्ञानेश्वरी नित्यपाठ - स्वामी स्वरूपानंद (पांवस) पूजनीय स्वामीजींनी जी काही ग्रंथसंपदा निर्माण केली त्यातील हा अतिशय छोटेखानी ग्रंथ - ज्ञानेश्वरीतील निवडक १०९ ओव्या असलेला - "ज्ञानेश्वरी नित्यपाठ". केवळ १५-२० मिनिटात या ओव्या वाचून होतील इतका हा सुटसुटीत ग्रंथ. मात्र अर्थाकडे ध्यान देऊन शांतपणे या ओव्या वाचत गेल्यास आपल्या नित्याच्या जीवनालाही जागृती प्रदान करणारा असा एक समर्थ ग्रंथ आहे. नाथ संप्रदायातील स्वामीजी काय किंवा इतर सत्पुरुष काय - सर्वांनाच ज्ञानेश्वरी हा प्रमाण ग्रंथ. या नाथ संप्रदायातील सगळेच महापुरुष ज्ञानेश्वरीचे अंतरंग अधिकारी आणि प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीच जीवनात उतरवणारे - त्यातील भक्तलक्षणे असोत वा गुणातीताची लक्षणे असोत वा स्थितप्रज्ञ लक्षणे असोत - ही सारी जीवनात कशी उतरवता येतील याचा सार्‍या आयुष्यभर पाठपुरावा करणारे. स्वामी स्वरूपानंदही याच पठडीतले. त्यांना माऊलींची सारी ग्रंथसंपदा म्हणजे जीव की प्राण. माऊलींच्या ज्ञानेश्वरी तसेच चांगदेव पासष्टी व अमृतानुभव यांचे त्यांनी अभंगात्मक अनुवाद केलेले आहेत. यातील "अभंग ज्ञानेश्वरी" जर पाहिली तर आपल्यासारख्या सर्वसामान्यांना मूळ ज्ञानेश्वरी कळायला कठीण म्हणून या ग्रंथाची रचना स्वामीजींनी केलेली आहे हे लक्षात येईल. माऊलींच्या काळातली मराठी भाषा आपल्या पचनी पडणे अवघड म्हणून सध्याच्या (प्रचलित) मराठी भाषेत ही अभंग ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. असे असताना मूळ ज्ञानेश्वरीची गोडी, तिचे महत्व स्वामीजी पूर्ण जाणून होते. मात्र मूळ ज्ञानेश्वरी खूप मोठी ( - एकूण सुमारे ९३०० ओव्या) असल्याने त्यातील काही निवडक साररुप ओव्या जर दररोज वाचनात आल्या तर ज्ञानेश्वरी भाविकांना त्याचा खूप उपयोग होईल हे लक्षात घेऊन स्वामीजींनी या ग्रंथाची ...